
Thursday, October 11, 2012
शब्द संपतात तिथे स्पर्श
वेड्या मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय.... आता काही सुचतच नाही...
तू तू अन फक्त तूच, त्याच्याशिवाय दुसर काही दिसतच नाही...
अबोल हि प्रीत माझी, तुला कधीच कळत नाही...
अन वेड हे मन माझ, तुला पहिल्याशिवाय काही राहवत नाही... :)
लाटांचे तर कामच असते
समुद्रावर येऊन आद्ळायचं
क्षणभर किनार्य्ला मिठी मारून
जीवनभर विरहात जाळायचं
जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करते...
ही भाषा शिकावी लागत नाही....
अंतरमनाचे धागे जुळले ना की स्पर्शाची भाषा आपोआपच येते...
भांडता भांडता तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर हळूच विसावलेले त्याचे होठ...
अन त्याक्षणी एका अनामिक ओढीने त्याला बिलगून तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी तिची मिठी...
ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णत्व द्यायची ताकद शब्दांत नाही... तिथे फक्त स्पर्शाचीच भाषा लागते...
शब्द या सर्व भावनांना फक्त जन्म देतात...
पण त्या खऱ्या अर्थाने "जगायला" ते स्पर्श अनुभवावेचं लागतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment