Wednesday, August 3, 2011

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?
जीव न म्ह णजे
कुणाला माहित नसणारं
प्रत्येकाचं निरनिराळं
एक गोष्टीचं पुस्तक असतं

जन्म त्याची सुरुवात
मृत्यू त्याचा शेवट
दररोज त्याचं लिहितं एक पानं
कोणाच्या कधी मर्जीविना तर कधी मर्जीसहित

हार-जीत, राग-प्रेम यांना
असतं यात स्थान
सुख-दु:ख यांचे चढाव यात फार

हसायचं नसलं तरी हसावं लागतं
रडायला आलं तरी आवरावं लागतं

जीव न म्ह णजे
एक गोष्टीचं पुस्तक असतं
आव्हानं देऊन ते पूर्ण करायचं असतं
भातुकलीच्या डावासारखं
अर्धवट सोडायचं नसतं..........

No comments:

Post a Comment