Tuesday, August 23, 2011

सांग ना कधी तरी

सांग ना कधी तरी माझीच तू होशील चार चोघात देखील हात हातात देशील किती दिवस घाबरत जगणार किती दिवस चोरून भेटणार सांग ना कधी तरी माझीच तू होशील जगासमोर न घाबरता माझे नाव घेशिल वेगवग ळे बहाने करुन तुझे मला भेटन जाते जाते म्हणत उगाचच थाबन काहीतरी बोलून मग लाजण पाठ करुन माझ्याकडे डोळे झाकून बसन सांग ना कधी तरी माझीच मला म्हाणशील चार चोघात देखील हात हातात देशील........

माझ्या कोकण देशात

माझ्या कोकण देशात
उषाकाल गातो गाणी
सूर्य नभी उगवतो
करी सोन्याची पेरणी!
जागोजागी उड्या घाली
बाळकृष्ण माझा झरा
येई सरी मागे सर
हिरवीगार करी धरा!
झाडे पिटतात टाळ्या
वारा वाजवितो पावा
त्याच्या मंजूळ वाणीने
भूल पडतसे जीवा!
काय सांगू कोकणची
लीला आगळीवेगळी
नांदतात एकोप्याने
सारी पाने-फुले-वेळी!
अशा कोकणदेशाची
आठवण दाते उरी
जाते सह्याद्रीच्यावर
मन मारते भरारी!!

कुठे आहेस ग तू.. कीती वाट पाहू तूझी..

रंगात सख्या रंगुनी राधिका
का कान्ह्यालाच खोडकर म्हणते ?
हव्या वाटत असल्या खोड्या त्याच्या
का उगाच छळल्याचा आव आणते ???


कधी कधी मनाला..
झोकून देतो स्वत:ला शब्दात..
मग पुन्हा शोधत असतो..
स्वत:लाच स्वत:त..


नटखट कान्हा करी..
बासरीने मंत्र मुग्ध..
राधा होई बावरी..
कान्हाच्या एका भेटीसाठी..


कुठे आहेस ग तू..
कीती वाट पाहू तूझी..
तुझा संदेश घेऊन येणारी वारयाची,
झुळूकही आता वाट पाहतेय तूझी...


अडखळले शब्द माझे..
तुझी स्तूती करता करता..
कदाचीत त्यांनाही कळाली असावी..
त्यांची मर्यादा..


नाही कळले प्रेम तुझे.. जे ओठांनी बोलायचे..

शब्दांच्या शाळेत मला..
पुन्हा एकदा जायचे आहे..
अ आ इ ई पुन्हा एकदा..
पाटीवर गिरवायची आहे



तिला वाटतं ती रुसुन बसली की,

मी तिला लाडीगोडी लावुन मनवावं,

पण मी सुद्दा मुद्दाम अडुन राहतो,

असं लटक्या चेहरयाचं दर्शन का सोडावं.


मोठे होता होता..
सुटली शाळा अन फुटली पाटी..
आता फक्त धावतोय...
उज्ज्वल भविष्या साठी...


नाही कळले प्रेम तुझे..
जे ओठांनी बोलायचे..
कि गहीवरल्या डोळ्यांनी..
अश्रुंसंगे वाहायचे...?


मी तुझी सख्या शेकोटी रे !!!! बघ ना जरा जवळ येवूनी

गुंतला जीव हा तुझ्यात कधीचा सखे
तू गारवा प्रभाती मी ते विखुरलेले धुके
बघ उडते ते सोनेरी सूर्य किरणांचे थवे
रूपाने तुझ्या चकाकती दवांचे आरसे

धुक्यातल्या त्या गारठ्यातली
मी तुझी सख्या शेकोटी रे !!!!
बघ ना जरा जवळ येवूनी
ऊब देण्याची माझी हातोटी रे !!!!!!!!!!!!


सुगंध आमचा चहूकडे पसरला..
ओल्या या मातीस ही तो न चुकला..
जिवनच आमचे फुलायचे दुसरयांसाठी..
फुलून मग सुकायचे दुसरयांसाठी..


का बघताय असे..
आमचे जीवन फूलणे अन गळने..
या मातीतून उगवलो आम्ही..
अन या मातीतच मिसळून जाणे..

तुला भेटण्यास काल ग्रीष्म आला होता

तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो…..

आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतो
नदीच्या प्रवाहात…

तुला भेटण्यास काल
ग्रीष्म आला होता
रूप तुझे बघून तो
चक्क चैत्र झाला होता


तू लाजलेली असताना मी सये
शब्दांना ही लाजताना पाहिलंय,
तू सामोरी पाहून कित्येकदा मी
रुसलेल्या शब्दांना हसताना पाहिलंय

तुझ्या अबोल शब्द मध्ये...

तुझ्या अबोल शब्द मध्ये...
स्तब्ध माझ्या साठीच प्रेम..
तुझ्या बोलक्या डोळ्यांमध्ये...
का मग हे अश्रुंचे थेंब..

अक्षरांनी सख्या झेप घेतली बघ
मनातून माझ्या ओठांकडे .
त्यांचेच बघ गीत जाहले
धाव घेत तुझ्या मनाकडे!!!!

रंग बघ मी त्यात ओतले
तुझ्या नि माझ्या मनातले ;
भाव बघ मी त्यात सांडिले
प्रेम भरल्या डोळ्यातले !!!!!!

सूर बघ रे त्यात उमटले
खळखळनाऱ्या पाण्यातले ;
नाद बघ रे ,त्यात ऐकले मी ,
झुळझुळनाऱ्या झरयातले !!!!!

गंध बघ मी कसे आणिले
दरवळनाऱ्या मातीतले ;
थेंब त्यातून कसे टिपीले
कोसळणाऱ्या पावसातले !!!!!!!!
त्याचेच बघ रे गीत जाहले, धाव घेत तुझ्या मनाकडे ..................

चिंब मला भिजवायला

चिंब मला भिजवायला सख्या
तुझ्या प्रेमाचा रे पाऊस होता .
भिजल्यानंतर सुकवायला
आठवणींचा वारा होता
.
अंगावर तुझ्या कल्पनांचा
प्रेमळ बघ शहारा होता.
आणि पांघर्ण्यासाठीसुद्धा
तुझ्याच नजरेचा पहारा होता.

अश्याच त्या संध्याकाळी
तुही माझ्या सोबत होता .
स्वप्नातल्या त्या जगात सख्या
चंद्रही चांदण्याच्या कवेत होता!!!!!!!

भटक्याच त्या वाटा वीसरल्या माझ्या घराला

राहू दे .................

हलक्या फुलक्या आठवणी त्या अश्याच राहू दे
पापन्यान मध्ये आसवांच्या घड्या तश्याच राहू दे

दडवू नको त्या सुगंधास केसात तुझ्या राणी
वाऱ्यास पकडुनी हात तुझा मनसोक्त वाहू दे

का अबोला हा धरुनी तू बंधीस्त केले त्यांना
उकलून ओठांच्या पाकळ्या शब्दास जिवंत होवू दे

किती समजावू मी निजेला तू नसुनी असते येथे
मज घेवून ती उश्याशी म्हणे खोटे खोटेच पाहू दे

भटक्याच त्या वाटा वीसरल्या माझ्या घराला
मुक्कामास वेदनांना आज थोडी वीश्रांती घेवू दे

ती कशीही असली तरी मला ती आवडते,

ती कशीही असली तरी मला ती आवडते,
कितीही मस्करी केली तरी सगळं काही विसरायला लावते,
तिच्या सहवासात राहावे सतत मला वाटते,
ती निघून गेली कि एक विषण्णता मनामध्ये दाटते,
असे जरी असले तरी तिला सांगायचे राहूनच जाते,
तिच्यावरचे प्रेम माझे मौन बाळगून तिच्या आठवणीत झुरत राहते,
कवी जरी मी असलो स्वैरछंदी,
तिला काव्यात उतरवणे मला कठीणच होऊन बसते.

हो हो आलो मी पुन्हा.. तुझ्या आस पास वावरायला..

निळ्या आभाळाचं या काळ्या धरतीवर प्रेम
पावसाच्या रूपाने नेहमी जात असते उतू
कुणीच म्हणून नये पावसाळा याला सये
हा तर त्यांच्या निर्मळ मिलनाचा ऋतू

घेवून संगतीला तुला गं साजणे
जायचे आहे पल्याड नभांच्या
पकडून हात हातात तुझा कायमचा
खेळ संपवायचा आहे सावल्यांचा

येशील ना गं ????????????


वाट पाहते मी सख्या तुझी..
दिवस असो वा रात्र..

अजून किती वाट पाहू तुझी..
नेहमी असेच चालू असते हे सत्र..



हो हो आलो मी पुन्हा..
तुझ्या आस पास वावरायला..
माहित आहे तुला नको मी..
पण आलोय पुन्हा तुला सावरायला..



चारी दिशानी हा वाहतो तिरंगी वारा

ठिणगीस नको हिणवू

चारी दिशानी हा वाहतो तिरंगी वारा
खादीस घाबरूनी फिरंगी झाले पोबारा

फास ते झुलते तेव्हा पावन होवून गेले
वारा स्वतंत्र झाला जेव्हा आवाज मिळाले

होता तो काळ काळा शुभ्र ते हात झाले
अन्यायाने टेकला माथा ......
अहीसां मुखी "वंदे मातरम"गीत गात गेले

हा नाद नसे वीरता, नभी गर्जनाच जाहली
किती मुकले प्राणास करण्या मुक्त "माय मावुली"

वेड्या आज वण्याव्यास समाजाला दीप तू
जळूनी राख हो शील ठिणगीस नको हिणवू

विश्वास एक छोटासा शब्द हे,

बशीने कपाच्या कानात कांही सांगितले
सांगताना तिला मी लाजताना बघितले .
बशीच्या स्पर्शाने बघ सख्या ,कपाचे काळीज पेटले
ओठांच्या तिच्या स्पर्शासाठी,बघ कपाने चहाचे निमित्त गाठले !!!!!!!!



विश्वास एक छोटासा शब्द हे,
जिसके मायने समझो तो बहुत हे,
पर मुश्कील ये हे, कि लोगो को
" विश्वास पर शक हे,
और शक पे विश्वास हे"

एक गुलाबाची पाकळी दिसली... अजूनही तशीच टवटवीत..

तू रुसलीस की..
मन ओसाड "मृगजळ" होते..
तुझ्या एका हाकेसाठी..
सैरावैरा धावत असते..


तुला तुटताना पाहून..
देवाकडे एक वर मागेन..
या जन्मी तू माझी नाहीस..
पण पुढील मी तुझाच असेन..

पाण्यावरचे तरंग...
हवे सोबत हिंडत असतात..
मनावरचे तरंग मात्र...
आतल्या आत कुढत असतात..


आज पुस्तकाची पाने चाळताना..
एक गुलाबाची पाकळी दिसली...
अजूनही तशीच टवटवीत..
पण तिच्यात जगायची जिद्द कुठली..?


कोण म्हणते.
थेंबाला नाव नसते..
जे डोळ्यातून ओघळतात..
त्यांचे ही अश्रू म्हणून अस्तित्व असते..

दोन प्रीत पाखर जाणीवपूर्वक झाली होती विलग,

ओळखून नात्याच्या भविष्यातील भीषण अंधार
दोन प्रीत पाखर जाणीवपूर्वक झाली होती विलग,
कायमचे मुकले सुखाला जिथे नात्याने धरला होता
सवय, गरज आणि परिणामी जीवन असला क्रम सलग..!!



तु फक्त माझ्यावर..
आरोप डागत गेलीस..
पण माझ्या माझ्या मनात..
डोकावायला विसरलीस..

माझं आपलं असं प्रेम !!!!

माझं आपलं असं प्रेम !!!!

चंद्र सुर्य आणून देईन,
पदरात घालीन लक्ष तारे !
बांधून ठेवीन तुझ्या दारी,
तुझ्या केसांशी खेळते वारे !!!

असं मी मुळीसुद्धा म्हणणार नाही
उगाचं भाव खाण्यासाठी मी खोटं बोलणार नाही...

माझं आपलं सरळसोट सांगण
"माझं तुझ्यावर प्रेम आहे !"
अगदीच 'हीर - रांझा' नसलं तरी
थोडं थोडसं सेम आहे !!!

पेट्रोल जाळत फ़िरणं तुझ्यापाठी
मला अजिबात जमणार नाही,
शायनिंगसाठी पैसा उधळणं
मला अजिबात झेपणार नाही.

तरीसुध्दा मार हाक मनापासुन कधी !
उभा असेन तुझ्यासमोर तुझ्यासुद्धा आधी !!!
कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे !
हां ! 'जॉन - बिपाशा' सारखं नाही
माझं आपलं माझ्यासारखं प्रेम आहे !!!!

आणखी एक खरं सांगतो,
तुझं माझ्यावर आणि
माझं तुझ्यावर प्रेम असलं तरी !
'केवळ' सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी....nik
बघत राहीन इतर पोरी !!

पण हे अगदी नक्की त्या कितीही सुंदर असल्या
आणि कितीही मोहक हसल्या तरी,
तुझ्याचं खळीवर पागल होतो,
तुझ्याचं बटांवर पागल आहे आणि
तुझ्याचं डोळ्यात आकाश बघेन !!
अगदी खरं सांगतो
तुझ्यावरच प्रेम होतं,तुझ्यावरच प्रेम आहे,
आणि तुझ्यावरच प्रेम करेन !!!!

तुझ्या आठवणीत बुडताना..

काळ ' आहे म्हणूनच
तर लपवण्याची गरज वाटते .
स्वतःच घर सोडून
भाड्याने घेण्याची वेळ येते !!


का जगणे तिच्यासाठी आता सये
माझ्या जगण्यास ही मंजूर नाही
बोलण्याने तिच्या लुप्त झाली स्वप्ने
तसूभर ही डोळ्यांचा त्यात कसूर नाही


तुझ्या आठवणीत बुडताना..
मला तुझाच सहारा असतो..
अन माझ्या भोवती..
तुझ्या आठवनींचा पहारा असतो..


भन्नाट आलेला वारा सख्या ,

शब्द असे यावेत ओठानाही कळू नये..
भावना अश्या फुलाव्यात मनालाही कळू नये..
स्नेह असा जडावा स्नेहालाही कळू नये..
गीत असे म्हणावे निसर्गालाही कळू नये..
डोळ्यात अश्रू यावेत डोळ्यांनाही कळू नये..
प्रीत अशी उमलावी दोघांनाही कळू नये..


भन्नाट आलेला वारा सख्या ,फुलांना बघ उधळून गेला.

जाता जाता मनामध्ये ,पाकळ्यांचा सडा घालून गेला

प्रत्येक पाकळी वेचताना ,भुंग्याचा उर भरून आला
,
रंगात फुलाच्या रंगताना ,आठवणींचा ढग बरसून गेला !!!!!!!!!!!!!



मैत्री म्हणजे तुझा अन माझा.. मिसळलेला एक श्वास..

कोसळणारा पाऊस असावा
अन संगतीला असावी तू,
हिरव्यागार साथीसोबत
जाईल आपली प्रीतीही उतू..!!



मैत्री म्हणजे प्रेम..
मैत्री म्हणजे विश्वास...
मैत्री म्हणजे तुझा अन माझा..
मिसळलेला एक श्वास..



तू माझी मैत्रीण..
अन मी तुझा मित्र..
असेच चालत राहो..
आपल्या नात्याचे हे सूत्र..


तुझ्या माझ्या नात्याचे..
हे रेशमी बंध..
येऊ दे ना या नात्याला..
मैत्रीचा सुगंध..


दरवरल्या दाही दिशा..
आपल्या प्रेमाच्या सुगंधात..
आपण दोघेही अडकलोय..
या सुंदर अश्या बंधनात..

"असं अचानक सुख का?"

दु:खानंतर सुख आल्यावर
माणूस जरा गोंधळतो,
"असं अचानक सुख का?"
असं देवाला विचारतो!!

आधीतर दु:खी माणसाला
सुख ओळखताचं येत नाही,
नशिब इतकं दयावान का?
याचं कारण कळत नाही!!

दु:खाची सवय झाली की
सुख विचित्र, नकोसं वाटतं,
नशिबाने दाखवलेली दया
स्वाभिमानाला सुख नकोसं वाटतं!!

"आपण आपल्या दु:खात बरे, या
उशीरा येणाऱ्या सुखाची गरज काय?
कदाचित आपण सुखाच्या लायक नाही
अशा हावरटपणाची गरज काय?"

खरंतर देवाने दिलेलं हे बक्षिस
आपण प्रेमाने स्विकारायचं असतं,
पुढे परत हवं तेवढं दु:ख
दोन क्षण सुखात जगायचं असतं..!!

माझिया प्रियेला प्रीत कळेना...

जमिनीवर सांडलेल्या फुलांचा सडा सखे
मनापासून आवडतो मला तो सुगंध वेचायला,
स्वखुशीने फुलं आपली होतात दरवळत
त्यांना खुडण्याची सल नसते मनात बोचायला..!!

गारद ग मी सजणे तुझ्या सौंदर्य तीराने
जीव माझा गुंतला तुझ्या पायीच्या गोंदनात,
घे उचलुनी स्पर्शुदेत काळजाला प्रीती
जखडून ठेव मजनूला तुझ्या हृदयाच्या कोंदणात..!!


आठवतंय सख्या तुला ,बाहुला- बाहुलीच लग्न?
जे आपण लहानपणी खेळत होतो.
ते खोट लग्न खर समजून
आजची स्वप्न तेंव्हा बघत होतो !!!!!!!!१


शिकून सवरून Modern झालात म्हणून
लाज नको रे चारचौघात मराठी भाषेची,
आईसमान मानता ना रे ह्या मायबोलीला
मग संवादातून ओटी भरा रे तिच्या आशेची..!!



तुझ्या माझ्या नात्याचा अर्थ तुला कळेना...
माझ्या मनातील गुपित तुला काही उमजेना..
कधी गाशील प्रिये प्रेमाचा तराना...
माझिया प्रियेला प्रीत कळेना...

त्या वास्तवात पुन्हा एकदा मी

स्वप्नांच्या थव्यामध्ये कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो,
चांद्ण्या रात्रीत कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो,
शोधात असतो मी कुठल्या तरी आभासाच्या,
आभासात कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......

नकळतच प्रवेश करतो मी त्या आभासाच्या जगात,
त्या जगात कसल्यातरी शोधात भरकटत असतो,
आकर्षिला जातो कोण्या आभासी म्रूगजळामागे,
त्या म्रूगजळात कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो......

म्रूगजळात असताना लागते कुठेतरी एक जोरदार ठोकर्.....
येतो मी वास्तवात् बळेच्
त्या वास्तवात पुन्हा एकदा मी
कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......
कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......

नाते

नाते'
हा एकच शब्द. तो वाचायला फक्त एक सेकंद लागतो.
त्यावर 'विचार' करायला एक मिनिट.
ते समजावून सांगायला एक तास.
समजून घ्यायला एक दिवस. जाणून घ्यायला एक आठवडा आणि निभवायला एक 'जन्म'

Monday, August 22, 2011

जगी सर्वात सुंदर पवित्र हे नाते आई लेकराचे

जगी सर्वात सुंदर पवित्र हे नाते आई लेकराचे
आई नंतर माउली बनते अशी ताई पण मायाळू,
सात जन्म साथ देईल अशी सखी पण तर हवीचं
चला तर मग अवघ स्त्रीपण ओवाळणीत सांभाळू..!!

राहू कटिबद्ध जपाया त्यांना आणि त्यांच्या ममतेला
संसारी ह्या जगाच्या मातृत्वाशिवाय नाही निभाव,
सुधर रे समाजा आतातरी दे रूढी परंपरा झुगारून
कुलदिपकाच्या नावाखाली आलाय लक्ष्मीचा अभाव..!!

अक्का ताईच्या भावांनो आता कमान तुमच्याचं खांद्यावरी
मन करा खंबीर धरून नव्याची कास अन मोडा समजूत ही जुनी,
"रक्षण करेल मी घरी-दारी निरागस स्त्रीत्वाचं आणि तिच्या जन्माचं"
घ्या शपथ आता ह्या नव्या युगाच्या पवित्र रक्षा बंधनाच्या दिनी..!!

भावा बहिणीच्या प्रेमाच्या ह्या पवित्र अशा रक्षा बंधनाच्या सर्व मित्र मैत्रिणी आणि "ताई" साहेबांना हार्दिक शुभेच्छा..!!
जगी सर्वात सुंदर पवित्र हे नाते आई लेकराचे
आई नंतर माउली बनते अशी ताई पण मायाळू,
सात जन्म साथ देईल अशी सखी पण तर हवीचं
चला तर मग अवघ स्त्रीपण ओवाळणीत सांभाळू..!!

राहू कटिबद्ध जपाया त्यांना आणि त्यांच्या ममतेला
संसारी ह्या जगाच्या मातृत्वाशिवाय नाही निभाव,
सुधर रे समाजा आतातरी दे रूढी परंपरा झुगारून
कुलदिपकाच्या नावाखाली आलाय लक्ष्मीचा अभाव..!!

अक्का ताईच्या भावांनो आता कमान तुमच्याचं खांद्यावरी
मन करा खंबीर धरून नव्याची कास अन मोडा समजूत ही जुनी,
"रक्षण करेल मी घरी-दारी निरागस स्त्रीत्वाचं आणि तिच्या जन्माचं"
घ्या शपथ आता ह्या नव्या युगाच्या पवित्र रक्षा बंधनाच्या दिनी..!!

भावा बहिणीच्या प्रेमाच्या ह्या पवित्र अशा रक्षा बंधनाच्या सर्व मित्र मैत्रिणी आणि "ताई" साहेबांना हार्दिक शुभेच्छा..!!

तुझ्या माझ्या नात्याला..

मी झालो असतो सागर..
जर तू असतीस सरिता...
पण मी झालो कवी..
अन तू माझी कविता



चल या श्रावण महिन्याचे..
एक अवचीत्य साधू...
तुझ्या माझ्या नात्याला..
प्रेमाच्या गाठीत बांधू..

आकाशी चंद्र चांदण्याची साथ..

कोसळणारा पाऊस पाहून..
मला एक थेंब व्हावसं वाटतंय..
त्याच्या सारखंच मला..
एकदा तुफान बरसावस वाटतंय..



नारळी पुनवेच्या या मंगल सणाला..
भाऊ बहिणीची पवित्र गाठ..
बहिण भावाच्या या नात्याला...
आकाशी चंद्र चांदण्याची साथ..



मला कधीच वाटले नव्हते..
मी कविता करेन..
अन तुझ्या ओठातून येणारा..
प्रत्येक शब्द त्यासाठी चोरेन..

दादाचं ताईला चिडवण,

दादाचं ताईला चिडवण,
तेच दडला सांभाळून घेण,
दादा आपल्या पाठीशी उभा म्हणून तेच निर्धास्त राहण ,
बहिण भावाचं नात अतूट रहाव..

स्वर्ग सुखाची आराधना..

क्षणातच अशी तू गेलीस नीघून
परत येण्याची मनाला ओढ लावून
जातांना ओलावली होती पापणी तुझी
तरी गेलीस माझ्या ओठांवर हसू ठेवून


काय मागू तुझ्या कडे...
तू सोबत असताना..
तुझी साथ हीच माझ्यासाठी..
स्वर्ग सुखाची आराधना..

अशिच येशिल तु तेव्हा

अशिच येशिल तु तेव्हा
मन होइल वेडे माझे पुन्हा पुन्हा
पक्षिहि गीत गातिल पाहुन तुजला
हळुच लाजेल सोनचाफा पानामधुनिया....

अशिच येशिल तु तेव्हा
घेउनि अ॑न॑त स्वप्ने सोबतिला
खट्याळ हसु गालि लाजारि बावरि होउनिया
सोनियाचि पाउले जनु ल़क्ष्मिच बनुनिया....

अशिच येशिल तु तेव्हा
कधि विरह नसेल जेव्हा
तुझे माझे प्रेम असेल इतके
स्वर्ग हि फिका पडेल तेव्हा.....

Tuesday, August 16, 2011

आठवते आपली ती पहीली

आठवते आपली ती पहीली
भेटएकमेकांकडे बघण्यासही लाजलो होतो
हळूहळू नजर एकमेकांकडे वळताच
आपण जागेपणीच निजलो होतो
आठवते आपली ती पहीली
भेटतुझं ते पावलोपावली अडखळणं
तेवढचं एक निमित्त पाहून
तुजपाशीमाझं आधार देण्यासाठी वळणं
आठवते आपली ती पहीली
भेटपुन्हा भेटण्यासाठी किती आतूर झालेलो
तेव्हा म्हणालीस तुझ्या जिवनातमी
एक खास भेट म्हणून आलेलो
आठवते आपली ती पहीली
भेटमन कसं चंदना सारखं दरवळलं होतं
स्वप्नांचे कोवळे दव झेलतमनात
प्रेम कसं हिरवळलं होतं
आजही ती पहीली भेट
माझं मन गच्च धरुन आहे
जरी नसलो तुझ्या कपाळावर
तरीतुझ्या अंतरी ऊरून आहे...

मैत्रीचा धागा तोडून जाशील.

पाऊस असतोच भिजायला
सख्या छत्रीशिवाय हिंडायला .
हात हातात आला कि
...ओल्या मिठीत शिरायला !!!!!!


सांगायचे होते तुला काही...
राहूनच गेले.
मनातले गुपित ओठांवर आणायचे ..
राहूनच गेले.
तुझ्या सहवासात असतांना,
तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.
तू रागावशील, सोडून जाशील,
मैत्रीचा धागा तोडून जाशील.
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे..
राहूनच गेले.

का नाही ग समजत तुला कधी

तुझ्या आठवणीत रोजचं जळून सखे
एक दिवस चिता मला जवळ घेईल,
तुझ्यासाठी रंगवलेल्या प्रेमाची स्वप्ने
अतृप्त मनाने माझ्यासोबत नेईल..!!

का नाही ग समजत तुला कधी
माझ्या अंतरीची निशब्द तळमळ,
असलो वरून जरी शांत संयमी
तरी मनमंदिरी सदा खळखळ..!!

डावलून सखे मला तू कायमसाठी गेलीस
सांग माझा अपराध वागलीस अशी परखड
विचार करून आता विचारही हा शिणला
निववू कसे ह्या धुपणाऱ्या मनाचे कढ..!!

तुझा तळवा माप ओलांडेल माझ्या घरचं
असं धूसरही नाही भासत आता हे प्राक्तन,
घाव जरी घातलास तू हा जिव्हारी माझ्या
भळभळनाऱ्या जखमेचं करीलं मरणांती जतन..!!

तू माझ्या जवळ नसतेस असे कधी होतच नाही...

नसोत कधी बंध या आमच्या..
भाऊ बहिणीच्या नात्याला..
फुलो वसंत सतत तिच्या दारी..
असे सुख लाभो माझ्या लाडक्या ताईला

माझ्या डोळ्यांची नझर तुला,
कधी कळलीच नाही..
कितीही प्रेम केले तरी
तुला ते उमगलेच नाही..!



नाते तुझेन माझे साताजन्मीचे,
जसे आकाशाशी इंद्र धनुश्यांचे..
समुद्राशी जसे किनाऱ्याचे,
अन तारयांशी जसे चंद्राचे..!

तू माझ्या जवळ नसतेस
असे कधी होतच नाही...
तुझ्या स्वप्ना शिवाय तर
माझे डोळे काही बगतच नाही..!!

माझे डोळे बघतात नेहमी
तुझ्याच सहवासाचे स्वप्न...
ह्या मनाला तरी काय सांगू
ते असते तुझ्यातच मग्न...!!



"पेन को लिखने के लिए
कागज की जरुरत नहीं
आपसे प्यार है बताने की लिए
शब्दों की जरुरत नहीं"

तुझ्यावर कविता करावी तर

तुझ्यावर कविता करावी तर
योग्य शब्द सापडत नाहीत.
आणि जे कांही सापडतात ,
ते तुझ्यासाठी पुरत नाहीत.

तुझ माझ्यावरच प्रेम शब्दात सांगाव
तर शब्दही मुके होतात.
पण तुझ्यासमवेत तेच शब्द
स्पर्शातून बोलू लागतात.

माझ्यावरचा तुझा विश्वास
माझ्या प्रत्येक श्वासात आहे .
विश्वासाशिवाय जगण म्हणजे
श्वास कोंडून मरण आहे .

तुझ्याशिवाय माझ जगण
आत्म्याशिवाय शरीर आहे.
समजून घेतलस मला तू
म्हणून तर माझ जगण आ

तुझे नी माझे नाते काय? …

तुझे नी माझे नाते काय? …
तु देणारी मी … मी घेणारा
तु घेणारी … मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चकाचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय ?….
तुझे नी माझे नाते काय? …
सुखदु: खाची होता व्रुष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येत टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
य मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय? …

बांधून घ्या राख्या कितीही तुम्ही हातात

प्रेम जर एकीवर असेल तर रक्षाबंधानला घाबरू नका
खुशाल फिरा रस्त्यावर राखीला नाही म्हणू नका

बांधून घ्या राख्या कितीही तुम्ही हातात
एक नाही बांधणार जी आहे तुमचा मनात

का घाबरता तुम्ही इतरांच्या राखीला
धोका तर देत नाही ना प्रियसीच्या प्रेमाला

हीच खरी परीक्षा असते आपल्या प्रेमाची
जर नाही निघाला घर बाहेर ती हि नाही राहणार तुमची

पुढच्या वर्षी मग तीच बांधील तुम्हाला राखी
जास्तीच्या मोहामुळे एकही नाही राहणार सखी

Monday, August 15, 2011

साथ योग्य असेल साथीला

वसंताची कोकीळा का ग हि शरमिंदा
भुलली जणू ती जेव्हा छेडलीस तू तान,
मंजुळ सुरावटी सखे तिलाही पाडतात कोड
गर्वहरण जिथे कोकिळेचं................
राहिलं कसं बर ह्या सख्याला भान..??



मनाने घेतलं मनावर एकदा
नाही जायचं तिच्या आठवणींच्या गावा,
पण मनंच ते मनमानीचं वागणार
धाडलाचं फिरून त्याने आठवणींचा थवा..!!



साथ योग्य असेल साथीला

तर मैफिलीला रंग येतो.

शब्दही छान असतील जोडीला

तर गाण्याला छान सूर लागतो !!!!!!!!!



मी तुझ्या मागे वेडा नव्हतो
पण मला तुझ्याशी बोलयला आवडायचे
मी तुला आपलुकीने सर्व विचारायचे
पण तुला ते बंधन वाटयचे
तुझ्या स्पर्शाने मला कधी मजा नाही आली
पण तुझ्या स्पर्शाने मला सुख जाणवायचे
तुझ्या मनात काय होते ते मला नाही कळायचे
पण तुझे वागणे तीरस्कारासारखे वाटायचे
मी शांत राहिलो कि तुझे सारखे बोल बोल करायचे
पण त्यात हि गप्प राहणे मला शहाण्यासारखे वाटायचे

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

अंगात लालभडक डगला

अंगात लालभडक डगला
अन डोक्यावर काळी क्याप घालून
चोकातल्या कोपरयावर ती उभी असते
वाट पहात .......आनोळखी चेहर्यांची ........
प्रत्येकांच्या हाताकडे......खिशाकडे तिची सराईत नजर
ती बांधील नसते कुणाशी ......
काही क्षणांची तिची निष्ठां.......पण प्रमाणिक
स्वताहपुरती......
तिच्या पोटात साठलेल्या
अनेकांच्या भावना.......इछा...वासना....
सकाळी १० वाजता एकदा
अन सायंकाळी ५ वाजता एकदा
तिची डिलीवरी ........................
अन लगेच पुन्हा सुरु
तिचे सम्पर्क आभियान .................
ती उपाशी राहू शकत नाही
म्हणून तर ती
उभी असते चोकातल्या कोपरयावर
वाट पहात .........कुणीही चालते तिला
आगदी कुणीही i

अंगात लालभडक डगला

अंगात लालभडक डगला
अन डोक्यावर काळी क्याप घालून
चोकातल्या कोपरयावर ती उभी असते
वाट पहात .......आनोळखी चेहर्यांची ........
प्रत्येकांच्या हाताकडे......खिशाकडे तिची सराईत नजर
ती बांधील नसते कुणाशी ......
काही क्षणांची तिची निष्ठां.......पण प्रमाणिक
स्वताहपुरती......
तिच्या पोटात साठलेल्या
अनेकांच्या भावना.......इछा...वासना....
सकाळी १० वाजता एकदा
अन सायंकाळी ५ वाजता एकदा
तिची डिलीवरी ........................
अन लगेच पुन्हा सुरु
तिचे सम्पर्क आभियान .................
ती उपाशी राहू शकत नाही
म्हणून तर ती
उभी असते चोकातल्या कोपरयावर
वाट पहात .........कुणीही चालते तिला
आगदी कुणीही i

मावळचे आंदोलन पाण्यासाठी पेटले

मावळचे आंदोलन पाण्यासाठी पेटले

मावळचे आंदोलन पाण्यासाठी पेटले
मेलेल्यांना शेवटी दोन घोट पाणी पण नाही भेटले

कोणाला काय भेटले याचा हिशोब होत राहील
निवडणुकांच्या अजेंड्यावर हा हि एक विषय राहील

आणि तेव्हा या विषयावर मोठ मोठी भाषणं होतील
मतांच्या स्पर्धेमध्ये दोन चार फुलेही वाहतील

मेलेल्यांना म्हणतील सगळेच आता हुतात्मे
निवडणुकाच्या वेळी जागे करतील त्यांचे आत्मे

त्याची पूर्वतयारी आताच सुरु झाली
मृतांच्या नातेवाइकाना भेटण्यासाठी गर्दी झाली

सहानुभूतीच्या शब्दांनी त्यांचे आश्रू पुसतील का
मावळ मधले हुतात्मे एवढ्या लवकर मावळतील का

त्यांच्या हुतात्म्याचे मोल तेव्हाच फिटणार आहे
जेव्हा पवनेचे पाणी मावळच्या मातीला भेटणार आहे

मी hi बोललो कि तिने पण hi बोलावे

मित्र मैत्रिणीच्या बोलण्यावर घरच्यांची गस्त
आहे
त्यामुळे वाटते कि ऑन लाईन बोलण्याचा मार्गच मस्त आहे

मी hi बोललो कि तिने पण hi बोलावे
how are you विचारण्याआगोदरच तिने fine
असावे

मी fine असण्याचा प्रश्नच कुठे आहे
तू fine आहेस म्हंटल्यावर मी असणारच आहे

आपण on line असल्याचे भान सुधा राहत
नाही
कोणी किती काय बोलावे ज्ञान सुधा राहत नाही

बोलता बोलता अचानक reply होतो बंद
शुद्धीवर येते डोके तरी मन बेधुंद
कधी कळेल त्यांना आमची हि मैत्री
का होते line cut कोण लावते कात्री एवढा येतो राग वाटते घालावा दगड P C वरपण नंतर आठवते कि घरचे आहेत गस्तीवर

कितीही म्हटलं तरी,

कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!

तू साद देत असशील तर मी नेहमीच लिहत राहील

घराच्या छपरावर रात्री नभीचा चंद्र पहुडला होता,
घरात यावं की नाही ह्याचं विचारात रखडला होता,
वेडाचं तो चंद्र, रात्रभर तळमळला एकटाचं मला प्रकाशून
अन तो मात्र माझ्या पायरीवरचं जखडला होता..!!

तुझ्या माझ्या सोबत..
चाललेली ती अजाण वाट..
अजूनही आपण सोबत येण्याच्या..
आहे ती संभ्रमात..


सांग सखे जगण्याचे
काय शोधू कारणे?
मरण्याचे आज माझ्या
सामोरी हजार उदाहरणे?

तू साद देत असशील तर
मी नेहमीच लिहत राहील
शब्द बनून मग मी तुझ्या
मनात हळूच शिरत जाईल


मी पाहिलंय तुला..
मला चोरून पाहताना.
माझ्या डोळ्यांशी नजर भेट होताच..
मनात खुदकन हसताना..


ऊन पावसाच्या या खेळात..

मी पाहिलंय तुझ्या डोळ्यात..
तिथे मीच आहे सजलेला..
माझा प्रत्येक शब्द..
तुझ्या प्रेमाच्या पावसात भिजलेला..

ऊन पावसाच्या या खेळात..
दोघेही गेलो भारावून..
त्यांच्या सवे चाल सखे..
आपण हि जाऊ न्हावून...

किरणांचा हात धरून सख्या मी चंद्रावर गेले

चांदण्यांच्या नजरेतून मीही तुला पहिले .

नजरेतल माझ्या प्रेम पाहून ,काळीज चांदण्याचं जळले,

अन..चंद्राच्या बदल्यात त्यांनी तुला कि रे मागितले !!!!!!!!!


शब्दांच्या या मायाजाळात..
आता असा फसलो आहे....
तुझ्या सोबत चार क्षण..
पुन्हा येथे जगलो आहे..

होय फक्त मराठीच'...

होय फक्त मराठीच'..........!

मराठी माणूस आहे, मी चाल माझी वाघाची
कोणासही न जुमानणारी नजर आहे रागाची !

...येथल्या काळ्या मातीचा गर्व आहे मजला भारी
देव मानतो विठोबाला करतो पंढरीची वारी !

माझाच आहे सह्याद्री आणि त्याच्या पर्वत रांगा
कृष्ण कोयना वेण्णा यांना मानतो आम्ही गंगा !

मराठी रयतेचा आहे शिवबाच फक्त जाणता
राजा
मुलुख सारा मावळ्यांचा करतो आजही गाजा वाजा !

येथल्या मातीत आहे समतेचे सारे पाणी
शाहू फुले आंबेडकरांची गातात येथेच गाणी !

अजूनही ओळखले नसले तर आता तरी जाणा
मराठी बाणा आमच्या ह्रदयातील काळीज माना !

'होय फक्त मराठीच' पुन्हा एकदा ठणकावून सांगतो
तरीही ज्ञानोबा तुकोबांच्या शांतीचे पसायदान मागतो !

महाराष्ट्राचे गर्व गीत आम्ही जोराने गाणार
मराठी रयतेचा
झेंडा आम्ही अटकेपार नेणार !

अमावसेच्या रात्री आभाळ मनात खजील

अमावसेच्या रात्री आभाळ मनात खजील
एकटेपणाने ढकललं त्यालाही गर्तेत निराशेच्या,
रोज उकलंत असतं ते चंद्रकोरीने चांदण्याचं हास्य
पण आज तेही आहे प्रतीक्षेत तेजोमय पौर्णिमेच्या..!!

मी मराठी ..... मी मराठी .....

उत्तुंग भरारी घेऊ या !

उज्ज्वल भविष्यासाठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली
ऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले
युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

गणाधीश नाचतो रंगुनी
नवरात्रीची अंबा भवानी
यळकोटाचा भंडार उधळी खंडोबाची आण घेउनी
वारकऱ्यांची सुरेल दिंडी
विठुरायाचे नाम गर्जते
समृद्धीची पावनगंगा भरून येथे नित्य वाहते
मनगटात यश अमुच्या आहे आणि किर्ती ललाटी
मी मराठी ..... मी मराठी .....

अभंग, ओवी, फटका, गवळण, धुंद पवाडा, धुंद लावणी
माय मराठी भाषा अमुची नक्षीदार भरजरी पैठणी
ज्ञान-कला-भक्ती-विद्येचे वैभव येथे सदा नांदते
जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते
शिकवू आम्ही भारताला देऊन आव्हाने मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

घोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू
काळाशीही झुंज देउनी सदैव विजयी राहू
जरी रांगडा बाणा अमुचा जीवास जीवही देऊ
अंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ
साधे भोळी दिसतो परी गुण अमुच्या ठायी कोटी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुरते अंगाई
संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे
तुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे
तुझाच जयजयकार असावा सदैव अमुच्या ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....


गीत -
संगीत -
स्वर - सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अवधूत गुप्ते, अमेय दाते, उदेश उमप, आरती अंकलीकर
साधना सरगम, वैशाली सामंत

आठवते आपली ती पहीली

आठवते आपली ती पहीली
भेटएकमेकांकडे बघण्यासही लाजलो होतो
हळूहळू नजर एकमेकांकडे वळताच
आपण जागेपणीच निजलो होतो
आठवते आपली ती पहीली
भेटतुझं ते पावलोपावली अडखळणं
तेवढचं एक निमित्त पाहून
तुजपाशीमाझं आधार देण्यासाठी वळणं
आठवते आपली ती पहीली
भेटपुन्हा भेटण्यासाठी किती आतूर झालेलो
तेव्हा म्हणालीस तुझ्या जिवनातमी
एक खास भेट म्हणून आलेलो
आठवते आपली ती पहीली
भेटमन कसं चंदना सारखं दरवळलं होतं
स्वप्नांचे कोवळे दव झेलतमनात
प्रेम कसं हिरवळलं होतं
आजही ती पहीली भेट

अनामिक ............

माझं मन गच्च धरुन आहे
जरी नसलो तुझ्या कपाळावर
तरीतुझ्या अंतरी ऊरून आहे...

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन.

एकदा सहज म्हणून तिला विचारलं

माझ्या डोक्याचा मला हेवा वाटतो सख्या

जो तुझ्या खांद्यावर विसावतो.

पण त्याचवेळी तो क्षणही नकोसा वाटतो

कारण तेंव्हाच तर आपण निरोप घेतो ............


रक्ताची नाती असली तरी सख्या
त्यांच्या रक्तावर आपला हक्क नसतो.
म्हणूनच तर वेळ आली कि
परकाच आपल्या उपयोगी पडतो


एकदा सहज म्हणून तिला विचारलं
का नाही गं वागत लोक आपल्याशी चांगलं,
भासवतात नुसतं साथ आहे कायमसाठी
पण पूर्णपणे आपलेपणाचं स्वप्न तर भंगलं..!!

ती चलाख अगदी सहजतेने उत्तरली कशी
भल्या-बुऱ्याचा जमाना आजकाल ह्यानेचं नटली सृष्टी,
"नसतो जगात कुणीही पूर्णपणे चांगला वा वाईट",
पारखायला शिक रे माणसं राजा ठेऊन सारासार दृष्टी..!!

मी असाच आहे वेडा , उन पावसासारखा वागणारा .

मी असाच आहे वेडा ,
उन पावसासारखा वागणारा .
हसता -हसता अचानक .
तुझ्यावार रागावणारा ......

...मी असाच आहे वेडा ,
सशासारखा हरणारा !
किती हि प्रयंत्न कर विसरायचा ,
पण तुझ्या आठवणीत राहणारा .......

मी असाच आहे वेडा ,
मृग जलामागे धावणारा .
माहित आहे तू नाही येणार ,
पण तरी वाट पाहणारा ......

क्षणात ओघळून जाणारे प्रेम नसतेच कधी,

क्षणात ओघळून जाणारे प्रेम नसतेच कधी,
प्रेम असते सोबत नसताना पण आयुष्यभर साथ निभावणारे,
दूर राहूनसुद्धा सतत सोबत असल्याचा एहसास देणारे,
कधी मैत्रीच्या रुपात तर कधी बेधुन्द प्रीत बरसवनारे

रक्ताची नाती सख्या एक एक करून तुटत होती

रक्ताची नाती सख्या एक एक करून तुटत होती

तेंव्हा मनातील चिंता ,सरणावर जळत होती.

एकेक करून काळजाची, फुल कुणीतरी खुडत होती,

थंडावलेल्या राखेवर ,त्यांचीच श्रद्धांजली वाहत होती !!!!!!!!!!!!

काल मी ऑफिस वरून घरी परततानाचा किस्सा आहे

काल मी ऑफिस वरून घरी परततानाचा किस्सा आहे ...
मी just मेडीसीन घ्यायला थांबलेलो तर सहज लक्ष गेल कि रस्त्याचा कडेला एक गृहस्थ टून होऊन (दारू पिऊन) पडलेत ते,
त्या गृहस्थावरून नजर हटते न हटते तर नजर पडली एका गृहणी वर ती सहज आपली रस्त्याने जात होती कुठे तरी,
तिच पण लक्ष गेल त्या पडलेल्या व्यक्तीवर, ती त्याला खुप निरखून बघत होती, even त्याला पूर्ण पणे क्रॉस केल्यावर सुद्धा ती बाई त्याला वळून पाहतच होती ...
तिला बघून उगाच मनात एक खोडकर विचार आला आणि मनातच म्हटलं तिला कि "अहो, काकू .... घाबरू नका, ते तुमच्या घरचे नाहीयेत ...!!" आणि स्वतःच हसलो गालातल्या गालात ...
नंतर विचार केला, जर ते वाक्य मी तिला जोरात म्हटलो असतो तर काय झाल असत ....?

छञपती शिवाजी महाराज म्हणजे काय

छञपती शिवाजी महाराज म्हणजे काय ?
लाकडाचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सुताराला.
सोन्याचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सोनाराला.
मातीचा शिवाजी बनवल्यावर मान जातो कुंभाराला.
अरे पण शिवाजी या नावाची तीन अक्षरे उलटी केल्यावर असे समजते कि जो जिवाशी खेळतो तो शिवाजी.

तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे

ती म्हणजे जणू चपळ भिरभिरत रान पाखरू
तिच्या पाणीदार डोळ्यात विहरतो मी राजहंस भोळा,
पण जाळ्यात फसली झाली ती भलत्याचीच शिकार
करून गेली हो ती माझा सपशेल डोम कावळा..!!



तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता खिशात रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग तिला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अगंण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांचा सौदागर म्हणून जगलो सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हा निवंडूग ह्या शब्दात ळॊळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे.

.'श्रावणाने 'जन्म घेतला ...!!!!!!!

उन्हाने सावलीला सख्या ,थोडासा गारवा मागितला .
सावलीनेही विचार न करता ,त्याला कुशीत घेतला
पण त्या दोघांचा हात असा कांही गुंतला ,
तो न सुटल्याने बघ ....'श्रावणाने 'जन्म घेतला ...!!!!!!!

प्रेम ह्या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालाय

का कळत नाही.. पण हल्ली मन थोडं कठोर झालय,
प्रेम ह्या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालाय.
प्रेम-प्रेम-प्रेम.. बस झालं आता,
अरे एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही, मग त्या गोष्टीचा विचार करावाच का...?
तिलाही माहितीये की ती माझी होवू शकत नाही, आणि मलाही माहितीये की मी तिचा होवू शकत नाही..
दोघांची गत अशी झालिये, जसं आळवाचं पान अन त्यावरचा थेंब,
स्पर्श होवू शकेल पण एकजीव..? उभ्या जन्मात शक्य नाही.
माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोहोचल्या आहेत,
आणि तिच्या मनातल्या भावनाही माझ्या मनात पोहोचल्या आहेत.
दोघांच्या भावनेत प्रेम आहे, हे दोघांनाही माहितीये, पण ह्या भावना स्पष्ट का होत नाहीत..?
नाही...ते कधीच होणार नाही.. त्या मागे एकच कारण असावं,

दोघांनाही एकाच बंधनातुन जखडून ठेवलय ते म्हणजे "संस्कार".
"माझ्या लाडलीला लहानच मोठं केलं, पोरिनं जे मागितला ते बापानं पुरवला,
आणि शेवटी काय....? माझी पोरगी पलुन गली...!
रस्ताने जातांना बायकांची होणारी ती कुजबुज 'ही बघ- ही बघ हीच पोरगी पलुन गली त्या दिवशी'.
आश्या यातनेनं माझ्या मायेच्या काळजाला चीरा पडू नयेत

"पोराला लहानाचा मोठा केला,स्वतः फटकी गंजी घातली, पण पोराच्या कपड्यांची इस्तरी कधी चुकवली नाही. अरे काय नाही केलं ह्या बापानं माझ्यासाठी, स्वतःच्या पोटाची खळगी केली, पण मला ह्या लेकाला कंप्यूटर इंजिनियर बनवला. बापानं एकाच मागितला माझ्याकडे 'पोर, आपल्या जतिचिच पोरगी कर हं लेका, आयुष्यात एकच गोष्ट मागितली बापानं आणि मी तीही पूर्ण करू नये...?
खरच "संस्कार" म्हणजे बंधन..? नाही संस्कृती जपन्यासाठी दोन जीवांची लागलेली आतुरता "संस्कार"......
आणि मग ह्या आतुरतेपुढे सर्वच गोष्टी स्वाहा..........
म्हणून आम्ही म्हणतो "आमच्या नशिबात प्रेमच नाही".

एक मुंगी रिक्षा मध्ये बसली

एक मुंगी रिक्षा मध्ये बसली. तिने एक पाय बाहेर काढला.
रिक्षाचालक : मुंगी ताई, पाय बाहेर काढू नका. आत ठेवा.

मुंगी: गप बस..............आयला त्या हत्तीची..............हत्ती मिळाला तर एक जोरात लात मारणार त्याच्या पार्श्वभागावर................ काल साला मला डोळा मारून पळून गेला..............आज बघते मी मेल्याला..

आजही अंगावर शहारे येतात.

आजही अंगावर शहारे येतात.

ती
रात्र आठवली
की आजही
अंगावर शहारे
येतात. आम्ही
येवल्याहून
निघालो होतो,
रात्रीतून
नाशिकला
पोहोचायचे
होते. पावसाचे
संततधार गाणे
सुरुच होते.
येवल्या
च्या
पुढे एक नाला
दुथडी भरुन
वाहत
होता.

पुलावरुन
पाणी जात होते
दोन्ही
बाजूला वाहने
अडली होती.
पाच-दहा
मिनिटातच
पाणी ओसरले अन
मार्ग खुला
झाला. आता त्या
पुलावर
अडकलेली
पन्नास ते साठ
वाहने सोबतच
धावू लागली.
साधारण
दहा-पंधरा
किलोमीटरवर
पुन्हा एक पुल
लागला.
तोदेखील
दुथडी भरुन
वाहात होता.
आम्ही थांबलो,
आजुबाजूचे
ग्रामस्थ
सांगत होते की
पाणी जास्त
नाही...तुम्ही
जाऊ शकता.
हळूहळू वाहने
त्यांचा
मार्ग काढत
होते. आमची
मारुती
सुखरुप पुढे
जाईल का अशी
शंका मनात
डोकावत
असताना
ड्रायव्हरने
मनाचा हिय्या
करुन कार
पाण्यात
टाकली. कार
जसजशी पुढे
जाऊ लागली तसे
पाणी वाढू
लागले.
कारच्या
खालच्या
भागातील
होल्समधून
पाणी यायला
सुरुवात झाली.
बघताबघता
आमची पावले
बुडाली.
घोट्याच्या
वर पाणी लागले
आणि बरोबर
पुलाच्या
मध्यभागी
येऊन कार बंद
पडली. लाईटस
बंद पडले,
आजुबाजुला
मिट्ट काळोख
पुलाचे
कठडेही
पाण्यात
बुडालेले.

