Friday, December 30, 2011

प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,

प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,

"आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये

आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत,

ते एका कागदावर लिहु...."

प्रेयसी म्हणते "ठिक आहे"...

मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात

तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3

पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं,

का ??
.
.
कारण की,

त्याने त्याच्या कागदावर

फक्त एवढंच लिहीलेलं असत..''मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे''

ते पण जर तु होकार देणार असशील तर.. ♥ ♥ ♥

मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :-

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :-

५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे. ♥

१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥

१५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा. ♥

१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥

२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट. ♥

२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी. ♥

३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक. ♥

५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद. ♥

६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन ♥

बॉयफ्रेंड विकणे आहेत...!

बॉयफ्रेंड विकणे आहेत...!

स्वस्त, टिकावू, दर्जेदार बॉयफ्रेंडस विकणे आहेत...!

तुमचे सर्व लाड पुरवणारे, कधीच कटकट न करणारे,

तुम्ही केलीली बकबक शांतपणे ऐकणारे, मिसकॉल देताच फोन करणारे,

तुमच्या खरेदीचे बिल देवून ...बॅगस पण सांभाळणारे....

अतिशय उपयुक्त असे बॉयफ्रेंडस विकणे आहेत..!

एकदा वापरून खात्री बघा, न आवडल्यास बदलून पण मिळतील...!

थोड्या'कंजूस'बॉयफ्रेंड वर भारी डिस्काउॅट मिळेल..!

खास ग्राहकांच्या आग्रहास्तव'नवरे बनण्यास'लायक असे बॉयफ्रेंड पण विविध रेंज मध्ये उपलब्ध..!

खास"Exchange Offer"मध्ये आपला जुना, कंगाल

झालेला बॉयफ्रेंड घेवून या व नवा पैसेवाला घेवून जा...!

आमची कोठेही शाखा नाही..!

(ऑफर फक्त सिलेक्टेड मॉडेल वरच उपलब्ध...अति लागू )

काय लिहावं कस लिहावं हे काय कोणाला सांगाव लागतं

काय लिहावं कस लिहावं
हे काय कोणाला सांगाव लागतं
जे सांगण्यापलीकडच असतं
ते ह्रदयातून याव लागतं….


नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात …..
नजरेत भरणारी सर्वच असतात
परंतु ह्रदयात राहणारी माणसे
फारच कमी असतात ….


जीवनाच्या कोऱ्या कागदावर आठवणीचे चित्र रंगवायचे असते कारण कोणीच उरत नाही शेवटपर्यंत…..
शेवटी आपल्याला फक्त आठवनीवरच तर जगायचे असते…..

तुमच्या आयुष्यातील सर्वात पहिली महत्वाची गोष्ट

तुमच्या आयुष्यातील सर्वात पहिली महत्वाची गोष्ट


” कोणावर तरी प्रेम करण “


तुमच्या आयुष्यातील सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट


” तुमच्यावर कोणीतरी प्रेम करण “


तुमच्या आयुष्यातील सर्वात तिसरी महत्वाची गोष्ट


” या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होण “

प्रेम मागुन मिळत नाही प्रेम वाटावं लागतं

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित
भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु
म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे
धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद
उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वेड करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी
पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं --

पण धाडस होत नाहि ...

पण धाडस होत नाहि ...

ती समोरून आली तरीही शब्धान्ना बांध
फुटत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
... धाडस होत नाहि ...
वर्षे लोटली तरी फ़क्त तिच्यावरच
मरतोय ,
शप्पथ सांगतो फ़क्त तिचाच विचार
करतोय ...
वही मागण्याशिवाय
कधी बोललो नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाहि ...
माहित नाहि , ती मरते
का नाहि मज्ह्यावर ?
का तीच ह्रदय आहे ,फ़क्त एक "सजीव
कलेवर" ?
चांदण्यात फिरण्याचा आनंद
आम्हालाही मिळणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाहि ...
Valentine Day ला बूके
घ्यायला जातोय ,
खिशाचा विचार करून फुलावरच
भगवतोय ,
या "गरिबाच प्रेम" ती स्वीकारणार
की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय,पण
धाडस होत नाहि ...
तिच्यासाठी घेतलेल फुल वहितच
कोमेजतय ,
माझ काळीज मात्र तिचीच आस धरतय ...
कितीही ठरवून गेलो तरी, ह्रदय मात्र
बोलत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय,पण
धाडस होत नाहि ...
वाटतय , तिच्याही वहित असेल एखाद
फुल मज्ह्यासाठी ,
का आहे ही भोली समज
या वेड्या मनासाठी ?
आयुष्यातल पहिल - वहिल प्रेम मिळणार
की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय,पण
धाडस होत नाही

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

गुंतत चालले
मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
.
.
गुंतत चालले
मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात
खूप आहे माझा तुझ्यावर प्रेम
पण कसा वेगळाच आहे ह्या फीलिंग्स
चा गेम
प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली
पण मलाच माहीत
नाही मी तुझ्या प्रेमात कशी पडली
मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस
किती वर्ष???
तुला होकार द्यायला मी कधीची आहे
रेडी
पण पायात अडकली आहे करियरची बेडी
हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू
दे
गुंतत चालले
मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

तो चंद्र नकोय रे मला,

तो चंद्र नकोय रे मला,
फक्त तुझी शीतल सावली दे....
हे जग नकोय रे मला,
फक्त तुझ्यातलं माझं जग दे...
स्वप्न माझी खूप नाही रे मोठी,
पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे...
नदीला या काठ दे...
वाटेला माझ्या वाट दे...
अडकलाय रे तुझ्यात जीव माझा...
आता फक्त आयुष्य भराची साथ दे...

