फुलपाखर सारखं स्वच्छंद असो
की परागकण सारखे बंधिस्त
दोन्ही आपल्याच भावना त्या
कशी लावायची मनाला ह्या शिस्त ?
वार्या सारखं खोडकर असो
की झऱ्या सारखे अवखळ
जगताना आयुष्य हे सदा
का नियमांची ठरते अडगळ?
कुणी आपल्यावर प्रेम करावं
की आपण त्याच्यावर करावं
भल्या पहाटेचं स्वप्न ना ते मग
का म्हणून ते अपूर्ण ठरावं ????
कळीचं उमलणं असो सये
की असो फुलाचं कोमजणं
खरचं किती कठीण असतं ना
कुणाचं तरी मन समजणं ?.
No comments:
Post a Comment