आजुबाजूला
लाल, गढूळलेले,
उफाळलेले
पाणीच पाणी.
माय मराठीत
ज्याला सात
गेले अन पाच
राहिले
म्हणतात तशी
आमची अवस्था
झालेली... मनात
देवाचा धावा
सुरुच होता.
शेवटी माझे
पती व
ड्रायव्हर
खाली उतरले,
कार ढकलत नेऊ
लागले.
पायाखालचा
रस्ता अनोळखी.
पुलाचे कथडे
माहित
नाही...दोन्ही
काठावर
लोकांचा
आरडाओरडा
कानावर पडत
होता. पूल
ओलांडायला
लागलेले पाच
ते दहा मिनिटे
आम्हाला
पाच-दहा
वर्षासारखे
भासले होते.
हळूहळू
कारमधील पाणी
कमी व्हायला
लागले.
पलिकडच्या
काठावरची
माणसे जवळ येऊ
लागली. जीवन अन
मृत्युच्या
मधील
सीमारेषा
किती पुसट
असते ना? आम्ही
कारमधले
सर्वचजण त्या
पुसट रेषेला
स्पर्श करुन
आलो होतो.
आम्हाला
सुखरुप बघून
काठावरील
लोकांनी एकच
जल्लोष केला.
नकळत आमचे हात
जोडले गेले.
कोणती अलौकिक
शक्ती होती
आमच्या
पाठीशी? थोडे
खाटखूट करत
गाडी सुरु
झाली.
नाशिकच्या
दिशेने धावू
लागली, गाडीत
एक निशब्द
शांतता
पसरलेली होती.
तिचा भंग
करावा असे
कुणालाही
वाटत
नव्हते.

आमोल घायाळ मुंबई

Monday, August 8, 2011

Engineeringमध्येकायअसतं

Engineeringमध्येकायअसतं
Assignment, Drawing sheet, ExamआणिResultशिवायकाहीनसतं
Assignmentम्हणजेकायअसतं
शुद्धलेखानाचकामअसतं
Drawing sheetम्हणजेकायअसतं
काचेवरचकोरिवकामअसतं
Examम्हणजेकायअसतं
एकमेकांनामदतकरण्याचकामअसतं
Resultम्हणजेकायअसतं
पार्टीलाजाण्याचाकारणअसतं

Electricalमध्येकायअसतं
Transformerशिवायकायनसतं
Mechanicalमध्येकायअसतं
Rankine cycleशिवायकायनसतं
Civilमध्येकायअसतं
कराचीच्याmean sea levelशिवायकायनसतं
Productionमध्येकायअसतं
Male femaleशिवायकायअसतं
ITमध्येकायअसतं
Copy Pasteशिवायकायनसतं
Electronicsमध्येकायअसतं
पोरींशिवायकाहीनसतं

First Yearमध्येकायअसतं
नविनमित्रभेट्न्याचानिमित्तअसतं
Second yearमध्येकायअसतं
Diplomaचेमित्रयेण्याचाकारणअसतं
Third yearमध्येकायअसतं
Dropमधीलमित्रयेणेअसतं
Last yearमध्येकायअसतं
मित्रांशिवायकाहीनसतं

Thats why engineeringम्हणजेकायअसतं
मित्रबनवन्याचकामअसt

तुझ्या भावनांची किंमत शब्दामध्ये करू शकत नाही !

तुझ्या भावनांची किंमत शब्दामध्ये करू शकत नाही !
तुझ्या मैत्रीचे ऋण कधीच फेडू शकत नाही !!

तरी पण मी आज मैत्रीचे ऋण फेडायचे ठरवले !
मांडीवर डोके ठेऊन तुझ्या खूप रडायचे ठरवले !

आभाळ माझ्या भावनांच मनात खूप दाटलंय !
डोळ्यातलं पाणी माझ्या डोळ्यातच आटलय !

म्हणून म्हणतो आज मला मनभरून रडू दे !
फ्रेंडशिप डेच्या दिवशी तरी मैत्रीचे ऋण तरी फेडू दे !!

दोन मित्र वाळ्वंटातून चालत जात असतात

दोन मित्र वाळ्वंटातून चालत जात असतात. अचानक त्यांच्यात भांडण होतं आणि एक मित्र दुसरयाच्या थोबाडीत मारतो. जो मित्र मार खातो तो दुखी होतो आणि काहीही न बोलता तो वाळूत लिहितो की "आज माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राने माझ्या थोबाडीत मारलं."

ते दोघे पुन्हा चालू लागतात. वाटेत एक छोटंसं तलाव येत. दोघे आंघोळ करायची ठरवतात. पण ज्या मित्राने थोबाडीत मार खाल्लेला असतो तो अचानक तलावा जवळच्या दलदलीत फसतो आणि बुडू लागतो. पण त्याचा मित्र त्याला वाचवतो. मरता मरता वाचल्यावर तो मित्र एका दगडावर कोरून लिहितो की "आज माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राने माझे प्राण वाचवले."

तेव्हा पहिला मित्र ज्याने दुसरयाच्या थोबाडीत मारलेली असते आणि मग त्याचेच प्राण वाचवले असतात त्या दुसरया मित्राला विचारतो की "जेव्हा मी तुला मारले तू ते वाळून लिहिले आणि जेव्हा मी तुला वाचवलं ते तू दगडावर कोरले. असं का?"

दुसरा मित्र म्हणतो की "जेव्हा कुणी आपल्याला दुखी करतं तेव्हा ते आपण वाळूत लिहावं जेणेकरून क्षमा आणि वारयाबरोबर ते लगेच पुसलं जावं आणि जेव्हा कुणी आपल्यासाठी काही चांगलं करतं तेव्हा ते आपण दगडावर कोरावं जेणेकरून वारयाबरोबर ते कधीच पुसलं जाणार नाही." -

कधी हसले मित्र कधी फुगले

कधी हसले मित्र कधी फुगले
सुख दुख सारे सोबत भोगले
मागता उधार मित्र म्हणती
""तेरे लिये कोई बात है पगले""

कॉलेज असो वा क्याटीन असो
ती रूम असो वा पिचर हॉल असो
सुंदर देखणं काळीज फाड मॉल असो
ते मित्र....................
all is वेल सेमीसटर चे झालेले हाल असो

ते ग्यादरिंग आमचे.. ते सारे लफडे
न धुता परफ्युम ने माखलेले कपडे
रकशा बंधनाला त्या मारून चाट
साजरे करती valentine आणि फ्रेंडशीप डे

ब्रेक up आणि त्याच्या तिचा mek up
मद्य धुंद होता पहालेला तो क्षणिक लॉक up
रात्र रात्र जागून अभ्यासा साठी (may be)
लास्ट बेंच वर काढलेली ती गाढ झोप

प्रक्टिकल मध्ये मास्तर ने केलेली फसगत
चुकून लागलेली तुम्हा मुळे(साल्यानो) ती वाईट लत
सार आठवतंय मित्रानो ..पण आता एव्हडच
असेच राहा निरन्तर सोबत

आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी.

आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी.
कुठलाही शिष्ठ पणा न करता,दिल खुलास असावी,
पळस पानी थेम्बा सारखी,ती नितळ असावी;
जी कायम अबोध बालका सारखी,हसत असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
...
जिच्या सोबत संध्याकाळ,एक "स्पेशल" असावी,
पण ती स्वतःकायम,"सोशल"असावी;
मैत्री नात्यात "नथिंग ओफ़िशिअल "असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिची चाहूल एक, ऋतू पालवी सारखी असावी,
जिची सोबत श्रावण-सरी,ओली असावी,
जिच्या केस घसरणीत,पानगळ असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या नाती,सर्व धागी अतूट असावी,
जिची हास्य खळखळ,बेछूट असावी;
जिची मन भावना,रेशीम कोमल असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या वागण्यात,दाणगट पोट्टे-शाही असावी,
कायम माझ्या करिता,शिवी-गाळ असावी;
दोघां मध्ये एक,आगळीच फिल्मी-यारी असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिने माझी तोंडची सिगारेट,ओढून फुन्कावी,
कधी तोंडी पान-विड्याची,पिचकारी थुन्कावी,
हि सगळी हिम्मत,फक्त माझ्या पुरतीच असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जी माझ्या संगतीस,कायम वेडी असावी,
जिला माझ्या क्षणांची,आतुर गोडी असावी;
माझ्या जोक्स ला कायम,पुरुषी हसावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कायम जिने माझी कॉलर,धरूनच असावी,
माझे पसरले केस,ओढूनच असावी;
कधी लाडावून माझी,गळ-मानगूट फासावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कधी माझ्या न बोलण्याने,विव्हळ असावी,
माझ्या नजरीत ईशार्याला,चपळ असावी;
कुठेतरी या नात्या बद्दल,खूप हळवी असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

मैत्री ला एक वृक्ष म्हणू

मैत्री ला एक वृक्ष म्हणू ...मित्र सारे त्यावरली पाने फुले जणू
फांद्यांचा आधार घेऊ ......उंच वाढू मैत्रीची उंची पाहू

एक फुल तू बन एक पान मी
एक फांदी हाताची एक फांदी सहवासाची
घट्ट रोऊ पाळे मुळे या धर्तीत
मित्र बनवू तिलाही , नसेल भीती उखळून पडण्याची

भूक लागली तर उन खाऊ
वादळाला येवू दे सोबतीला आपण नको भिऊ
मैत्रीचे बळ बघ सारे मिळून अजमाऊ
संकटे येतीलही बहु संकटाना तोंड देऊ

घरटी बांधतील पक्षी अनेक
घरटा त्यात आपल मैत्रीच एक
निवास त्यांचा चिलबिलाट सारा
सर्वांनी मिळून सांभाळू हा मैत्रीचा पसारा

हिरवी पालवी मैत्रीची ,फुलोर हा मित्रांचा
बहरून जायील वृक्ष हे इथे खेळ भावनाचा
गंध पसरू चारी दिशांनी ,
बंध एक निराळ्या भाषांनी

पाहतील वाटसरू मैत्रीचे हे वृक्ष डोळे भरुनी
सांगतील किसे कधी ..तर लहान मुलांना अपुली मैत्रीची कहाणी
अशीच फुलुदे .अशीच वाढू दे निरंतर बांधून मैत्री राहील
बुंधा मजबूत आहे विश्वासाचा हे वृक्ष असेच वाढत राहील

मैत्री म्हणजे काय असते ?

मैत्री म्हणजे काय असते ?

आपल्या प्रत्येक सुख दुःखात

साथ देणारी मैत्रीच तर असते ....

बहिण-भावाशी भांडण झाल्यावर

आपल्याला जवळची वाटणारी मैत्रीच तर असते....

शाळा - कॉलेज संपल्यानतरही

हवी हवीशी वाटणारी मैत्रीच तर असते ...

सर्व नाती - गोती दुरावाल्यानंतरहि

एक अमूल्य नाते जोडलेलेच असते

तेच तर मैत्रीचे नाते असते . :)

मैत्री दिनाच्या हार्दिक सुभेच्या .....

गोंधळ कसला इथे काम चालू आहे

गोंधळ कसला इथे काम चालू आहे
कार्यालयात फायलांचा आराम चालू आहे
पायताण झिजवा किवा देह झिजवला तरी चालेल
टेबला खालून पाकिटात हरीनाम चालू आहे

रसत्याला खड्डे पाडणारा माणूस भला आहे
त्यातून मार्ग काढने म्हणे आजकाल कला आहे
जिथे हवे त्या पासून मैलभर लांब चालू आहे
श्रद्धा-सबुरीच्या नावावर बांधकाम चालू आहे

चर्चा चारलोकात झाली तरी तिला लोकसभा नाव आहे
शेवटून पाहिलंच सुधारणे साठी तुमचंच गाव आहे
पुढार्यांची सध्या परदेश दवरयांची धूमधाम चालू आहे
गोंधळ कसला इथे काम चालू आहे ......

आश्वासन म्हणे.. धीर धरा महागाई कमी होत आहे
सरकारी कागदावर पहा झुणका भाकर मोफत आहे
चोपदरी मार्गावर लिहून पुढे रस्ता जाम चालू आहे
गोंधळ कसला इथे काम चालू आहे ...........

प्याकेज देवून पहा हे कृषी प्रधान देश वाचवत आहे
एका भाकरीची भूक तुकड्यावर भागवत आहे
कास्तकाराचा भरवश्यावर गाळणे घाम चालू आहे
लाख मोलाच्या पिकला जाहीर भाव छद्दाम चालू आहे
गोंधळ कसला इथे काम चालू आहे .....

सुरक्षेच्या नावाखाली करोडात कोण सुरक्षित आहे
परदेशातल पकडण्याच्या नादात घरातलं दूर्लकशीत आहे
शुssस.. शांतता बाळगा...आतंकवाद्यांचा इथे मुक्काम चालू आहे
गोंधळ कसला इथे काम चालू आहे ...

आम्ही दोघे मित्र पण कधीच भेटलो नाही

आम्ही दोघे मित्र पण कधीच भेटलो नाही
सोबतच हसलो आणि सोबतच रडलो

सोबत असूनही आमची कधीच नाही होत भेट
नियतीने निर्माण केले आमच्यामध्ये छोटेसे गेट

जीवनाच्या प्रत्येक क्षणाला सोबतच अनुभवतो
हसतो जसे सोबत तसे सोबतच रडतो

खंत ना कधी आम्हा आमच्या न भेटण्याची
स्पर्श ना एकमेकांचा गरजही न वाटे त्याची

आम्ही दोन डोळे आमची आशीच मैत्री
मिटलो तरी सोबत मिटू एवढीच देतो खात्री

आणी हे माझ्या त्या मैत्रीनी साठी... जिने मला.. सावरले..

आणी हे माझ्या त्या मैत्रीनी साठी...
जिने मला.. सावरले..

तूझ्या शी कधी कशी..
गट्टी जमली कळलेच नाही..
माझ्या मनातील मैत्रीची जागा..
कधी भरली कळलेच नाही..
माझ्या प्रत्येक दु:खावर..
तुझ्या मैत्रीने घातलीस फूंकर..
मी आता मात्र मी कसे फेडू तुझे उपकार..

माझ्या एका मैत्रीनी साठी... जिने मला जीवन काय आहे हे शिकवले..

खरच एक मैत्रिण असावी..
मी हसलो हि ती पण हसावी..
माझ्या डोळ्यातले अश्रु..
तिच्या डोळ्यातून वाहावे..
माझ्या मित्रांची गणती होताच..
तिनेही सामोरे यावे..

मैत्री म्हणजे औक्सिजन..

मैत्री म्हणजे औक्सिजन..
तिच्या शिवाय जगुच शकत नहि आपण..
मैत्री म्हणजे जिवन..
तिच्यत वाहून जातो सर्वजन..

मैत्री म्हणजे..
मनामनात रुजणं..
मैत्री म्हणजे.. हक्काने
एकमेकाच्या कानात कुजबुजनं..

तुझ्या मैत्रीने..
शिकवले जगायला..
जमिनीवर उभे राहून..
आकाश मुठीत धरायला..

एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना

कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा।

एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना
सोडूनी हात कधी पळतात वाटा।

पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते
जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा।

पाहूनी त्या वळणावर आसवांना,
काळोखाआड कधी गळतात वाटा।

कोणी बोले दुनिया तर गोल आहे
फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?

तीही सोडून मला वळनात गेली
तीच्या वाचून मला छळतात वाटा।

हो येथेच सुरवात , इथेच अंत
(कीती प्रवास असे गिळतात वाटा।

आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे

ब थेंब झिरपणारा ओलावा पिंपळवृक्ष बनून उभा राहतो, मी त्याला आई अशी हाक मारतो........
चला सलाम करू धन्य त्या मातेला...
----------------------------------------------
आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य शब्दात उतरवणं आहे ते अशक्य!!
तरी हा एक प्रयास आहे तिच्याच वाढदिवसाला छोटीशी एक भेट आहे ..
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.......

मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे
जिच्यामुळे मी, माझी कविता आहे
ती माझी......माझीच फक्त आई आहे.

कसे सांगू तुला की काय वाटले मला

कसे सांगू तुला
की काय वाटले मला
तू डियर म्हटल्यावर .........

शक्य असते तर
टिपले असते भाव
तुझ्या डोळ्यात दाटलेले
मला डियर म्हणताना ............

शक्य असते तर
पाहीले असतेस तुही
माझ्या मनात उठलेले वादळ
तुला डियर म्हणताना ............

सकाळी चहात साखर टाकायला विसरले
मॉर्निंगवॉक चा रस्ता चुकले
दाराच्या चोकटिला टक्कर घेतली
इस्री चा चटका बसला
चौकात सिग्नल तोडला

क्लासमध्येही मन नव्हते थाऱ्यावर
सर म्हणाले,काय आज मूड नाही ?
कुणी सांगावे त्यांना
काय होते माणसाला
कुणी डियर म्हटल्यावर

जेवतानाही भिरभिरत होते मन
आई म्हणाली , हें काय आवलक्षण
कुणी सांगावे तिला
काय झाले मला
तू डियर म्हटल्यावर

कसे सांगू तुला
काय झाले मला
तू डियर म्हटल्यावर ..............

ऐक शिवाजी हवा आहे

ऐक दिशा ऐक नेतृत्व
स्वीकारले प्रजेचे पितृत्व
वरून कठोर धीरगंभीर
आत प्रेमळ मातृत्व


तळागाळातील मराठी माणूस
ताठ मानेने केला उभा
मनामनात पेटवून मशाल
उजळवली स्वातंत्र्याची प्रभा

शेजारी तर जल्मावाच
तुझ्याही घरी हवा आहे
आता प्रत्येक घरात
ऐक शिवाजी हवा आहे

काय डौलाने झुलतेय ग

काय डौलाने झुलतेय ग ,

ती नथ तुझ्या नाकात . . .

सौंदर्य तर खुलतेय ग ,

पण अडथळा का प्रेमात . . .



प्रितीचे गुलाबी आकाश
आजून आहे दूर
तरी
क्षितिजाच्या पलीकडून
येत आहेत सुर

विणलेला प्रत्येक खोपा
ऐकत नाही पाखरांची चिवचिव
तरी
सुगरण खोपा विणत जाते
वेड ?,,,,कदाचित प्रेमही !

कुणी बोलते मनापासून
कुणी बोलते मानभावी
तरी
अर्थ आपणच लावत असतो
मनास भावतो तोच शक्यतो

जरा समजून घेऊ स्व:तहाला
एकमेकाच्या सहआस्तित्वाला
तरी
शक्यता जपून ठेवू योग्य वेळ येईपर्यंत
बस थोड़ी कळ काढ माय डियर तो पर्यंत

श्रावणाचा तो महीना होता

श्रावणाचा तो महीना होता
आपल्या शेवटच्या भेटीचा
पाउस असा कोसळत होता
जणु काही होता वळवाचा

आभाळ मनात दाटलेलं होतं
येथुन पुढच्या विरहाच्या दु:खाने
हिरवीगार झालेली धरा सुद्धा
खिन्न खिन्न वाटत होती मनाने

बरसणार्‍या एकेक सरींसोबत
एकेक आठवण न्हाऊन निघत होती
आठवणींची बरसात मनाला
चिंब चिंब भिजवत होती

पाउस डोळ्यातुनही बरसत होता
दाटलेलं आभाळ मोकळं करत होता
मनातल्या भावनांचा बांध नकळत
कधीचाच फुटलेला होता

बरसणार्‍या पावसात
डोळ्यातला अश्रु लपत होता
ओठ अबोल असले तरी
नजरा खुप काही सांगत होत्या

येणार्‍या हुंदक्यानां आवरताना
मन आपण निष्ठुर केलं होतं
हातातला हात सुटतानाचा
एकमेकांना दुर लोटलं होतं

डोळ्यात आसवे घेवुन
तु पाठमोरा वळला होता
तुझ्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत
दिस माझा क्षितीजापार कलला होता

थंडगार सुटलेला वारा सुद्धा
तुझा स्पर्श देउन जात होता
मनात मात्र विचार नी भावनांचा
पाठशिवणीचा खेळ सुरु झाला होता

श्रावणातला पाउस आता
कधीच मला भिजवत नाही
श्रुंगारलेली असली धरणी जरी
मन माझे आता फुलतच नाही

असे किती वेडात.......

पोहर्यात येणार कसे
जर नसेल आडात
दौडले वीर मराठे
असे किती वेडात.......

मनातले जळते मनात
ऐकलेले जीरते कानात
शब्दात लाचारी आणि
अपराधी नजर पुन्हा

कसे मिळेल पहीजेते
कसे होइल मनासारखे
धाडस नसेल छातीत तर
आपले माणूस होइल परके

Sunday, August 7, 2011

*काय म्हणालात तुम्ही कधीच प्रेम केलं नाही?

प्रेम केलं नाही?
*काय म्हणालात तुम्ही
कधीच प्रेम केलं नाही?

अहो कशावर प्रेम कराव?
विचारता कोणी प्रेम कराव?
अस का घाबरता राव?
ते म्हणतात प्रेम कुठेही कराव!

कशासाठी प्रेम कराव?
सांगा प्रेमाशिवाय कस जगाव?
मी तर म्हणतो प्रेम केलं नाही ?
फार काही बिघडल नाही!

केल्या नाही चार कविता!
मारल्या नाहीत गुलुगुलु गप्पा?
घेतला नाही तिचा हातात हात
केला नाही धडधडणाऱ्या हृदयाने कधी घात?

प्रेम केल नाही म्हणून काही सुचलं नाही?
अहो लय नाही म्हणून काही लिहीलं नाही!
प्रेम केल नाही म्हणून काही अडल नाही!
आयुष्यात विशेष काही घडल नाही?

आता म्हणाल, वाचुनही काही समजल नाही!
खरच सांगतो प्रेम केलं नाही म्हणून काही बिघडलं नाही
काय म्हणता माझे लेखन आवडल नाही?
आता मान्य कराल का तुम्ही कधीच प्रेम केल नाही?

Wednesday, August 3, 2011

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?
जीव न म्ह णजे
कुणाला माहित नसणारं
प्रत्येकाचं निरनिराळं
एक गोष्टीचं पुस्तक असतं

जन्म त्याची सुरुवात
मृत्यू त्याचा शेवट
दररोज त्याचं लिहितं एक पानं
कोणाच्या कधी मर्जीविना तर कधी मर्जीसहित

हार-जीत, राग-प्रेम यांना
असतं यात स्थान
सुख-दु:ख यांचे चढाव यात फार

हसायचं नसलं तरी हसावं लागतं
रडायला आलं तरी आवरावं लागतं

जीव न म्ह णजे
एक गोष्टीचं पुस्तक असतं
आव्हानं देऊन ते पूर्ण करायचं असतं
भातुकलीच्या डावासारखं
अर्धवट सोडायचं नसतं..........

केली का कन्यादान कचरा कुंडीला

केली का कन्यादान कचरा कुंडीला
जन्म द्यायचाच नव्हता तर का घडवले गोळ्याला

बाबा मला सांगा तुमच्यात नव्हती का हिम्मत
कधीच कळली नाही का तुम्हाला मुलीची किंमत
...
दानात दान श्रेष्ठ दान म्हणतात ना कन्यादान
काय देणार दान कसे बसणार ताठ करून मान

ना तुम्हाला मुलगी नाही मिळणार जावई
तुमचा दारात कधीच नाही वाजणार मंगल सनई

आई मला सांग तुझी ओटी आशी कशी ग खोटी
जन्म घेण्याआगोदरच मला लावलेस वाटी

काय माझी चूक काय माझे पाप
जन्म घेण्याआगोदरच यवढा मोठा शाप

मराठ्याची पोरे आम्ही , नाही भिनार मरनाला !

आम्हाला शिवरायांचा अभिमान आहे........मराठ्याची पोरे आम्ही , नाही भिनार मरनाला !
सांगुनी गेला कुणी शाहिर अवघ्या विश्वाला .
तीच आमुची जात शाहिरी मळवट भाळी भवानिचा
पोत नाचवित आम्ही नाचतो , दिमाख आहे जबानिचा.....जय भवानी / जय शिवाजी???

स्वप्नांचे पान मुंबई………

स्वप्नांचे पान मुंबई………

स्वप्नांचे पुर्णत्व येथे
स्वप्नांचे पान मुंबई

तरुणाईची सळसळ येथे
तारुण्याची जान मुंबई

वृत्तीतली धगधग येथे
जिवाचे रान मुंबई

मनामनाची ओढ येथे
मनातली जाण मुंबई

प्रीतीतला गोडवा येथे
प्रीतीचे गान मुंबई

लावण्य रुप्-सौंदर्य येथे
लावण्याची खाण मुंबई

नजर घायाळ होती येथे
नजरेचा बाण मुंबई

लखलखता श्रुंगार येथे
नटलेली छान मुंबई

क्षणाक्षणांस महत्त्व येथे
वेळेचे भान मुंबई

भविष्याची उज्वलता येथे
भविष्याचे ध्यान मुंबई

व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई

ध्येयाचे शिखर येथे
प्रगतीचे यान मुंबई

कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई

जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई

मराठीचे अस्तित्व येथे
मराठीचा मान मुंबई

महाराष्ट्राचा अभिमान मुंबई
देशाची शान मुंबई
आमचा प्राण मुंबई
स्वप्नांचे पान मुंबई………

खरं प्रेम म्हणजे

खरया प्रेमाची सुरूवातच तर नेमकी तेव्हां होते जेव्हां दोघं खरया अर्थाने जवळ येतात- मनाने, शरिराने! कायमचे..!!
खरं प्रेम म्हणजे दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.
खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे.
खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.
खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.
खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.
खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी, कायम जवळ असणे..

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?
जीव न म्ह णजे
कुणाला माहित नसणारं
प्रत्येकाचं निरनिराळं
एक गोष्टीचं पुस्तक असतं

जन्म त्याची सुरुवात
मृत्यू त्याचा शेवट
दररोज त्याचं लिहितं एक पानं
कोणाच्या कधी मर्जीविना तर कधी मर्जीसहित

हार-जीत, राग-प्रेम यांना
असतं यात स्थान
सुख-दु:ख यांचे चढाव यात फार

हसायचं नसलं तरी हसावं लागतं
रडायला आलं तरी आवरावं लागतं

जीव न म्ह णजे
एक गोष्टीचं पुस्तक असतं
आव्हानं देऊन ते पूर्ण करायचं असतं
भातुकलीच्या डावासारखं
अर्धवट सोडायचं नसतं..........

सांग ना सखे तूच आता

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना

मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?

एकाच वाटेचे पक्शी आपण
पण मी या दिशेला अन
तू विरुद्ध दिशेला जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?

मुक्त्त करुनि या बंधना

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना

मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?

एकाच वाटेचे पक्शी आपण
पण मी या दिशेला अन
तू विरुद्ध दिशेला जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?

नाही सीमा नाही बंधन

आकाशातील मी घन काळा
रोज शृंगारीत होतो मी
लेऊन रंग शलाका

नाही सीमा नाही बंधन
नभात स्वैर फिरणारा
मी मेघ-राजा

पण लोभ असा मज जडला
प्रवास संपून गार हवेच्या
प्रेमात जीव अडखळला

प्रीतीत तिच्या मी
जग विसरून गेलो
अस्तित्वास मुकून मी
बरसून गेलो

आसवांच्या झाल्या जलधारा
जीवनाचा हा खेळ सारा
जनम्न्यास पुन्श:छ नदीसागरात
मग देह माझा विलीन झाला

मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही.

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही.

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस.

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली.

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस
आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे.

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय..

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!

हे क्रांतिकारकांनो...!

बरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला..
देशासाठी आता वेळ आहे कुणाला?
बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला..
खाणं-पिणं, मौज-मजेला वेळ आम्हाला दिला

बरं झालं तुम्ही रक्त-मांस सांडलं..
सिमेंट-विटा समजून आम्ही घर त्यावर बांधलं
बरं झालं तुम्हीच चलेजाव म्हटलं..
संस्कार नि संस्कृतिला सहज आम्ही सोडलं

बरं झालं तुम्ही स्वातंत्र्य मिळविलं..
मुक्तपणे शील आम्ही वेशीला टांगलं
बरं झालं तुम्हीच तिरंगा फडकाविला..
प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला

बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला..
खुर्चीसाठी भांडणे पाहायची वाचला..!

Tuesday, August 2, 2011

तुम्हाला कोणते प्रेम आवडते...

कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
कधीच न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी

मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..

तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?

एक प्रवास मैत्रीचा

एक प्रवास मैत्रीचा
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा

Monday, August 1, 2011

तुझ्या विषयी बोलताना .........

असच “ Search” करता करता ........
तुला “Request” गेली ......
आज उद्या करता करता ........
तू “Add” झाली ......

तुझ्या विषयी बोलताना .........
खरच वेगळ “feel” होतंय ......
पण तुलाच ऐकायचं म्हणून .......
शब्द स्वताहून “Click” होतंय ......

तुझ्या डोळ्यांमध्ये लपली........
आहे आनंदाची डबी .......
ऐकल नाही तुला कधी .......
पण जाणवते मला गोड आवाजाची छबी .......

माझ्यासाठी सुंदर आहेस तू ......
हे सांगायचीच गरज नाही.........
बोलताना तुज्याशी माझा मीच रमून जातो.......
सतत राहव “Online “बाकी काहीच सुचत नाही .......

चेहरयावर तुज हास्य.......
माझ्यासाठी असाच राहो ......
या “वेगळ्या “ अश्या मित्रासाठी .....
हृदयात मात्र एक छोटीशी जागा ठेव ........