अनाथ मुलीचे मनोगत)
...
झाले मी मोठी आता
कळले मज सारे काही
पण ममता ,आपलुकी
तुझी कधी मिळालीच नाही
कशी सोडलीस तू मला
इवलीशी मी असताना
काहि कसे वाटले नाही
रडणे माझे ऐकताना
लाज वाटते मज आता
तुजला आई म्हणताना
काय माहित तुला, कशा
भोगल्या मनाच्या यातना
नको आई, नको बाबा
नको मला कोणीही
अनाथ आहे मी तरी
पाठीशी आहे माझा हरी .
No comments:
Post a Comment