Thursday, October 11, 2012

भावनांचे पीळ त्या नात्यातले

खरं सांगायचं तर..... आज-काल मैत्री करायचीदेखील खुप भीती वाटते । कारण.... कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते । बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या नात्यातले, काही केल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देऊन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेऊन जातात । ओलावा त्या डोळ्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली.. पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली मैत्री ही अशी...? हा प्रश्न मला सतावत राहतो । पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो ॥ आणि त्रास फक्त मलाच होतो .. जीव फक्त माझाच घुटमळतो. हृदय फक्त माझंच जळत ...

No comments:

Post a Comment