Thursday, October 11, 2012

एक जीवाभावाची मैत्रीण असावी,

एक जीवाभावाची मैत्रीण असावी, पण अर्ध्या रस्त्यात सोडून जाणारी नसावी समजून घेणारी, जीवाला जीव देणारी, पण विश्वासघात करणारी नसावी सुखात सामील होणारी, दु:खात धीर देणारी, पण स्वत:चा स्वार्थ साधणारी नसावी केलेल्या चुका समजून सांगणारी- वेळ प्रसंगी ओरडणारी, पण चुकांवर पांघरूण घालणारी नसावी थोडी मस्ती करणारी, लटकेच रागावणारी, पण खरोखरच भांडनारी नसावी संकटाना धैर्याने सामोरी जाणारी, त्याच्याशी लढणारी, पण धीर सोडणारी नसावी एक जीवाभावाची मैत्रीण असावी..............

No comments:

Post a Comment