किनारा म्हणाला लाटेला,

किनारा म्हणाला लाटेला,

नेहमीच का ग अशी घाईतच येतेस ?
... ... तहानलेले माझे अंग चिंब भिजवून जातेस

माझ्या जवळ थांबायला तुला कधीच नसतो वेळ
का बर खेळतेस माझ्याशी असा जीवघेणा खेळ ?

तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची
तुला मात्र नेहमीच घाई असते परतीची ?

लाट म्हणाली किनाऱ्याला

तुझ बर आहे रे काठावरती तू आरामात बसतोस
थांबत नाही तुझ्याजवळ म्हणून माझ्यावरच रुसतोस ?

तुझ्याजवळच थांबाव अस मलाही खूप वाटत
धावून धावून बघ ना माझ पाणी किती आटत ?

परतले घाईने तरी पुन्हा तुझ्याकडेच ना येते ?
कितीही थांबवलं स्वत:ला तरी मन तुझ्याकडेच धाव घेते ..

प्रेम मागुन मिळत नाही

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित
भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु
म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे
धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद
उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वेड करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी
पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं

प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू

♥ प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ............ ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!"
प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" .......... ते फक्त म्हणते कि ," माझ्याच हृदयात राहतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " काय करतेस तू ?" ........... ते फक्त म्हणते कि ."माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " का दूर आहेस तू ?" ........... ते फक्त म्हणते कि ," माझ्याच जवळ आहेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " माझ्यावर प्रेम करतेस का तू ?" .............. ते फक्त म्हणते, " माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू !!" ♥

कधी येशील?????

कधी येशील?????

श्वेत नभांत निळसर आभा असेल
कुठेतरी सूर्यास्त होताना
रंग सांडलेले असतील
केशरी, गुलाबी, जांभळे
हळूहळू चांदण्याच्या दीप मला
लाखलाखायला लागतील
येशील का तू तेव्हा ???

जिथे किनारयाना धावत जाव वाटत
किनार्यांच्या मिठीत काही क्षण
लता जिथे विसावत असतील
तिथे येशील का तू भेटायला???

फुलांच्या अंगावर फुलपाखरांच्या
पंखावरचे रंग काही सांडलेले असतील
वार्यालाही जिथे बागडत रहाव वाटेल
गवताचे गालिचे दूरवर पसरलेले असतील
येशील का तू तिथे भेटायला ???
सांग ना कधी येशील ??
अबोल झाले मी माझ्याशीच
पुन्हा येऊन,
हातात हात घेऊन
स्वप्नांच्या जगात घेऊन जाशील का???

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!___$_

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!___$___

खरे प्रेम केल्याचे हे फळ......प्रत्येक प्रेम करानार्याने जरुर वाचावे...



आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!



रात्रि झोपेतून दचकून मी जागा होतो,

अणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्न मी करतो,

हताश होउन पुन्हा झोपायचा प्रयत्न मी करतो,

तेवढ्यात एक अश्रु डोळ्यातून गालावर ओघलतो,



सुरु होतो आठावनिचा तो खेळ,

नाही रहात पुन्हा झोपायचा ताल-मेळ,



असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे,

त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,

आणि स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर,

खाडकन फुटावे,



कुठे कमी पडत होतो,

प्रत्येक वेळी तुलाच तर समजुन घेत होतो,

तुझ्यावर येणार्या संकटाना,

परतीचा रस्ता मी दाखवत होतो,



तू केलेल्या प्रत्येक चुकावर,

माफ़ी मी मागत होतो,

तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने ,

वेळोवेळी मीच रडत होतो,



तुझ्याकडून झालेली चुक तुला कधीच दिसली नाही,

माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही किम्मत राहिली नाही,



कामाचा दबाव आहे असे म्हणून,

तू माला टाळत होतीस,

पण या कारणा खाली,

तूच माझ्या पासून दुरावत होतीस,



काम तेव्हा मीही करत होतो,

माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो,

वाटत होते तुला माझ्या साथाची गरज आहे,

तुलाच मी समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,



तुझे काम हे कधी संपले नाही,

आपल्यातील वाढत गेलेले अंतर,

हे तर कधीच मिटले नाही,



दरोज झोपताना देवाकडे एकच गार्हने असते,

तू सदैव खुश रहावी हेच माझे मागणी असते,



आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,

पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,



प्रेम माझे संपणार नाही मी मेल्यावर,

पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर...आठवण माझीही येइल मी गेल्यावर..........

अबोल तुझ्या शब्दातले बोल तो बोलून गेला

अबोल तुझ्या शब्दातले
बोल तो बोलून गेला
निरागस तुझ्या डोळ्यातली
आसवे तो पुसून गेला

तरंगत्या प्रेमाचे भाव मनी
उमटवूनी तो निघून गेला
ओठांवरचे नाजूक काहीतरी
नकळत तो खूलवून गेला


कोपर्‍यात हृदयाच्या
प्रेमाचा हिंदोळा तो झुलवून गेला
दरवळ सुगंधी फुलांचा तुझ्यात
पसरवूनी तो निघून गेला

दडवूनी आस प्रेमाचि खर्‍या
मैत्रीत तो जगून गेला
सतत तुझी काळजी करणारा
तो स्वतःच्याच काळजीत निघून गेला

आयुष्यभर चित्र काढणारा तो चित्रकार
अखेर तुझ्यासाठी तो कविता बनवून गेला
असतानाही प्रेम तुझ्यावर मनापासून
मैत्री तुटेल म्हणून प्रेमाचे हे गुपित तो कायमचा घेऊन गेला.........................!!!

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे,

म्हणून ते प्रेम करायचे नसते,

नाही मिळाले ते परत तरी,

आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,

दुखवले कितीही त्याने तरी,

हसून त्याच्या परत समोर जायचे असते,

कुठलीही अपेक्ष्या न ठेवता,

देत राहिल्याने प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,

म्हणूनच नाही मिळाले परत,

तरी निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते…

Thursday, December 22, 2011

आज तिला नक्कीच, कसलंतरी दुःख होत!

आज तिला नक्कीच,

कसलंतरी दुःख होत!

तिने जरी लपवलं असलं,

तरी मला मात्र स्पष्ट दिसलं!

केव्हा जाईल तिच्या आयुष्यातील,

हा वेदनांचा प्रहर!

केव्हा येईल तिच्या आयुष्यात,

आनंदाची लहर!

नेहमीच प्रेमाने इतरांना,

भरभरून देणारी परी!

स्वःता मात्र शेवटपर्यंत,

राहिली अधुरी अधुरी!

तिच्या स्वप्नातील तो राजकुमार,

कधी तरी येईल का?

सुखांच्या क्षणांच्या,

ठेवा तिला देवून जाईल का?

ती वेडी घायाळ हरिणी,

धुंद होवून त्याची वाट पाहते!

दिवस-रात्र त्याच्या स्मृतीत,

क्षणा-क्षणाला मरत असते!

तिच्या मनातील वेदना,

ह्या मला घायाळ करून जातात!

कारण तिच्यावरील प्रेमाचा,

एक नजराणा देवून जातात.

तिला सहज विचारलं माझ्यावाचू न जगशील का..?

तिला सहज विचारलं माझ्यावाचू न जगशील

का..?

ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचू न

राहशील का...? हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून

कधी जाशील का...? *

*ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून

फुलशील का..?

... ...
गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...?
...
ती म्हणाली, पाणावलेल्य ा डोळ्यांनी
,
नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते

का........
amol.ghayal123@yahoo.co.in

मला तुला साँरी म्हणायचं होतं

मला तुला साँरी म्हणायचं होतं
माझ्यावर तुझं निरागसपणे प्रेम करणं
अन तुझ्यावर माझं उगाचच वैतागणं
हर एक रुसल्या क्षणाला तुझ्या खुलवायचं होतं..
मला तुला साँरी म्हणायचं होतं...

मी गेलो तेव्हा पाऊस थांबला असेल
तुझ्या मनात वेदनांचा पूर दाटला असेल
गहिवरल्या तुझ्या त्या मनाचा किनारा व्हायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...

गर्दित असताना हुंदके टाळले असतील,
आठवणींत माझ्या तू टिपंही गाळली असतील
तुझ्या हुंदक्यांचा मला आधार व्हायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...

तुझी हासवं आठवतात,
तुझी आसवंही आठवतात
हासवांना जपत तुझ्या आसवांना टीपायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...

जाणतो मी..
आभाळभर मनात तुझ्या मीच उरलेलो,
तरिही पुन्हा मला ’माफ़ केलं..!’ असं ऐकायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...

amol.ghayal123@yahoo.co.in

अबोल तुझ्या शब्दातले

अबोल तुझ्या शब्दातले
बोल तो बोलून गेला
निरागस तुझ्या डोळ्यातली
आसवे तो पुसून गेला

तरंगत्या प्रेमाचे भाव मनी
उमटवूनी तो निघून गेला
ओठांवरचे नाजूक काहीतरी
नकळत तो खूलवून गेला


कोपर्‍यात हृदयाच्या
प्रेमाचा हिंदोळा तो झुलवून गेला
दरवळ सुगंधी फुलांचा तुझ्यात
पसरवूनी तो निघून गेला

दडवूनी आस प्रेमाचि खर्‍या
मैत्रीत तो जगून गेला
सतत तुझी काळजी करणारा
तो स्वतःच्याच काळजीत निघून गेला

आयुष्यभर चित्र काढणारा तो चित्रकार
अखेर तुझ्यासाठी तो कविता बनवून गेला
असतानाही प्रेम तुझ्यावर मनापासून
मैत्री तुटेल म्हणून प्रेमाचे हे गुपित तो कायमचा घेऊन गेला.........................!!!

समज जर तुला असे कळले कि,

पहिला मित्र : एक प्रश्न विचारू?

दुसरा मित्र : हा विचार ना?

पहिला मित्र : समज जर तुला असे कळले कि,
तुझ्याकडे जगण्यासाठी आता फक्त एकाच क्षण उरलाय.
आणि या क्षणात तू कोणत्याही पण फक्त एकाच आवडत्या व्यक्तीला भेटू शकतोस, तर तू कुणाला भेटशील?

दुसरा मित्र : अअअअअअ......
असे असेल तर मी त्या क्षणात कोणालाच भेटणार नाही....

पहिला मित्र : असे का?सांगशील?

दुसरा मित्र : सांगतो ना.....
हे बघ,
जर मी तुला म्हटले कि,मी त्या क्षणात माझ्या आईवडिलांना भेटेन.
तर तू म्हणशील कि,फक्त एकालाच भेटायचं......एकतर आई नाहीतर बाबा....एकाचच नाव सांग
मग मी म्हणेन कि,"आईला भेटेन,खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर...."
मग तू म्हणशील,"म्हणजे तुला असे म्हणायचेय का कि तुझ्या बाबांचे तुझ्यावर प्रेम नाही....
अरे ते दाखवत नाहीत पण आई एवढीच त्यांना पण तुझी तितकीच काळजी आहे...
मग मी पुन्हा कोड्यात पडेन आणि म्हणेन कि,ठीक आहे मग मी त्या क्षणात माझ्या बाबांना भेटेन.
मग तुझा पुढचा प्रश्न असेल कि,"आई वडिलांचे नाव घेतलेस,पण तुझ्या प्रेयसीचे नाव नाही घेतलेस.
ती पण इतकी प्रेम करते तुझ्यावर.तिला भेटावेसे नाही वाटणार का?"
मग मी पुन्हा कोड्यात पडेन.
पण खरे सांगायचे तर
नात्यांमध्ये असा क्रम नाही लावता येत,
हे नाते आधी आणि ते नाते नंतर.......

मला जरासा क्षण मिळाला तर मी कोणालाच प्रत्त्यक्ष कोणालाच भेटणार नाही
त्या क्षणात मी माझे डोळे बंद करून घेईन आणि
माझ्या सगळ्या आवडत्या व्यक्तींना मनातल्या मनात आठवेन...माझी आई,बाबा,ती आणि माझे मित्र मैत्रींनी........आणि सगळेच
कारण
तो यम माझ्या त्या शेवटच्या क्षणावर ताबा ठेवू शकतो
पण माझ्या मनावर नाही"......... :)

स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं.................

स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं.................


त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.
ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी.
पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.

तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत.
आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!

पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क
मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची
चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत! अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...! काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी
तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!

प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं... खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो. ...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"


स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप सुंदर आहे..

आज तुझ्या सोबत मला...

आज तुझ्या सोबत मला...
तो समुद्र किनारा पार करायचाय...
वाळूवरून तुझ्या संगे....
दोन पावले चालायचय...

कवीता म्हणजे ......

कवीता म्हणजे ......
मनावरउमटलेले भावनांचे सुरेख प्रतिबिंब
अवचीत मिळणारा एखादा भावक्षण
स्वतःला हरवण्याचा नाजुक क्षण
भावनांच्या हिंदोळ्यांवर खेळणारे मन

जे कवीता करतात
ते आपल्या भावना त्यातुन व्यक्त करतात
कधी दुःख, कधी सुखः व्यक्त करतात
मनातले भाव ते त्या द्वारे व्यक्त करतात

कवीता असतात,नाजुक फुलासारख्या ,
फुलल्या की आनंद देणारया
सुंदर दवबिंदुंसारख्या
मनाला सहजच भावणारया ,

कवीता विचार करायला लावतात
काही थोडेफार रडायलाही लावतात
काही मने जूळवतात
काही नाती बनवतात
काही भावना व्यक्त करतात
काही रोष व्यक्त करतात
समाजातील वाईट गोष्ठींवर काही वेळा प्रहारही करतात

कवीता शब्दांपासुन सुरु होतात
व शब्दांवरतीच संपतात
पण
संपता संपता ते
आयुष्याला एक ध्येय देऊन जातात
भावनांचे रंग मनावर असे चढतात की
ते संपुर्ण आयुष्यच बदलून जातात

म्हणुनच ते रंग मला कवीतेचे नव्हे तर भावनांचेच वाटतात...............

Lyrics Of "Why This Kolaveri Di"

Lyrics Of "Why This Kolaveri Di"


yo boys i am singing song
soup song
flop song
why this kolaveri kolaveri kolaveri di
why this kolaveri kolaveri kolaveri di
rhythm correct
why this kolaveri kolaveri kolaveri di
maintain please
why this kolaveri..di

distance la moon-u moon-u
moon-u color-u white-u
white background night-u nigth-u
night-u color-u black-u

why this kolaveri kolaveri kolaveri di
why this kolaveri kolaveri kolaveri di

white skin-u girl-u girl-u
girl-u heart-u black-u
eyes-u eyes-u meet-u meet-u
my future dark

why this kolaveri kolaveri kolaveri di
why this kolaveri kolaveri kolaveri di

maama notes eduthuko
apdiye kaila snacks eduthuko
pa pa paan pa pa paan pa pa paa pa pa paan
sariya vaasi
super maama ready
ready 1 2 3 4

whaa wat a change over maama

ok maama now tune change-u

kaila glass
only english..

hand la glass
glass la scotch
eyes-u full-aa tear-u
empty life-u
girl-u come-u
life reverse gear-u
lovvu lovvu
oh my lovvu
you showed me bouv-u
cow-u cow-u holi cow-u
i want u hear now-u
god i m dying now-u
she is happy how-u

this song for soup boys-u
we dont have choice-u

why this kolaveri kolaveri kolaveri di
why this kolaveri kolaveri kolaveri di
why this kolaveri kolaveri kolaveri di
why this kolaveri kolaveri kolaveri di

flop song

कोलावेरी दि मराठी मध्ये

कोलावेरी दि मराठी मध्ये

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

.
.
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू? .
.
.
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?



दूर असतो चंद्र...चंद्र...चंद्र तो शुभ्र...
शुभ्र चंद्राआड रात्र...रात्रीचा रंग ब्लैक

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

गोरीपान मुलगी...मुलगी...मुलीचे हृदय ब्लैक...



नजरेला मिळाली नजर..फ्युचर माझे डार्क...

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

pa pa paan pa pa paan pa pa paa pa pa paan

हातात ग्लास...ग्लासात स्कॉंच...डोळ्यात अश्रू भरपूर



खाली आयुष्य...आली मुलगी...आयुष्य रिवर्स गिअर

माझी प्रिये...माझी प्रिये...दाखविलेस तू खरे रंग...
गेली कुठेस...माझी प्रिये...जीव झाला कासावीस..
प्राण आला कंठी माझा...देवा बघते कशी ती हसून..

हे गाणं नाकाम मजनूंच



नाही काही आम्हा पर्याय

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

Thursday, December 8, 2011

प्रत्येक दिवसाला एक रात्र जोडलेली....

प्रत्येक दिवसाला एक रात्र जोडलेली....
प्रत्येक वाट मी त्या वळणावर सोडलेली...
जायचे होते मला दूर तुझ्या सोबत...
पण त्या स्वप्नाला तुझी आठवण जोडलेली...


तू जवळ आलीस कि...
तुझ्या बोटांना कुरवाळत राहतो...
हातावरच्या रेषांमध्ये तुझ्या...
माझे भविष्य पाहतो...


तू समजून गेलीस...
मला जे काही बोलायचे होते.....
जाता जाता ते क्षण देऊन गेली...
ज्यांनी मला छळायचे होते..

Wednesday, December 7, 2011

आज उजळल्या या दाही दिशा ..तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आयुष्यात एकदा जागून पहा..
आयुष्याची मजा घेऊन पहा...
कुणी आपले नसले म्हणून काय झाले...
तुम्ही कुणा दुसऱ्याचे एकदा होऊन पहा...




प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू...
एक छापा अन एक काटा...
एकाच बाजून पाहून त्याला...
दुसरीला का असे टाळता....




आज उजळल्या या दाही दिशा ..
निळ्या नभात शोभते हि निशा...
दिवस आजचा शौभाग्याचा....
.... तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

चांदण्यांच्या साक्षीने... दिलेले ते गोड वचन..

चांदण्यांच्या साक्षीने...
दिलेले ते गोड वचन....
तुझ्या माझ्या हृदयात...
सुरु आहे त्याचे सिंचन..




रुसलो मी कि तु मनवावे...
हृदयाच्या काही तारा छेडून जावे..
लाडात तू येताच मग...
चंचल मनाला लागते आवरावे...

तूच तर विश्वासाने .... दिलास हातात हात....

लावण्यवती तू आहेस जणू......
अप्सरा इंद्र नगराची ...
तू खुश असतेस नेहमीच ....
या हृदयातल्या दरबारी.


प्रत्येकाच्या पदरी...
आभाळा एवढे दु:ख...
खरी सोबत मिळाली तर....
विरतात नभी होऊन धुक




केला काय गुन्हा कि...
हि नियती माझ्यावर रुसली...
तुझी माझी प्रेम कथा..
लिहिण्या आधीच पुसली....




लिहितोय नवी कथा...
साथ तुझी फक्त दे....
प्रत्येक चुकलेल्या शब्दाला...
पुसण्यास हाथ तुझा दे....




तूच तर विश्वासाने ....
दिलास हातात हात....
अन म्हणालीस हळूच...
अजरामर राहील आपली साथ...




तुझा हाथ धरूनच....
गिरवला अ आ - आई...
तुझ्या कुशीतच ग...
शांत येते मला गाई....

गालावरून तुझ्या तो.. घसरलेला मी एक थेंब...

आज तुझ्या आठवणींनी...
पुन्हा हैराण केले...
जाता जाता त्यांच्या सोबत...
मलाच वाहून नेले...


आज तुझ्या सोबत मला...
तो समुद्र किनारा पार करायचाय...
वाळूवरून तुझ्या संगे....
दोन पावले चालायचय...




हातात तुझा हात घेता...
हृदयात होते धडधड...
सौंदर्य तुझे पाहायला....
बिचाऱ्या डोळ्यांची गडबड...



मिठीत माझ्या विसावलेली...
तुझ्या डोळ्यांची दोन पाखरे....
पापण्यांनी बोलतात काही...
तुझ्यातच माझे सुख रे....




तू मला पाहत गेलीस...
अन मी सुख शोधात होतो तुझ्यात....
तू खुदकन हसलीस अन...
आयुष्यभराचे सुख लाभले त्या क्षणात ...



हातावरच्या रेषा तुझ्या..
नागमोडी पसरलेल्या...
तुझ्या कडून माझ्या पर्यंत...
हृदयाच्या आकारात वळलेल्या...



गालावरून तुझ्या तो..
घसरलेला मी एक थेंब...
हृदयावर येताच तुझ्या...
विसावलेला मी एक थेंब...

तुझ्या शरीराला... केवड्याच्या...गंध...

तुला लपून पाहण्यात ...
एक वेगळीच मजा असते...
तू मागे वळून पाहताच....
तुझा कटाक्ष जीवघेणी सजा असते.



तुझ्या प्रत्येक आरोपाला...
मी आहे कारणीभूत...
तू नाही म्हतलेस तरी...
माझ्या विरूद्ध प्रत्येक सबूत...





मृगजळाच्या या वाटेवर..
कितीतरी वाटसरू भेटले...
त्यांना मागे सारत...
मी हे मृगजळ गाठले...




अस्तित्व नसतानाही..
प्रत्येकाला मृगजळाची ओढ आहे..
कितीही फ़सवे असले तरी...
हे मृगजळ किती गोड आहे..




पापण्यात तुझ्या ...
मला पाहताच झालेली चुलबूल..
माझ्या पापण्यांना त्याची..
हळूच लागलेली चाहूल...




शब्दांना तुझ्या मी...
गुंफ़ले एका ओळीत...
बघ सखे कसे विसावले..
ते सारे या चारोळीत..



तुझ्या शरीराला...
केवड्याच्या...गंध...
तुटो ना कधीही..हे,
आपल्या नात्याचे रेशमी बंध.

तुला माझी करण्याआधीच..

समोर तुला पाहताच...
लवतो डावा डोळा....
हसून तू पुढे गेलीस...
कि हृदयात येतो आनंदाचा गोळा...



आन्दाचे क्षण तुझ्या
हृदयात भरून जाईन...
तू समोर येताच....
मी तुझीच होऊन जाईन...



तुला माझी करण्याआधीच..
तू माझी होऊन जा...
हृदयातल्या बंद पाकळीत...
तू अलगद राहून जा...

एक मुलगी

एक मुलगी चालते आहे आपला रस्ता
खोल शांतशा डोहातील ती तरंग नुक्ता

जंतर मंतर जादू तंतर नाही तिला ठाव
तिचे तिला ठावूक आहे आपले कुठले गाव

होऊन अधीर वाऱ्यासोबत ती भांडत बसते
आपले खेळ ती ताऱ्यासोबत मांडत असते

जन्म काय ? मरण काय ? माहित नाही
कसले जगणे ..कसले वागणे ..विचारत राही

कोवळ्या नाजूक फुलापरी ती उधळी रंग
जगाच्या या रासामध्ये होते दंग

दु:खाला ती हसून टपली देते छान
खेदालाही मानत असते मान सन्मान

दिशांना ती करते आपल्या पायी चाळ
प्रिय तिलाही असेल साचा उघडा माळ

थक्क तिच्या डोळ्यांमध्ये स्वप्ने चार
तिला कधी ना या जिण्याचा झाला भार

वादळांसमोर छाती करून उभी असेल
पाहिल त्याला दिसेल ती नभी असेल

तरीही ती हळवी असेल खूप खूप
अश्रुंचेही कधी पीत असेल खारट सूप

मनी तिच्या राजस कोणी रावा असेल
इथून खूप दूर दूरच्या गावा असेल

आभाळाला पसरून बाहू म्हणते यार
काळ्याकुट्ट शाईसाठी ती ' गुलजार '

निघतानाही तिच्याचसाठी अडतो पाय
तिचे माझे नाते म्हणजे सकळलेली साय

गुणगुणताना गाणी तिची येते सय
अन् तिच्या दुरावण्याचे वाटते भय

Monday, December 5, 2011

विश्वास बसत नाही देवानंद देवा घरी गेले

हर फिक्र को धुएं में उडाता चला गया ...' असे म्हणत आपल्या सदाबहार अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाने हिंदी चित्रपट सृष्टीत पिढ्यानपिढ्या ' स्टार ' पण मनमुराद जगलेले असामान्य अभिनेत देव आनंद यांचे रविवारी लंडन येथे निधन झाले . हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या देव आनंद यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३ . ३० वाजता अखेरचा श्वास घेतला .

स्वत : ची वेगळी स्टाईल , वेगळ्या धाटणीची संवादफेक आणि तरल , मेलोडियस गाणी पडद्यावर जीवंत करण्याच्या अदाकारीने अनेकांच्या आयुष्यात आनंदाची पखरण करणाऱ्या ८८ वर्षांच्या देवसाब यांच्या निधनाचे वृत्त कळले आणि भारतवर्षातील त्यांच्या अमाप चाहत्यांसाठी रविवारची सकाळ सुन्न करणारी ठरली . बॉलिवूड असो की राजकारणी , समाजातल्या प्रत्येक स्तरातून देव आनंद यांच्यासाठी शोक उमटला . त्यांच्या पश्चात पत्नी कल्पना कार्तिक , मुलगा आणि मुलगी , नातवंडे असा परिवार आहे .

लंडनमध्येच बुधवारी अंत्यसंस्कार

सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या पार्थिवावर लंडन येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला असून देव आनंद यांची मुलगी व नात लंडनला पोहोचल्यावर बुधवारी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे . प्रकृतीने साथ दिल्यास देव आनंद यांच्या पत्नी कल्पना कार्तिकही लंडनला रवाना होणार आहेत .

देव आनंद यांच्या मृत्यूसमयी त्यांचे चिरंजीव सुनील देव त्यांच्यापाशी होते . वैद्यकीय उपचारासाठी त्यांना लंडन येथे काही दिवसांपूर्वी आणले होते . लंडनमधील हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य होते . स्थानिक वेळेनुसार रात्री दहाच्या सुमारास देव आनंद यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने सुनील देव यांनी , त्यांना तातडीने नजिकच्या हॉस्पिटलमध्ये नेले . मात्र , तेथे आणण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .

देव आनंद यांचे पार्थिवर मुंबईत आणण्याबाबतही विचार झाला होता . अखेर लंडनमध्येच अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित झाले . कुटुंबीय लंडनमध्ये दाखल झाल्यावर मंगळवार किंवा बुधवारी अंत्यसंस्कार केले जातील , अशी ती माहिती त्यांचे व्यवस्थापक मोहन चुरीवाला यांनी दिली .

प्रार्थना सभा मुंबईत
अंत्यसंस्कार झाल्यावर देव आनंद यांचे कुटुंबीय मुंबईत परतणार असून त्यानंतर त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी प्रार्थना सभेचे आयोजन केले जाणार आहे .
..........

आयुष्यातील सर्व इच्छांची पूर्तता म्हणजे निवृत्तीचा क्षण ! माझे शरीर भलेही दुबळे झाले असेल , पण माझे मन अतिशय सशक्त आहे म्हणूनच मी पुढेच जात राहणार . मी केवळ जगत नाही , मी त्या जगण्याच्याही एक पाऊल पुढे आहे !
- देव आनंद
( २६ सप्टेंबर रोजी दिलेल्या एका मुलाखतीत )
........

फिल्मफेअर कारर्कीर्द
१९५८ : कालापानी , १९६६ : गाईड , १९९१ : जीवनगौरव पुरस्कार . याशिवाय , मुनीमजी ( १९५५ ), लव्ह मॅरेज ( १९५९ ), कालाबाजार ( १९६० ) या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नायकाचे नामांकन मिळाले होते .
....

वेळ माझ्या हातून निसटतो आहे !
मी सतत धावतो आहे . कारण वेळ माझ्या हातातून निसटतो आहे . मला कितीतरी गोष्टी सांगायच्या आहेत , पण वेळ कुठे आहे ? देव आनंद म्हणून मला पुनर्जन्म मिळाला , तर आणखी २५ वर्षांनी लोकांना आणखी एक तरुण अभिनेता मिळेल .
- देव आनंद ( ८७व्या वाढदिवशी )
....

ती त्रयी !
राज कपूर , दिलीप कुमार आणि देव आनंद ! या तिघांनी हिंदी सिनेमाला ग्लॅमर दिले आणि कृत्रिम नायकाच्या इमेजमधून ' हिरो ' चा आविष्कार घडवला . विशेष म्हणजे , वयपरत्वे राज कपूर आणि दिलीप कुमार यांनी सिनेमातून नायकाची कामे थांबवली . परंतु , देव आनंद मात्र कायम नायकच राहिले . १९८३पर्यंत त्यांनी जॉनी मेरा नाम , देस परदेस , हरे रामा हरे कृष्णा सारख्या सिनेमातून नवतरुणींचा नायक साकारला .
...

आय एम देव आनंद !
प्रसिद्ध अभिनेते ग्रेगरी पेक यांच्यासोबत नेहमीच देव आनंद यांची तुलना केली जात असे . स्वत : देवआनंद लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अशी तुलना फारशी पसंत नव्हती . एक काळ असा असतो जेव्हा आपल्यावर काही व्यक्तिमत्त्वांची मोहिनी असते . परंतु , जसे जसे मोठे होत जातो तसतसे आपले स्वत : चे व्यक्तित्त्व आपल्याला गवसत जाते . इंंडियाज ग्रेगरी पेक अशी माझी ओळख व्हावी , असे मला वाटत नाही . आय अॅम देव आनंद !
....

पुण्यातल्या आठवणीत रमले तेव्हा ...
मा . दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निधी उभारणीसाठी पुण्यात एस . पी . कॉलेजच्या मैदानावर लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा मोठा कार्यक्रम झाला . त्यास देव आनंद प्रमुख पाहुणे होते . कार्यक्रमाच्या मध्यतरांची वेळ आली तरी देव आनंद आले नव्हते . अखेर ते रंगमंचावर आले आणि उशिराचे कारण सांगताना म्हणाले , ' बऱ्याच दिवसांनी पुण्यात आलो . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . पुण्यातल्या रस्त्यांमध्ये आठवणी शोधत फिरत होता , म्हणून कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला '.
.....

आणखी दोन सिनेमांची तयारी !
देव आनंद यांचा शेवटचा सिनेमा ' चार्जशीट ' पडद्यावर आला आणि लागलीच पडद्याआड गेला . सेन्सॉर , मि . प्राइममिनिस्टर या सिनेमांचीही अवस्था अशीच होती . परंतु देवसाब त्यामुळे नाऊमेद झाले नव्हते . ' हरे रामा हरे कृष्णा ' च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू झाली होती . शिवाय त्यांना ' गाईड ' ही पुन्हा प्रदर्शित करायचा होता

प्रेमपत्र पहिले तिचे ,

प्रेमपत्र पहिले तिचे ,
सर्व काहीं सांगत होते.
आतुरलेल्या भावनांना ,
शब्द्फुलांनी सजवले होते.
सजवलेला प्रत्येक शब्द ,
फुलाप्रमाणे भासत होता .
अवखळ तिच्या नखरयापरी,
मनामध्ये ठसत होता .
पत्र जेंव्हा वाचुन झाले ,
आनंदाला उधाण आले .
तिच्या मधुर प्रेम वर्षावाने,
मनात प्रेमचांदणे खुलले .
पत्र तिला लिहिण्यासाठी ,
हात माझे सळसळले .
पेन घेतला , कागद घेतला ,
मग मला जाणवले .
पत्र तिला लिहीण्यापुर्वीच ,
शब्द सारे थिजुन गेले .
सुरवात , शेवट तिचीच घेतली ,
मजकुर फक्त माझा होता .
" आय लव यू "
पण तो सुध्दा तिच्या पत्रात ,
दिमाखात झळकत होता .

उभं आयुष्य माझ दुखाच्या वणव्यात पेटलं

उभं आयुष्य माझ दुखाच्या वणव्यात पेटलं
त्यावर कुणी सुखाची फुंकर घातलीच नाही
कवित्व माझ आज पण देताय ग्वाही
नशिबाने नेहमीच थट्टा केली
भाकरीच्या शोधात वाट हरवली
हजार पाचशेच्या नोटा
करीत राहिल्या मला टाटा
खिशात केवळ नाणी उरली
उभं आयुष्य वाया गेल
उर्वरित जीवनरूपी दर्पणी
स्वताच भविष्य पाहतोय
एखादा कुबेर
माझ्यासाठी दार उघडेल का
एखादा कुबेर
माझ्यासाठी दार उघडेल का

आमोल घायाळ

आता माझ्या डोळ्यानी..

पाठीला पाठ लावून बसलो ..
तरी समोर तूच दिसतेस....
मागे वळून नजर भेट होताच....
लाजून गालात हसतेस...




