Thursday, October 11, 2012

आसवांनी मी असा हा भिजत आहे

ठरवल होत खूप काही.... तुझ्या असण्यात मी मला जपाव तुझ्या मोहक रुपात मी मला पहाव ठरवल होत खूप काही.... तुझ्या कुशीत मी हलकेच याव नि तुझा हात धरून क्षितिजाकडे पोह्चाव तुझ्या रडण्यास सखे कधी नव्हते दुर्लक्ष माझ्या रडण्यासही काळोख आहे साक्ष आसवांनी मी असा हा भिजत आहे पावसाचे हे न काही घडत आहे....! स्वप्न माझी ही कुठे का हसत होती? भंगल्याने झोप माझी कण्हत आहे ! का नवे देतेस आश्वासन गुलाबी? हे कमी का रोज मी 'हा' बनत आहे? काय वाटे पाहता धूर जमलेला? मीच आतून हा माझा जळत आहे... काय होकारात काही बदल होते? मी न होकारास त्या हो म्हणत आहे ते कधी हो हारले जे रडत होते? शर्यतीला मी न त्यांच्या पळत आहे... bhannat

No comments:

Post a Comment