Saturday, October 20, 2012
तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन .
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा,
श्री सद्चीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय .
तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन .
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ //
पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्याने ,
साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान ,
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ //
वाट असे ती वळणाची आले पायाला ते फोड ,
तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटती रे गोड ,
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ //
माझी बाप आणि आई तूच विठ्ठल रखुमाई ,
तुझ्या शिर्डी नगरात पांढरी ती मी पाहीन ,
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ //
पायी चालत येईन सुख दुख मी सांगीन
साई बाबा माझी सारी ती दुख निवारीन
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ //
तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन .//२//
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //५ //
श्री सद्चीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय .
आमोल घायाळ १२/१०/२०१२
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment