मंतरलेला दिवस
मंतरलेल्या त्या रात्री
समाधानाची का आज
देतायत अनुभूती .....
तेच घर तेच दार
तीच चूल त्याच भिंती
संसार घरकुलाची
आज नवी परिमिती ...
तीच पाने तीच झाडे
नवे गाणे गाती पक्षी
तीच फुले त्याच वेली
दिसे मला नवी नक्षी ........
मावळतीचा तो दिन
संधीप्रकाश न सांज
भेटते का पुन्हा अशी
लेवून नवा हा साज
नवा दिन नवे स्वप्न
राही निराशा ती दूर
घडे आज काही नवे
गवसला नवा सूर
वैशाली
No comments:
Post a Comment