Tuesday, August 23, 2011

त्या वास्तवात पुन्हा एकदा मी

स्वप्नांच्या थव्यामध्ये कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो,
चांद्ण्या रात्रीत कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो,
शोधात असतो मी कुठल्या तरी आभासाच्या,
आभासात कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......

नकळतच प्रवेश करतो मी त्या आभासाच्या जगात,
त्या जगात कसल्यातरी शोधात भरकटत असतो,
आकर्षिला जातो कोण्या आभासी म्रूगजळामागे,
त्या म्रूगजळात कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो......

म्रूगजळात असताना लागते कुठेतरी एक जोरदार ठोकर्.....
येतो मी वास्तवात् बळेच्
त्या वास्तवात पुन्हा एकदा मी
कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......
कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......

No comments:

Post a Comment