Thursday, October 11, 2012

कुणाची तरी सोबत हवी असते

कोड्यात पडले मन वेडे माझे ना विचारांचे उलगडले कोडे लिहिण्यास आज मजपाशी ना उरले होते शब्द मजकडे... कुणाची तरी सोबत हवी असते आपल्या एकाकी विश्वात या कुणाची तरी साथ हवी असते. कितपत हे विश्व वाळवंठ एकांतानेच चालायचे अडखळनार्या पावलांना कितपत स्वताच सावरायचे जळ फळीत ते उन्हाचे झोके कितपत एकट्यानेच झेलायचे आपल्यावर हि प्रेमाची सावली देणार्याला कितपत केवळ अपेक्षेने स्वप्नात पहायचे वास्तव कधी त्याचे होईल का ? स्वप्नात रेखाटलेले चित्र त्याचे सत्यात कधी उतरेल का आशा आणि अपेक्षानाच घेऊन आयुष्याला रेटायचे त्या हि संपत चाल्यात आता पुढ्यातले आयुष्य त्यांच्या शिवायच जगायचे.

No comments:

Post a Comment