
Thursday, October 11, 2012
मैत्रीचे प्रेम मिळवण्यासाठी
कोणी म्हणत मी खूप
कठोर स्वभावाचा आहे
तर कोणी म्हणत मी
खूप मृदू भाषिक आहे
Attitude म्हणतात ज्याला
तुम्ही सर्व जन इंग्लिशमध्ये
जाणून बुजून त्याला दूर सारून
जगतो मी "त्याच" धुंदीमध्ये
करत आलो नवनवीन प्रयत्न
मित्रांना आपले करण्यासाठी
प्रेमाचा स्वार्थ साधला मीही
मैत्रीचे प्रेम मिळवण्यासाठी
हटके असतात निर्णय माझे
सहजच त्याला एकमत मिळतो
तुटत असेलही मन एकाचेतरी
समजावण्याचाही प्रयत्न मी करतो
मीच कधी जाणून घेतला नाही
कसा आहे माझा स्वतःचा स्वभाव
तुम्हीच आजवर सांगत आलात
आपलेसे करतात तुझे हरेक हावभाव
कवितेतून सागण्याचा माझा मित्रांनो
हा पहिलाच केलेला आहे प्रयत्न
दाद मागण्याची अपेक्षा नाही करणार
कारण स्वतःस मानत नाही मी रत्न ;)
एम.डी.♥
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment