Thursday, October 11, 2012

♥♥♥ फक्त तुझी आठवण ♥♥♥

अनमोल जीवनात साथ तुझी हवी, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा, आले - गेले किती हि, उन्हाळे - पावसाळे तरी हि, न डगमगनारा विश्वास फक्त तुझा हवा..... वेळ लागला तरी चालेल, पण वाट तुझीच पाहीन, विसरलीस तू मला तरीही, नेहमी मी तुझाच राहीन....... तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्या शिवाय माझं जीवन अपूर्ण आहे, तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच शेवट आहेस........ तुझ्या प्रेमाचा सुगंध मला देशील का ? विसरून सारे जग माझ्या पाशी येशील का ?? मला तुझे " प्रेम " हवे आहे, तू मला मरेपर्यंत " प्रेम " करशील का ??? आता तूच सांग या हृदयाचे काय करू, जे फक्त तुझ्या नावाने धडकते, तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण ते भेटण्यास तेवढेच तडपते..... कसे आहे हे जग, अजून समजू शकलो नाही, विखुरलेले स्वप्न एक वाटू शकलो नाही, कदाचित मीच वाईट असणार, जे तुझ्या हृदयात उतरू शकलो नाही....... ♥♥♥ फक्त तुझी आठवण ♥♥♥

No comments:

Post a Comment