
Thursday, October 11, 2012
मजला आता डोळे तुझिया खुणवत होते
स्वप्नामध्ये मला कुणी ते हसवत होते
अवघड झाले मला निजाया निवांत आता
कोलाहल हा याच मनाचा अशांत आता
तिला तसे ते मोहक जगणे अवगत होते
स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते
झरझर निर्झर असा वाहतो वाटेवर या
सूर नवा हा असा छेडती तालावर या
धुंदी जगणे मला कधी ना समजत होते
स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते
तिथे कधी मी तुला भेटण्या आलो नाही
या वाऱ्याचा दरवळ मी तर झालो नाही
पुन्हा सारे मोह तुझे मज बोलवत होते
स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते
आज जगाला तुझी कहाणी रुचली नाही
मोहक सारी तुझीच काय दिसली नाही
उगाच पण ते याच रूपावर भाळत होते
स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते
लिहून झाल्या माझ्या साऱ्या त्याच कवीता
या दुनियेच्या वळणावरती गिरवत कित्ता
या शब्दांचे भान मला न राहवत होते
स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते
निसर्ग ओला जगतो आहे आज दग्याने
पाऊस अता पडतो आहे आज नव्याने
मला मुक्त ते उडण्यासाठी फसवत होते
स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment