का कळत नाही.. पण हल्ली मन थोडं कठोर झालय,
प्रेम ह्या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालाय.
प्रेम-प्रेम-प्रेम.. बस झालं आता,
अरे एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही, मग त्या गोष्टीचा विचार करावाच का...?
तिलाही माहितीये की ती माझी होवू शकत नाही, आणि मलाही माहितीये की मी तिचा होवू शकत नाही..
दोघांची गत अशी झालिये, जसं आळवाचं पान अन त्यावरचा थेंब,
स्पर्श होवू शकेल पण एकजीव..? उभ्या जन्मात शक्य नाही.
माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोहोचल्या आहेत,
आणि तिच्या मनातल्या भावनाही माझ्या मनात पोहोचल्या आहेत.
दोघांच्या भावनेत प्रेम आहे, हे दोघांनाही माहितीये, पण ह्या भावना स्पष्ट का होत नाहीत..?
नाही...ते कधीच होणार नाही.. त्या मागे एकच कारण असावं,
दोघांनाही एकाच बंधनातुन जखडून ठेवलय ते म्हणजे "संस्कार".
"माझ्या लाडलीला लहानच मोठं केलं, पोरिनं जे मागितला ते बापानं पुरवला,
आणि शेवटी काय....? माझी पोरगी पलुन गली...!
रस्ताने जातांना बायकांची होणारी ती कुजबुज 'ही बघ- ही बघ हीच पोरगी पलुन गली त्या दिवशी'.
आश्या यातनेनं माझ्या मायेच्या काळजाला चीरा पडू नयेत
"पोराला लहानाचा मोठा केला,स्वतः फटकी गंजी घातली, पण पोराच्या कपड्यांची इस्तरी कधी चुकवली नाही. अरे काय नाही केलं ह्या बापानं माझ्यासाठी, स्वतःच्या पोटाची खळगी केली, पण मला ह्या लेकाला कंप्यूटर इंजिनियर बनवला. बापानं एकाच मागितला माझ्याकडे 'पोर, आपल्या जतिचिच पोरगी कर हं लेका, आयुष्यात एकच गोष्ट मागितली बापानं आणि मी तीही पूर्ण करू नये...?
खरच "संस्कार" म्हणजे बंधन..? नाही संस्कृती जपन्यासाठी दोन जीवांची लागलेली आतुरता "संस्कार"......
आणि मग ह्या आतुरतेपुढे सर्वच गोष्टी स्वाहा..........
म्हणून आम्ही म्हणतो "आमच्या नशिबात प्रेमच नाही".
No comments:
Post a Comment