खूप ओढ असते...
लाटानाही किनार्याची ....
नाही मानत मी त्यातला विरह
समजतो रीतच अशी या सागराची
होते तुझेच शब्द सारे वेड्या
तुझ्याच मनाची व्यथा बोलायचे
ना जाणले कोणी हुंदके मुक्या हृदयाचे
शब्दच तुझे भाव व्यक्त करायचे...
सहज शब्दांसी गुंफणारा तू
स्वताच आज तू हरवलास
जन्म घेतला होता कवीने त्या
अन अस्तित्व स्वताचे तू विसरलास...
No comments:
Post a Comment