जरी आपण दूर तरी
प्रेम कमी होणार नाही
जीवनात सोबत नसलो तरी
मनाने दूर होणार नाही
फुला परी आहे रस्ता
तरी पाई रुते काटा,
आठवणीना येऊ लागे,
ओला रंग ओली छटा...
दोन पाय किती विसंगत असतात....
एक पुढे नि एक पाय मागे...
पुढच्याला गर्व नसतो....
मागच्याला अभिमान नसतो...
कारण त्याला माहित असत.....
क्षणात हे बदलणार असत...
याचंच नाव जीवन असत ..
No comments:
Post a Comment