Thursday, October 11, 2012

शिर्डीचे साईबाबा की सोन्याचे साईबाबा ???

शिर्डीचे साईबाबा की सोन्याचे साईबाबा ???
पडक्या मशिदीमधे फाटक्या चिंध्याने बांधलेले फळकुटावर झोपणारे , अत्यंत साधी रहाणी असणारे साईबाबा आणि आता कथाकथीत भक्तांनी त्यांना सोन्याने मढवुन टाकलेले त्यांचे रुप. बसायला सोन्याचे सिंहासन, सोन्यानी मढवलेला महाल, सोन्याची छत्रचामरे, सोन्याच्या पादुका, वेळ बघायला सोन्याचे ११ लाखाचे घड्याळ, सोन्याच्या पादुका आणि फिरायला सोन्याची पालखी. तरी नशीब चांगले अजुन तरी साईबाबांची संपुर्ण सोन्याची मुर्ती करण्याचे कोण्या धनवान भक्ताच्या मनात आलेले नाही. एक जमाना असा होता, शिर्डी एक खेडेगाव होते, अगदी तुरळक भावीक मंडळी यायची आणि त्यांची रहाण्याची सोय चक्क समाधी मंदिरात वरच्या मजल्यावर असलेल्या खोल्यांमधे केली जायची. आणि मग हळु हळु देवस्थानाचे रुपांतर संस्थानात, एका साम्राज्यात होत गेले. म्हणतात ना @शिर्डी वोही जाते हे जिन्हे साई बाबा बुलाते हे@ एक साईभक्त

No comments:

Post a Comment