Thursday, October 11, 2012

फकीर साईबाबा

फकीर साईबाबा *साईबाबांचे* मुळ नांव, त्यांचे आई वडील या विषयी कोणालाही माहिती नाही. त्यांचा कालावधी अंदाजे १८३८ ते १९१८ असा मानतात. बाबा कोणाचे आवतार आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. राम-कृष्ण-हनुमान-शंकर-गणपती-गु रु दत्तात्रेय, स्वामी समर्थ, माणिकप्रभू इ. संबंध श्री साईबाबांच्या अवताराविषयी पोचतो. साईबाबांची धुनी, उदी, त्यांचा हिंदु-मुसलमान भक्त परिवार, त्यांचे एकत्रितपणे वागणे, गोरगरीबांविषयी करुणा, हे ध्यानात घेता त्यांना दत्तावतारात स्थान देण्यात आले आहे. साईबाबा हे नाथपंथीय दत्तात्रेयांचे अवतार असल्याचे अनेकांना मान्य आहे. पुढे चांदभाईंच्या घरी लग्न कार्य झाले. त्यांचे वऱ्हाड शिरडीस येणार होते. त्या वर्हाडाबरोबर हा तरुण फकीर शिरडीत आला. प्रथम खंडोबाच्या देवळात गेला. तेथे वडाच्या झाडाखाली चिलिम फुंकत बसले असता देवळाचे मालक म्हाळसापती सोनार तेथे आले. त्यांनी फकीरास पाहून ।।आवो साई।। असे म्हटले. तेव्हापासून फकीर साईबाबा म्हणून ओळखू लागले. बाबांचे वागणे- बोलणे वरवर पाहता वेड्यासारखे होते. हातात पत्र्याचे टमरेल, मळकट कापडाची झोळी, अंगावर एखादी कफनी अशा वेशात बाबा भिक्षा मागत. खाण्या पिण्याची शुद्ध त्यांना नव्हती. काही दिवसांनी ते पडक्या मशिदीत राहू लागले. त्यांच्या वास्तव्याने हीच जागा पुढे ।। व्दारकामाई।। म्हणून प्रसिद्ध झाली

No comments:

Post a Comment