
Thursday, October 11, 2012
पण तू माझी नाहीये......
एक वेळ होती कि मी रोज नव्या नव्या मुलीच्या प्रेमात पडायचो
पण आत्ता कळाले ते प्रेम नसून आकर्षण असायचं
आणि आज मला खर खुर प्रेम झालय
आकर्षण आणि प्रेम काय असतं ते कळू लागलय
आकर्षण आणि प्रेम जरी वेगळे असले तरी
प्रेम हे कायमचे आकर्षण असते ते समजू लागलय
तूच आहेस आयुष्य माझ
मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो
हे आत्ता अनुभवलंय
ह्यात तुझ काही चुकले नाहीये ,
मीच चुकतोय हे मला कळतंय
पण काय करू ते कळत नाहीये
माझ्या आजारावर औषध नाहीये
जे औषध आहे ते माझे नाहीये
जगायचं पण मरण अनुभवतोय
आणि तुझ्या सोबतीची मागणी पण माझी नाहीये
मी तर तुझा झालोय पण तू माझी नाहीये
मला तुझ उत्तर माहित आहे पण
ते उत्तर माझ्या प्रश्नाच समाधान नाहीये
तू दुसर्याच्या घरात प्रकाश पसरवशील
तुझ्या दिव्याच्या ज्योतीतली एक किरण पण माझी नाहीये
तुझ समजावण अगदी बरोबर आहे
पण ते समजण्याची समज माझ्यात नाहीये
तुझ्या थांबव्ण्याने मी थांबलो नाही आणि आज
सहन करण्याची शक्ती पण माझ्यात नाहीये
मी तर तुझा झालोय पण तू माझी नाहीये
श्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment