Saturday, October 20, 2012

तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन .

अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा, श्री सद्चीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय . तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन . साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्याने , साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान , साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // वाट असे ती वळणाची आले पायाला ते फोड , तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटती रे गोड , साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // माझी बाप आणि आई तूच विठ्ठल रखुमाई , तुझ्या शिर्डी नगरात पांढरी ती मी पाहीन , साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // पायी चालत येईन सुख दुख मी सांगीन साई बाबा माझी सारी ती दुख निवारीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन .//२// साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //५ // श्री सद्चीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय . आमोल घायाळ १२/१०/२०१२

Thursday, October 11, 2012

मैत्रीण Miscall देऊन वैताग आणणारी, नेहमी Blank Message पाठवणारी , हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल , वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out करणारी, मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून पोट दुखेपर्यंत हसवणारी , काही आगळीक घडली तर सणसणीत मुस्कटात ठेवणारी , आपण न सांगताच आपल्या मनातलं ओळखणारी , कोणाच्याही समोर थट्टा केल्यावरन चिडणारी, थोडीशी Short - Tempered , अशीही एखादी मैत्रीण असावी ..

sai baba old photo

sai nath maharaj ki jai

पण तू माझी नाहीये...... एक वेळ होती कि मी रोज नव्या नव्या मुलीच्या प्रेमात पडायचो पण आत्ता कळाले ते प्रेम नसून आकर्षण असायचं आणि आज मला खर खुर प्रेम झालय आकर्षण आणि प्रेम काय असतं ते कळू लागलय आकर्षण आणि प्रेम जरी वेगळे असले तरी प्रेम हे कायमचे आकर्षण असते ते समजू लागलय तूच आहेस आयुष्य माझ मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो हे आत्ता अनुभवलंय ह्यात तुझ काही चुकले नाहीये , मीच चुकतोय हे मला कळतंय पण काय करू ते कळत नाहीये माझ्या आजारावर औषध नाहीये जे औषध आहे ते माझे नाहीये जगायचं पण मरण अनुभवतोय आणि तुझ्या सोबतीची मागणी पण माझी नाहीये मी तर तुझा झालोय पण तू माझी नाहीये मला तुझ उत्तर माहित आहे पण ते उत्तर माझ्या प्रश्नाच समाधान नाहीये तू दुसर्याच्या घरात प्रकाश पसरवशील तुझ्या दिव्याच्या ज्योतीतली एक किरण पण माझी नाहीये तुझ समजावण अगदी बरोबर आहे पण ते समजण्याची समज माझ्यात नाहीये तुझ्या थांबव्ण्याने मी थांबलो नाही आणि आज सहन करण्याची शक्ती पण माझ्यात नाहीये मी तर तुझा झालोय पण तू माझी नाहीये श्री
फुलपाखर सारखं स्वच्छंद असो की परागकण सारखे बंधिस्त दोन्ही आपल्याच भावना त्या कशी लावायची मनाला ह्या शिस्त ? वार्या सारखं खोडकर असो की झऱ्या सारखे अवखळ जगताना आयुष्य हे सदा का नियमांची ठरते अडगळ? कुणी आपल्यावर प्रेम करावं की आपण त्याच्यावर करावं भल्या पहाटेचं स्वप्न ना ते मग का म्हणून ते अपूर्ण ठरावं ???? कळीचं उमलणं असो सये की असो फुलाचं कोमजणं खरचं किती कठीण असतं ना कुणाचं तरी मन समजणं ?.

कधी आठवण आली तर

रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जे बंध जुळतात, त्या "रेशमी" बंधाला "मैञी" म्हणतात... कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस. . जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस. . कधी भेटशिल तिते एक स्माईलदेउन बोलायला विसरु नकोस. . कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस.
मंतरलेला दिवस मंतरलेल्या त्या रात्री समाधानाची का आज देतायत अनुभूती ..... तेच घर तेच दार तीच चूल त्याच भिंती संसार घरकुलाची आज नवी परिमिती ... तीच पाने तीच झाडे नवे गाणे गाती पक्षी तीच फुले त्याच वेली दिसे मला नवी नक्षी ........ मावळतीचा तो दिन संधीप्रकाश न सांज भेटते का पुन्हा अशी लेवून नवा हा साज नवा दिन नवे स्वप्न राही निराशा ती दूर घडे आज काही नवे गवसला नवा सूर वैशाली
तुझे अन माझे नाते सागरात सामावणाऱ्या निर्मळ नदीसारखे, तुझे अन माझे नाते फुलास बिलगणाऱ्या वेड्या भुंग्यासारखे, तुझे अन माझे नाते चंद्रास एकटक पाहणाऱ्या प्रेमवेड्या चाकोरासारखे, तुझे अन माझे नाते झाडाला कवटाळनार्या कोवळ्या वेलीसारखे, तुझे अन माझे नाते उन्हात सुखावणाऱ्या थंडगार वाऱ्यासारखे, तुझे अन माझे नाते तसेच सर्वांसारखेच तरी निराळे, जमिनीवर राहून सुद्धा आकाशापर्यंत पोचणारे, मनाच्या कुपीत दडवून ठेवलेल्या प्रेमरूपी अत्तरासारखे, असे हे नाते तुझे अन माझे शिंपल्यात जपून ठेवलेल्या सुंदरमौल्यवान मोत्यासारखे....!
मजला आता डोळे तुझिया खुणवत होते स्वप्नामध्ये मला कुणी ते हसवत होते अवघड झाले मला निजाया निवांत आता कोलाहल हा याच मनाचा अशांत आता तिला तसे ते मोहक जगणे अवगत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते झरझर निर्झर असा वाहतो वाटेवर या सूर नवा हा असा छेडती तालावर या धुंदी जगणे मला कधी ना समजत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते तिथे कधी मी तुला भेटण्या आलो नाही या वाऱ्याचा दरवळ मी तर झालो नाही पुन्हा सारे मोह तुझे मज बोलवत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते आज जगाला तुझी कहाणी रुचली नाही मोहक सारी तुझीच काय दिसली नाही उगाच पण ते याच रूपावर भाळत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते लिहून झाल्या माझ्या साऱ्या त्याच कवीता या दुनियेच्या वळणावरती गिरवत कित्ता या शब्दांचे भान मला न राहवत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते निसर्ग ओला जगतो आहे आज दग्याने पाऊस अता पडतो आहे आज नव्याने मला मुक्त ते उडण्यासाठी फसवत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते
सवय अजूनही आहे...... तू निघून गेल्यावर तुझी वाट पाहण्याची, सवय अजूनही आहे...... बदललोय मी आता असं म्हणतात सारे विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची सवय अजूनही आहे……!!!! बदललाय मी माझा रस्ता शोधल्यात आता नव्या वाटा पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची सवय अजूनही आहे……!!! रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर आजही वाटतो फिका,चंद्र तुझ्यासमोर अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची सवय अजूनही आहे……!!!! माझा आणि देवाचा तसा छत्तीसचा आकडा आहे… पण गेलोच देवळात कधी तर तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची सवय अजूनही आहे……!!! आताही जागतो मी रात्रभर चांदण्यांनाही झोप नसते क्षणभर मग आमच्या गप्पा रंगल्या की चांदण्यांना तुझ्या गोष्टी सांगण्याची सवय अजूनही आहे……!!! एकटा-एकटा आता राहू लागलोय मी दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही तुझ्या स्वप्नांत जगण्याची सवय अजूनही आहे……!!!

कुणाची तरी सोबत हवी असते

कोड्यात पडले मन वेडे माझे ना विचारांचे उलगडले कोडे लिहिण्यास आज मजपाशी ना उरले होते शब्द मजकडे... कुणाची तरी सोबत हवी असते आपल्या एकाकी विश्वात या कुणाची तरी साथ हवी असते. कितपत हे विश्व वाळवंठ एकांतानेच चालायचे अडखळनार्या पावलांना कितपत स्वताच सावरायचे जळ फळीत ते उन्हाचे झोके कितपत एकट्यानेच झेलायचे आपल्यावर हि प्रेमाची सावली देणार्याला कितपत केवळ अपेक्षेने स्वप्नात पहायचे वास्तव कधी त्याचे होईल का ? स्वप्नात रेखाटलेले चित्र त्याचे सत्यात कधी उतरेल का आशा आणि अपेक्षानाच घेऊन आयुष्याला रेटायचे त्या हि संपत चाल्यात आता पुढ्यातले आयुष्य त्यांच्या शिवायच जगायचे.

जीवन सुंदर आहे जागून पहा

जीवन सुंदर आहे जागून पहा व्यर्थ जाऊ देऊ नका... अपयश आल तर खचू नका त्यातून सावरण्याचा प्रयत्न करा जर आपल माणूस रागवल तुमच्यावर तर लगेच मनवा त्यांना कारण EGO आणि PREMA च्या युध्दात बहुतेकदा EGO जिँकतो! दुःखाच्या विरहात दोघेही जळतात। आणि शेवटी पश्चातापाची राख उरते।

त्रास मला भोगावा लागतो

मनाला एकदा आसेच विचारले का इतका तिच्यात गुंततो ? नाही ना ती आपल्यासाठी मग का तिच ्यासाठी झुरतो ? कळत नाही तुला त्रास मला भोगावा लागतो आश्रूं मधे भिजून भिजून रात्र मी जागतो. ... मी म्हटले मनाला का स्वप्नात रमतो? तिच्या सुखा साठी तू का असा दुखात राहतो ? मन म्हणाले प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा आपण स्वता ला विसरतो सार काही तिच्यासाठी ईतकेच मनाला समजावतो..

मनातुन येणा-या आठवणी

ङोळयातुन येणार पाणी कोणीतरी पाहणार असाव, हृदयातुन येणार दुःख कोणीतरी जाणणार असा व, मनातुन येणा-या आठवणी कोणीतरी समजणार असाव, जीवनात सुःख-दु:खात साथ देणार एक कोणीतरी असाव.....♥ जगायचं असेल अतर सूर्या सारख जागा.. जो स्वतः जळत राहतो मात्र इत्तारांच्या जीवनात प्रकाश आणतो...

आसवांनी मी असा हा भिजत आहे

ठरवल होत खूप काही.... तुझ्या असण्यात मी मला जपाव तुझ्या मोहक रुपात मी मला पहाव ठरवल होत खूप काही.... तुझ्या कुशीत मी हलकेच याव नि तुझा हात धरून क्षितिजाकडे पोह्चाव तुझ्या रडण्यास सखे कधी नव्हते दुर्लक्ष माझ्या रडण्यासही काळोख आहे साक्ष आसवांनी मी असा हा भिजत आहे पावसाचे हे न काही घडत आहे....! स्वप्न माझी ही कुठे का हसत होती? भंगल्याने झोप माझी कण्हत आहे ! का नवे देतेस आश्वासन गुलाबी? हे कमी का रोज मी 'हा' बनत आहे? काय वाटे पाहता धूर जमलेला? मीच आतून हा माझा जळत आहे... काय होकारात काही बदल होते? मी न होकारास त्या हो म्हणत आहे ते कधी हो हारले जे रडत होते? शर्यतीला मी न त्यांच्या पळत आहे... bhannat

भावनांचे पीळ त्या नात्यातले

खरं सांगायचं तर..... आज-काल मैत्री करायचीदेखील खुप भीती वाटते । कारण.... कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते । बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या नात्यातले, काही केल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देऊन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेऊन जातात । ओलावा त्या डोळ्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली.. पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली मैत्री ही अशी...? हा प्रश्न मला सतावत राहतो । पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो ॥ आणि त्रास फक्त मलाच होतो .. जीव फक्त माझाच घुटमळतो. हृदय फक्त माझंच जळत ...

जोश्यांची पल्लवी.

एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबतबसला होता. समोरून एक वृद्ध माणूस येतो आणित्यामुलाला विचारतो, काय रे हीच का आपली संस्कृती? मुलगा म्हणतो- नाही आजोबा हि तर जोश्यांची पल्लवी.

पण तुला कसा विसरू

जीवनात अशा काही व्यक्ती येतात आणि अशी नाती बनवून जातात कि ती नाती विसरता येत नाहीत आपलं नातं हि याचपैकी एक आहे - प्रेमाचं मग मी तुला कसा विसरू शकतो! तुझ्या आठवणी हळुवार पावलांनी माझ्या हृदयाचे दरवाजे ठोकवतात माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर तुझीच स्वप्न राज्य करतात मग, मी तुला कसा विसरू शकतो! माझ्या ओठांवर सदैव तुझ्याच गोष्टी असतात डोळ्यात तुझीच स्वप्न हृदयात तुझीच मूर्ती मग, मी तुला कसा विसरू शकतो! तुझ्याविना जगणं, हा विचारच मला सोसवत नाही कारण, माझं अस्तित्व, माझं जीवन माझं आयुष्य, माझं सर्वस्व तुझ्यावरच अवलंबून आहे मग, मी तुला कसा विसरू शकतो! मित्रांसकट तुही म्हणालीस "मला विसर" म्हणून पण तुला कसा विसरू हेच मला कोणी संगत नाही मग, मी तुला कसा विसरू शकतो! तुझा विरह सोसनं म्हणजे माझ्यासाठी तर ती जीवघेणी शिक्षा आहे, तरीही तुझा विरह सोसेन मी पण, पुन्हा बोलू नकोस मला विसर म्हणून कारण मी तुला विसरू शकत नाही! तुला विसरणं माझ्यासाठी फारच कठीण आहे कारण माझं पाहिलं प्रेम तूच आहेस आणि पाहिलं प्रेम विसरणं इतकं सोपं असतं का? नाही ना...... मग तूच संग मला आता मी तुला कसा विसरू शकतो! ╰» श्री • » सर्वांचा लाडका ना मी -

वाट पाहतेय तुझ्या डोळ्यातले अश्रू संपण्याची

पहिल्या नजरेतील प्रेमाची गोष्ट अनेकदा कानावरी आली होती विश्वास बसला होता कथेवरी त्या माझ्याही कथेची सुरुवात आज होती... वाट पाहतेय तुझ्या डोळ्यातले अश्रू संपण्याची वाट पाहतेय विरहातील हूर हूर संपण्याची वाट पाहतेय तुझ्या भेटीची त्या निशब्द सहवासाची वाट पाहतेय त्या बेधुंद नजरेची गोड हास्याची अन न बोलता व्यक्त होणारया त्या विचारांची , वाट पाहतेय फक्त तुझ्यात गुंतून सर्व काही विसरण्याची ........~~ वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा खुपदा तू दूर असून जवळ असल्याचा भास होतो भास झाल्याचा कळल्यावर जीवास खूप त्रास होत

शेवटचे फक्त मला सजना

शेवटचे फक्त मला सजना तुला मन भरून बघायचंय तुझ्या कवेत क्षणभर येवून जगाला थोड विसरायचं आठवते का ग तुला माझी ती गच्च मिठी हळूच जवळीक साधताना ओठांची ओंठाशी झालेली गट्टी

एक जीवाभावाची मैत्रीण असावी,

एक जीवाभावाची मैत्रीण असावी, पण अर्ध्या रस्त्यात सोडून जाणारी नसावी समजून घेणारी, जीवाला जीव देणारी, पण विश्वासघात करणारी नसावी सुखात सामील होणारी, दु:खात धीर देणारी, पण स्वत:चा स्वार्थ साधणारी नसावी केलेल्या चुका समजून सांगणारी- वेळ प्रसंगी ओरडणारी, पण चुकांवर पांघरूण घालणारी नसावी थोडी मस्ती करणारी, लटकेच रागावणारी, पण खरोखरच भांडनारी नसावी संकटाना धैर्याने सामोरी जाणारी, त्याच्याशी लढणारी, पण धीर सोडणारी नसावी एक जीवाभावाची मैत्रीण असावी..............

सहज शब्दांसी गुंफणारा तू

खूप ओढ असते... लाटानाही किनार्याची .... नाही मानत मी त्यातला विरह समजतो रीतच अशी या सागराची होते तुझेच शब्द सारे वेड्या तुझ्याच मनाची व्यथा बोलायचे ना जाणले कोणी हुंदके मुक्या हृदयाचे शब्दच तुझे भाव व्यक्त करायचे... सहज शब्दांसी गुंफणारा तू स्वताच आज तू हरवलास जन्म घेतला होता कवीने त्या अन अस्तित्व स्वताचे तू विसरलास...

किती गोड आहे म्हणून सांगू ती..

किती गोड आहे म्हणून सांगू ती.. किती गोड आहे म्हणून सांगू ती.. एरवी अगदी खळखळून हसते, पण ????? मी हात पकडला की गोड लाजते.. ...जीन्स टी शर्ट रेगूलरी घालते, पण ????? पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते.. साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते, पण ????? मोबाईल मध्ये फोटो काढतो म्हणालो तर नाही म्हणते.. पिज्जा बर्गर सर्रास खाते, चहा मात्र बशीत ओतुनचं पिते.. लोकांसमोर खुप बोलते, मला I Love You म्हणताना मात्र फक्त Same 2 You चं म्हणते. :(

शब्द संपतात तिथे स्पर्श

वेड्या मनाला माझ्या, तुझ्याशिवाय.... आता काही सुचतच नाही... तू तू अन फक्त तूच, त्याच्याशिवाय दुसर काही दिसतच नाही... अबोल हि प्रीत माझी, तुला कधीच कळत नाही... अन वेड हे मन माझ, तुला पहिल्याशिवाय काही राहवत नाही... :) लाटांचे तर कामच असते समुद्रावर येऊन आद्ळायचं क्षणभर किनार्य्ला मिठी मारून जीवनभर विरहात जाळायचं जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करते... ही भाषा शिकावी लागत नाही.... अंतरमनाचे धागे जुळले ना की स्पर्शाची भाषा आपोआपच येते... भांडता भांडता तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर हळूच विसावलेले त्याचे होठ... अन त्याक्षणी एका अनामिक ओढीने त्याला बिलगून तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी तिची मिठी... ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णत्व द्यायची ताकद शब्दांत नाही... तिथे फक्त स्पर्शाचीच भाषा लागते... शब्द या सर्व भावनांना फक्त जन्म देतात... पण त्या खऱ्या अर्थाने "जगायला" ते स्पर्श अनुभवावेचं लागतात.

♥♥♥ फक्त तुझी आठवण ♥♥♥

अनमोल जीवनात साथ तुझी हवी, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा, आले - गेले किती हि, उन्हाळे - पावसाळे तरी हि, न डगमगनारा विश्वास फक्त तुझा हवा..... वेळ लागला तरी चालेल, पण वाट तुझीच पाहीन, विसरलीस तू मला तरीही, नेहमी मी तुझाच राहीन....... तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्या शिवाय माझं जीवन अपूर्ण आहे, तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच शेवट आहेस........ तुझ्या प्रेमाचा सुगंध मला देशील का ? विसरून सारे जग माझ्या पाशी येशील का ?? मला तुझे " प्रेम " हवे आहे, तू मला मरेपर्यंत " प्रेम " करशील का ??? आता तूच सांग या हृदयाचे काय करू, जे फक्त तुझ्या नावाने धडकते, तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण ते भेटण्यास तेवढेच तडपते..... कसे आहे हे जग, अजून समजू शकलो नाही, विखुरलेले स्वप्न एक वाटू शकलो नाही, कदाचित मीच वाईट असणार, जे तुझ्या हृदयात उतरू शकलो नाही....... ♥♥♥ फक्त तुझी आठवण ♥♥♥

किती म्हणून रे लिहावं

तुझी वाट बघून थकलेल्या डोळ्यांना निजवतो आहे, तुझ्या माझ्या भेटीसाठी स्वप्नांचा गाव सजवतो आहे.... किती म्हणून रे लिहावं माझ्या या मनातलं रात्रीला मांडत बसावं जसं चांदण उन्हातलं....... किती म्हणून रे लिहावं मी दुखः हे प्रारब्धातलं जाणून कोण घेतो इथे दुखः माझ्या शब्दातलं किती म्हणून रे लिहावं कागदावरी फक्त साज भेटला न अजुनी सये त्या जखमेवरी इलाज किती म्हणून रे लिहावं लिहायचं म्हणून लिहायचं शब्दांच्या वर्तमानातून का माझ्या भूतकाळात पाहायचं किती म्हणून रे लिहावं आज गुदमरला श्वास हात सुटला लेखणीचा अन डगमगला विश्वास k p bhannat

कांटो को चुबाना सिखाया नहि जाता,

खरी जर होती प्रित तुझी... का केली नाही तु व्यक्त... सदा वाट बघण्यात तुझी... आटले माझ्या देहाचे रक्त कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हाव लागत, दु:खाचे काटे टोचतानाही खळ खळुन हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत, दु:ख असुनही दाखवायच नसत... कांटो को चुबाना सिखाया नहि जाता, फुलों को खिलना सिखाया नही जाता, कोई बन जाता हैं खुद हि अपना, किसीको कहेकर अपना बनाया नही जाता..... दु:खा सोबत एवढी आता सवय झाली जगायची दैवालाही झाली सवय जणू दुखः मागायची

मुंबई त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान

एक होतं गाव. महाराष्ट्र त्याचं नाव. गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. मराठी भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते. त्याचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे. आल्या- गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, ते सुरेल करायचे. महाराष्ट्रात होता एक भाग. मुंबई त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले, की इथलेच होऊन राहत होते. "अतिथी देवो भव!' या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. अतिथी जास्त आणि यजमान कमी झाले. मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. मराठी आपली वाटत नव्हती. प्रश्‍न मोठा गहन होता; पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती. त्यांना एक युक्ती सुचली. दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली. त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील. सर्वांचाच, अगदी महाराष्ट्राचाही विकास होईल म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली. आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली. आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली. आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना, बोली भाषाही बदलली. सगळ्यांचा नुसता काला झाला. शुद्ध, सुंदर मराठीचा लोप झाला. अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर- माफ करा हं- आपल्या मम्मीबरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात एका पुस्तकावर पडला. त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली. त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल. इतक्‍यात त्या मुलानं विचारलं, (त्याच्या भाषेत) ""मम्मी, कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे?'' मम्मी खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती. पुस्तक परत जागेवर ठेवत म्हणाली, ""अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या आजोबांच्या वेळेस मराठी भाषा प्रचलित होती; आता नाही कोणी ती बोलत.'' पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले; पण हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं.

फुला परी आहे रस्ता

जरी आपण दूर तरी प्रेम कमी होणार नाही जीवनात सोबत नसलो तरी मनाने दूर होणार नाही फुला परी आहे रस्ता तरी पाई रुते काटा, आठवणीना येऊ लागे, ओला रंग ओली छटा... दोन पाय किती विसंगत असतात.... एक पुढे नि एक पाय मागे... पुढच्याला गर्व नसतो.... मागच्याला अभिमान नसतो... कारण त्याला माहित असत..... क्षणात हे बदलणार असत... याचंच नाव जीवन असत ..

फकीर साईबाबा

फकीर साईबाबा *साईबाबांचे* मुळ नांव, त्यांचे आई वडील या विषयी कोणालाही माहिती नाही. त्यांचा कालावधी अंदाजे १८३८ ते १९१८ असा मानतात. बाबा कोणाचे आवतार आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. राम-कृष्ण-हनुमान-शंकर-गणपती-गु रु दत्तात्रेय, स्वामी समर्थ, माणिकप्रभू इ. संबंध श्री साईबाबांच्या अवताराविषयी पोचतो. साईबाबांची धुनी, उदी, त्यांचा हिंदु-मुसलमान भक्त परिवार, त्यांचे एकत्रितपणे वागणे, गोरगरीबांविषयी करुणा, हे ध्यानात घेता त्यांना दत्तावतारात स्थान देण्यात आले आहे. साईबाबा हे नाथपंथीय दत्तात्रेयांचे अवतार असल्याचे अनेकांना मान्य आहे. पुढे चांदभाईंच्या घरी लग्न कार्य झाले. त्यांचे वऱ्हाड शिरडीस येणार होते. त्या वर्हाडाबरोबर हा तरुण फकीर शिरडीत आला. प्रथम खंडोबाच्या देवळात गेला. तेथे वडाच्या झाडाखाली चिलिम फुंकत बसले असता देवळाचे मालक म्हाळसापती सोनार तेथे आले. त्यांनी फकीरास पाहून ।।आवो साई।। असे म्हटले. तेव्हापासून फकीर साईबाबा म्हणून ओळखू लागले. बाबांचे वागणे- बोलणे वरवर पाहता वेड्यासारखे होते. हातात पत्र्याचे टमरेल, मळकट कापडाची झोळी, अंगावर एखादी कफनी अशा वेशात बाबा भिक्षा मागत. खाण्या पिण्याची शुद्ध त्यांना नव्हती. काही दिवसांनी ते पडक्या मशिदीत राहू लागले. त्यांच्या वास्तव्याने हीच जागा पुढे ।। व्दारकामाई।। म्हणून प्रसिद्ध झाली

शरण मज आला आणि वाया गेला

परमात्म्याच्या १/१०८ अंशापासून शिवात्मे ,ब्रह्मा विष्णू आणि शंकर निर्माण झाले .परमात्मा म्हणजेच प्रजापतीब्रह्मा परमशिव ,आणि महाविष्णू . बाबा म्हणजे परमशिव ! शिव म्हणजे शुद्धता संपूर्ण पावित्र्य शरण मज आला आणि वाया गेला ,हे ज्याचे वचन आहे आणि मी तुला कधीच टाकणार नाही हे वचन देणारा सद्गुरू आपल्या भक्ताची भक्ती जरी १ अंश असेल तरी ती १०८ अंशापर्यंत कशी पोचेल हे पाहत असतो .

तुझ्या नजरेतून स्वतःला पाहिले..

आत्ता हि तू माझी आहे अन पूर्वी हि माझीच होतीस.. फरक फक्त इतकाच तू तुझ्या नजरेतून स्वतःला पाहिले.. अंदाज घेतला नाही आजूबाजूचा सावलीला स्वतः समजत होतीस.. शोधलेस जरी कितीही तरी तूच तू भेटशील असे हृदयात तुला जपले. नुसते तुझेमाझे करण्यात धन्यता काय कामाची ? इतरांसाठी झिजवताना आयुष्य खरी किंमत कळते घामाची ! ----------

शिर्डीचे श्री साईबाबा (इ.स. १८३६-१९१८)

शिर्डीस ज्याचे लागतील पाय l शिर्डीचे श्री साईबाबा (इ.स. १८३६-१९१८) श्री बाबांचा जन्म महाराष्ट्रातील पाथरी या खेड्यात भुसारी कुटुंबात झाला. पण ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन एका मुस्लीम फकिराने केले. नंतर बारा वर्षे त्यांनी योग्यांच्या सहवासात राहून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. साधना करण्यातही त्यांनी काही काळ व्यतीत केला. नंतर ते हुमणाबादच्या श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना आशीर्वाद मिळून शिर्डी येथे राहण्याची त्यांना आज्ञा झाली. माणिक प्रभू यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले होते. प्रभू हे प्रत्यक्ष परमेश्वरच होते. बाबा त्यांना मानत होते. औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावची चांदभाई ही एक श्रीमंत व्यक्ती. औरंगाबादची सफर करण्यास चांदभाई गेला असता त्याची घोडी हरवली. त्याने सर्व जंगल शोधले, परंतु घोडी त्याला सापडली नाही. निराश बनून खोगीर पाठीवर मारून तो परत जाऊ लागला. एवढ्यात ''चांदभाई !'' अशी हाक त्याच्या कानी आली. त्याने झटकन मागे वळून पाहिले. त्याच्या दृष्टीस एक तरुण फकीर दिसला. अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी. ''इकडे ये.'' अस म्हणून तो फकीर एका झाडाखाली बसला. 'याला माझे नाव कसे माहित? याला मी पूर्वी कधी पाहिलेलं नाही!' असा विचार करीत तो त्यांच्याकडे गेला. ''बराच थकलेला दिसतोस ! बैस जरा. चिलीम पिऊन जा. काय रे, हे खोगीर कसे तुझ्याकडे?'' तो म्हणाला, ''माझी घोडी हरवली आहे. ती सापडण्याची आशा उरलेली नाही ! सर्व जंगल धुंडाळले!'' बाबा म्हणाले, ''ते पलीकडे कुंपण आहे. तिथ जा. तुझी घोडी सापडेल.'' चांदभाई तेथे गेला. त्याची ती हरवलेली घोडी तेथेच चरत होती. ''या अल्ला, माझी घोडी सापडली.'' चांदभाईला आनंद झाला. ती घोडी घेऊन तो फकिराकडे आला. फकीर तंबाखू चुरीत होता. ''सापडली न घोडी! आता चिलीम ओढ!'' फकिराने चिलमीत तंबाखू भरली. ''पण ही पेटवणार कशी? इथे विस्तव कुठे आहे? शिवाय छापी भिजवायला पाणीही नाही.'' चांदभाई म्हणाला. फकिराने हातातील सटका जमिनीत खुपसताच आग उत्पन्न झाली. त्यातून रखरखीत निखारा बाहेर काढला. सटका जमिनीवर आपटताच त्यातून पाणी निघू लागले. छापी भिजवून ती पिळली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. चिलमीतील तंबाखूवर तो प्रदीप्त निखारा ठेवला. फकिराने चिलीम स्वतः ओढून चांदभाईला ओढण्यास दिली. चांदभाई स्तिमित झाला. त्याने त्या फकिराच्या पायावर मस्तक ठेवले. ''अल्ला मलिक !'' असे म्हणून बाबांनी चांदभाईला वर उठवले व ''अल्ला भला करेगा'' असा आशीर्वाद दिला. ''बाबा, तुम्ही माझ्या घरी चला !'' ''जरूर येईन मी !'' चांदभाई तिथून निघाला. दुसऱ्याच दिवशी तो फकीर धूपखेडे गावात गेला व चांदभाईच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. चांदभाई खुश झाला. फकिराचे त्याने आदराने स्वागत केले. उत्तम प्रकारे आतिथ्य केले. काही दिवस तो फकीर त्याच्याकडे राहिला. नंतर चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याची सोयरिक शिर्डीच्या एका मुलीशी झाली, तेव्हा तो फकीर चांदभाईच्या विनंतीला मान देऊन लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीस आला. वऱ्हाड घेऊन आलेल्या गाड्या खंडोबाच्या देवळापाशी असलेल्या मळ्यात थांबल्या. सर्वजण गाड्यातून उतरले. तो फकीरही उतरला व खंडोबाच्या देवळात गेला. तिथे म्हाळसापती खंडोबाचे भक्त पुढे आले व आदराने म्हणाले, ''या साई!'' तो तरुण फकीर म्हणजेच साईबाबा. बाबा शिर्डी येथेच राहत. शिर्डीमध्ये ते भिक्षा मागण्यासाठी फिरत. त्यांना कोणी त्यांच्याबद्दल विचारले असता, ''हम तो साई है, बहुत दूरसे आये है!'' असं ते सांगत. एकदा धुळ्याचे श्री. नानासाहेब जोशी शिर्डीस आले. त्यांनी बाबांना विचारले, ''तुमचे नाव काय?'' यावर बाबा म्हणाले, ''मला साईबाबा म्हणतात.'' बाबा कधी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसत, तर कधी तिथल्या पडक्या मशिदीत जाऊन बसत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना व चार वर्णांना तिथे सर्वच द्वारे खुली असतात. त्या परम पवित्र मंगल स्थानाला तत्त्ववेत्ते विद्वान 'द्वारका' म्हणतात. साईबाबा एक रात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकारी चावडीत राहात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत येत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. तेथे शिरताना समोरची जी भिंत दिसते ती कृष्णाची. गोपालकृष्ण गोकुळात गोपालांसह काल्याचा आनंद उपभोगीत. बाबासुद्धा नाना प्रकारच्या जिनसा आणून त्या एकत्र करून एका मोठ्या हंडीत चांगल्या शिजवून आपल्या भक्तांना स्वतः वाटीत असत. एकदा चुलीजवळ शंभराहून अधिक माणसांना पुरेल इतकी मोठी हंडी शिजत होती. चुलीखाली लाकडांचा जाळ धगधगत होता. बाबा आपल्या एका भक्ताला म्हणाले, ''अरे, बघत काय राहिलास? जरा ती हंडी ढवळ!'' तेव्हा तो भक्त उलथणे शोधू लागला. बाबा झटकन त्या हंडीकडे गेले व आपल्या कफनीच्या अस्तन्या वर करून आपला उजवा हात कोपरापर्यंत त्यांनी त्या हंडीत घातला व ते पदार्थ ढवळू लागले. बाबांच्या हाताला काही झाले नाही. बाबांचे जीवनकार्य हा एक चमत्कार होता. बाबांना दीपोत्सवाची मोठी हौस होती. बाबा टमरेल घेऊन दुकानदार वाण्यांकडे जात व त्यांच्याकडून तेल मागून आणत. पण त्यांना ते मनापासून देत नसत. बाबा ते तेल पणतीमधे भरी. चिंध्या काढून त्याच्या वाती वळीत. रात्री त्या मशिदीत पेटवित. त्या रात्रभर जळत असत. दिवाळीचा सण होता. बाबा नेहमीप्रमाणे सर्व दुकानदार वाण्यांकडे गेले. त्यांना कुणी तेल दिले नाही. ''आज तेल नाही. संपले.'' असेच त्यांना सर्वच दुकानदार वाण्यांनी सांगितले. बाबा निमूटपणे मशिदीत आले. आता हा फकीर मशिदीत कशा पणत्या पेटवतो हे पाहण्यासाठी ते सर्वजण मशिदीसमोर जमले. बाबांनी त्यात पाणी ओतले. आणि कांडे ओढून ते एक एक पणती पेटवू लागले. मशिदीत दीपमाळा उजळली. मजा पाहण्यासाठी आलेले दुकानदार बाबांच्या चरणी लीन झाले. आजारी माणसे, रोगपीडित माणसे बाबांकडे येत. बाबा त्यांना वनस्पतींपासून स्वतः बनवलेली औषधे देऊन बरे करीत असत. जेव्हा जास्तच गर्दी वाढू लागली, तेव्हा बाबा औषधाऐवजी धुनीची उदी सर्वांना देऊ लागले आणि आलेले बरे होऊ लागले. भक्तांचे दुःख आणि दुखणे आपल्या अंगावर ओढून ते स्वतःच भोगीत असत. पुष्कळदा ते अनेक व्याधींनी जर्जर असत. भक्तांचे दुर्धर असाध्य रोग आपल्या अंगावर घेऊन ते भयंकर शारीरिक दुःख स्वतःच भोगीत. दाह व वेदना ते सहन करीत व भक्तांना वाचवीत. बाबा भक्तांना त्यांच्या स्वप्नात आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना उदी लावीत असत. बाबा भक्तांच्या संकटसमयी त्यांना सहाय्य आणि दिलासा देण्यासाठी दिशा आणि काळाची बंधने तोडून हजारो मैलांवर तत्क्षणी प्रकट होत. आपल्या असंख्य भक्तांना निरनिराळ्या रूपांनी प्रकट होऊन बाबांनी वाचविले आहे. पुढे बाबा आजारी पडले. त्यांचे दुखणे प्रबळ झाले. भक्त तळमळू लागले. १५ ऑक्टोबर १९१८ हा दिवस उजाडला. त्या दिवशी विजयादशमी होती. बाबांची अवस्था कठीण होती. काही क्षणानंतर बाबांनी जवळच बसलेल्या बयाजी अप्पा कोते यांच्या अंगावर डोके टेकले. संपले सारे ! शिर्डीस ज्याचे लागतील पाय l टळती अपाय सर्व त्याचे ll माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे ll मी साई चा सेवक आहे माझ्या सर्व शुभ कामात साई चा आशीर्वाद आहे

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे गालातल्या गालात हसणारं, भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं, कुणीतरी असावे पैलतीरी साद घालणारं, शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं, कुणीतरी असावे, चांदण्यांच्या बरोबर नेणारं, अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं, कुणीतरी असावे, फ़ुलांसारख फ़ुलणारं, फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं, कुणीतरी असावे आपल्या मनात रमणारं, पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणार

शिर्डीचे साईबाबा की सोन्याचे साईबाबा ???

शिर्डीचे साईबाबा की सोन्याचे साईबाबा ???
पडक्या मशिदीमधे फाटक्या चिंध्याने बांधलेले फळकुटावर झोपणारे , अत्यंत साधी रहाणी असणारे साईबाबा आणि आता कथाकथीत भक्तांनी त्यांना सोन्याने मढवुन टाकलेले त्यांचे रुप. बसायला सोन्याचे सिंहासन, सोन्यानी मढवलेला महाल, सोन्याची छत्रचामरे, सोन्याच्या पादुका, वेळ बघायला सोन्याचे ११ लाखाचे घड्याळ, सोन्याच्या पादुका आणि फिरायला सोन्याची पालखी. तरी नशीब चांगले अजुन तरी साईबाबांची संपुर्ण सोन्याची मुर्ती करण्याचे कोण्या धनवान भक्ताच्या मनात आलेले नाही. एक जमाना असा होता, शिर्डी एक खेडेगाव होते, अगदी तुरळक भावीक मंडळी यायची आणि त्यांची रहाण्याची सोय चक्क समाधी मंदिरात वरच्या मजल्यावर असलेल्या खोल्यांमधे केली जायची. आणि मग हळु हळु देवस्थानाचे रुपांतर संस्थानात, एका साम्राज्यात होत गेले. म्हणतात ना @शिर्डी वोही जाते हे जिन्हे साई बाबा बुलाते हे@ एक साईभक्त

हर एक फ्र्येंड जरुरी होता है ....

दोस्त प्यार से भी बडा होता ही हर सुख और गम मे साथ होता ही तभी तो क्रिष्ण राधा के लिये नही तो सुदामा के लिये रोता है........ क्योंकी हर एक फ्र्येंड जरुरी होता है ............. इसलिये दोस्तो प्यार मत करो दोस्ती करो ......... वही जिंदगीभर साथ देती है ..... आमोल घायाळ ११/१०/२०१२

लाज वाटते मज आता

अनाथ मुलीचे मनोगत) ... झाले मी मोठी आता कळले मज सारे काही पण ममता ,आपलुकी तुझी कधी मिळालीच नाही कशी सोडलीस तू मला इवलीशी मी असताना काहि कसे वाटले नाही रडणे माझे ऐकताना लाज वाटते मज आता तुजला आई म्हणताना काय माहित तुला, कशा भोगल्या मनाच्या यातना नको आई, नको बाबा नको मला कोणीही अनाथ आहे मी तरी पाठीशी आहे माझा हरी .

मैत्रीचे प्रेम मिळवण्यासाठी

कोणी म्हणत मी खूप कठोर स्वभावाचा आहे तर कोणी म्हणत मी खूप मृदू भाषिक आहे Attitude म्हणतात ज्याला तुम्ही सर्व जन इंग्लिशमध्ये जाणून बुजून त्याला दूर सारून जगतो मी "त्याच" धुंदीमध्ये करत आलो नवनवीन प्रयत्न मित्रांना आपले करण्यासाठी प्रेमाचा स्वार्थ साधला मीही मैत्रीचे प्रेम मिळवण्यासाठी हटके असतात निर्णय माझे सहजच त्याला एकमत मिळतो तुटत असेलही मन एकाचेतरी समजावण्याचाही प्रयत्न मी करतो मीच कधी जाणून घेतला नाही कसा आहे माझा स्वतःचा स्वभाव तुम्हीच आजवर सांगत आलात आपलेसे करतात तुझे हरेक हावभाव कवितेतून सागण्याचा माझा मित्रांनो हा पहिलाच केलेला आहे प्रयत्न दाद मागण्याची अपेक्षा नाही करणार कारण स्वतःस मानत नाही मी रत्न ;) एम.डी.♥

हृदयात नाव माझे आहे.

गळ्यात मंगळसूत्र जरी त्याचे असेल, तरी डोळ्यात काजळ माझे आहे. ओठावर नाव जरी त्याचे असेल, तरी हृदयात नाव माझे आहे. सहवास त्याचा असला, तरी प्रेमाचा सुवास माझाच आहे. राहत असली जरी त्याच्या सोबत, तरी प्रेमाच्या आठवणी माझ्याच आहेत
काय असतात ना ही नाती काही मनापासुन जोडलेली तरं काही सहज तोडलेली…….. काही जिवाभावने जपलेली तर काही नुस्तीच नावापुरती उरलेली…….. काही नितळ प्रेमासाठी जगलेली तर काही बांन्डगुळासारखी दुस-याच्या जिवावर वाढलेली…….. काही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली तर काही भितीपोटी गुपितासारखी लपवलेली…….. काही मैत्रीच नाव दिलेली तर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव असलेली…….. काहि ओझ्यासारखी वाहीलेली तर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी जपलेली…….. काहि नकळत मनाशी जुळलेली तर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली…….. काहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली तर काही उराशी जिवापाड सांभाळलेली…….. काहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली तर काही मान-अपमानाच्या ओझ्याखाली दबलेली…….. काही मोत्याहुन अनमोल ठरलेली तर काही भंगारासारखी विकाया काढलेली…….. काय असतात ना ही नाती काही मनापासुन जोडलेली तरं काही सहज तोडलेली…..
आमोल घायाळ १०/१०/२०१२
भन्नाट च्या प्रगतीचे पुढचे पाऊल पडले... आणी मौज-मजा करायला सगळे भन्नाट कर खंडाळ्याला जमले. नवीन ओळखी, भरपूर उत्साह आणी मिटिंगची हौस... या साठी ठिकाण ठरले लोणाव्लाची कार्ले भाजे लेणी नाच-गाणी - धूम-धडाका - मस्ती सगळ्यांनी केली... त्यातच रविवार दिवस , पूर्ण उलटून निघणार अंताक्षरी -नाटक खेळून सगळ्यांना लागली खूप भूक... पण tension not! कारण बाग मध्ये होता खाऊ पोटोबा भरल्यावर खेळ पुन्हा रंगला... दुर्गेश नि दर्शना च्या नाटकांनी stage परत एकदा सजला. एक-एक करत सगळे stage वर जमले... आणी प्रत्येकाला वेगळे-वेगळे steps सुचू लागले. टीपी करता करता रविवारचा दिवस संपायला आला सूर्य पण भन्नाट चा उत्साह पाहून परतीला निघाला जरी पहिल्यांदाच जमले होते सगळे at खंडाळा... तरी सकाळी फिरायला जायचा नव्हता कोणाला कंटाळा. रविवारी सकाळी लोणावला स्टेशन वर सगळे जमून आले... त्यानंतर लगेचच सर्वांनी फोटो काढण्यास पोज देऊन उभे राहिले बघता बघता वेळ झाली सगळ्यांना bye - bye म्हणायची... आणी झकास ग्रुप फोटो काढून आप-आपल्या घरी परतायची. भन्नाट चा ग्रुप हळू-हळू वाढतो आहे... पुढची ट्रीप कधी ठरते...त्या मेलची आतुरतेने वाट बघतो आहे एक भन्नाटकर आमोल घायाळ;

प्रेमाचे फुललेले प्रेम फुल..

प्रेम... एक छान संवेदना.... त्यात तुझ्या नि माझी गुंतल्या भावना, प्रेम... वाळक्या लाकडाला फुटलेली नवी पालवी.. माझी प्रत्येक रात्र तुझ्या आठवणीत जावी... प्रेम... निर्जल झऱ्याला आलेली पाणवल.. तुझ्या माझी प्रेमाचे फुललेले प्रेम फुल.. प्रेम... ओसाड जमिनीवर आलेली एक हिरवळ ... तुझ्या माझ्या प्रेमाची अशीच फुलत राहो कातरवेळ

तुझे नि माझे मिलन सख्या

दु:खा सोबत एवढी आता सवय झाली जगायची दैवालाही झाली सवय जणू दुखः मागायची तुझे नि माझे मिलन सख्या या जन्मी शक्य नाही पुढचा जन्म तुझाच असेन देवाला दुसरे मागणे नाही नव्हते वावडे माझे कधी त्या फुलांशी जोडली नाळ नाही कोणती त्या जगाशी... तू मला सांग मी कोठे भरू भूक माझी? मी जिथे जाय येती हे तिथेही उपाशी....