
Thursday, October 11, 2012
वाट पाहतेय तुझ्या डोळ्यातले अश्रू संपण्याची
पहिल्या नजरेतील प्रेमाची गोष्ट
अनेकदा कानावरी आली होती
विश्वास बसला होता कथेवरी त्या
माझ्याही कथेची सुरुवात आज होती...
वाट पाहतेय तुझ्या डोळ्यातले अश्रू संपण्याची
वाट पाहतेय विरहातील हूर हूर संपण्याची
वाट पाहतेय तुझ्या भेटीची त्या निशब्द सहवासाची
वाट पाहतेय त्या बेधुंद नजरेची
गोड हास्याची अन न बोलता व्यक्त होणारया त्या विचारांची ,
वाट पाहतेय फक्त तुझ्यात गुंतून सर्व काही विसरण्याची ........~~
वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा
खुपदा तू दूर असून
जवळ असल्याचा भास होतो
भास झाल्याचा कळल्यावर
जीवास खूप त्रास होत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment