Thursday, October 11, 2012

किती म्हणून रे लिहावं

तुझी वाट बघून थकलेल्या डोळ्यांना निजवतो आहे, तुझ्या माझ्या भेटीसाठी स्वप्नांचा गाव सजवतो आहे.... किती म्हणून रे लिहावं माझ्या या मनातलं रात्रीला मांडत बसावं जसं चांदण उन्हातलं....... किती म्हणून रे लिहावं मी दुखः हे प्रारब्धातलं जाणून कोण घेतो इथे दुखः माझ्या शब्दातलं किती म्हणून रे लिहावं कागदावरी फक्त साज भेटला न अजुनी सये त्या जखमेवरी इलाज किती म्हणून रे लिहावं लिहायचं म्हणून लिहायचं शब्दांच्या वर्तमानातून का माझ्या भूतकाळात पाहायचं किती म्हणून रे लिहावं आज गुदमरला श्वास हात सुटला लेखणीचा अन डगमगला विश्वास k p bhannat

No comments:

Post a Comment