समोर तुला पाहताच...
लवतो डावा डोळा....
हसून तू पुढे गेलीस...
कि हृदयात येतो आनंदाचा गोळा...



आता माझ्या डोळ्यानी..
तुझी वाट पाहणे सोडले आहे...
जेव्हा पासून त्यांचे नाते..
तुझ्या आठवणींशी मी जोडले आहे




अडगलीतल्या वहीत....
आज तुझी तस्वीर सापडली....
तिला पाहून मनात पुन्हा..
तुला भेटण्याची आशा जागी झाली...

खोको खोको च्या खेळात...

खोटा तुझा तो नकार....
नाकावर लटका राग....
हृदय जळतेय माझ्या साठी...
अन मनाचाही त्यात सहभाग..



तुझा माझा खेळ ..
खेळ तो भातुकलीचा....
मोठे होता होता...
मेल जुळे ना कुणाचा..




खोको खोको च्या खेळात...
तुझा नेहमीच मला असे खो...
मला वाटे तू सांगतेस...
तू फक्त माझाच हो...

ती पहिली मिठी, अन तो गोड शहारा ,

ती पहिली मिठी, अन तो गोड शहारा ,
तुझे ते प्रेम अन तो जिव्हाळा ,

त्या गाजवलेल्या मद रात्री ,
त्या फुलणाऱ्या गुलाबी पहाट,

या दोहोंमध्ये रंगलेले आपले ,
ते गोड निरंतर असे संवाद,

आज न जाणो ती कुठे आहे,
तिचे प्रेम अजूनही मनात दडलेले आहे,

या गुलाबी अशा थंडीने,
पुन्हा एकदा आठवण करून दिलीय ग

खूप थंडी आहे सखे,
मला अलवार मिठीत घे ना ग,




खूप थंडी आहे सखे,
मला अलवार मिठीत घे ना ग,

नकार तुझ्या ओठांवर..

मऊ मऊ चादरीत...
झोप माझी पळून जाई..
झोप मला शांत लागे..
तुझ्या मिठीतच गं आई..



दिवस सरता सरता....
तूझ्या आठवणी दाटून येतात...
तू कितीही नकार दिलास तरी....
त्या तुझ्या नकळत मला भेटून जातात...



दिशा बदलून जाते हवा....
तू येण्याचा भास होताच...
मी पण बहरून जातो....
तुझी चाहूल लागताच...




नकार तुझ्या ओठांवर...
मनात मात्र होकार....
हृदयाच्या बंद पाकळीत....
कधीच केला मी तुझा स्वीकार..

तुझ्या डोळ्यात मला... माझचं प्रतिबिंब दिसतं...

एकदा तुला भेटायचे आहे....
मांडीवरतुझ्या झोपायचे आहे...
खांद्यावर डोके ठेवून तुला...
पुन्हा पुन्हा निहारायचे आहे..



संध्याकाळचा संधी प्रकाशात.....
फुलून जातेस तू साजणे ....
तो रवी देखील विसरून जातो मग....
अस्ताला जायचे, पाहून तुझे गोड लाजणे....




चढली हि माझ्यावर ..
तुझ्या ओठांची नशा....
स्पर्श होता त्यांचा...
भुलवी माझी दिशा...




अळवावरच्या थेंबाला...
ओढ ही कुठली...
अळवाच्या पानावरचं...
त्याची जिवन शैली मिटली.



तुझ्या डोळ्यात मला...
माझचं प्रतिबिंब दिसतं...
तु मला पाहत असताना..
माझं मन ही तुझ्यात फ़सतं



तुला पाहते रे मी...
डोळ्यांचे पारणे फ़िटे पर्यंत...
डोळ्यात तुझं प्रतिबिंब साठवेन...
डोळ्यात प्राण असे पर्यंत...

आठव

सिगारॆट शिलगावताना ,
आई , वडिलांनी लावलॆली अगरबत्ती आठव ;

दुसऱ्यावर काठी उगारताना ,
शिक्षकांनी हातावर मारलॆली पट्टी आठव ;

दारुचा घॊट घॆताना ,
ऒंजळीत घ्यायचास तॆ तीर्थ आठव ;

दुसऱ्याला अर्वाच्य शिव्या दॆताना ,
तुझ्या बालपणीच्या बॊबड्या बॊलातील अर्थ आठव ;

इतरांचॆ परिश्रम मातीत मिळविताना ,
तुझ्या बाबतीत हॆच झाल्यावर हॊणारा त्रास आठव ;

आग लावून जाळपॊळ करताना ,
तुझ्या अंगणातल्या मातीचा सुवास आठव ;

पॊलिसांचॆ फटकॆ खाताना ,
तुझी पहीली चूक आठव ;

दुसऱ्याच्या पॊटावर पाय दॆताना ,
तुला कडाडून लागलॆली भूक आठव ;

स्त्रीच्या अंगावर हात टाकताना ,
तुला राखीपौर्णिमॆला न चुकता यॆणारी राखी आठव ;

घरॆ अन वाहनॆ जाळताना ,
तुझी पहीलीवहीली सायकल ' दुचाकी ' आठव ;

हफ्तॆ गॊळा करताना,
घरच्यांनी तुझ्यासाठी गाळलॆला घाम आठव ;

गुन्हॆगारांच्या यादीतला फॊटॊ पाहून ,
मित्रमैत्रिणींनी ठॆवलॆलं तुझं विशॆषनाम ( टॊपणनाव ) आठव ;

दगडफॆकीला दगड उचलताना ,
पाण्यात टाकलॆला खडा आठव ;

दंगली करुन दॆश बर्बाद करताना ,
तॊ स्वतंत्र करायला दिलॆला लढा आठव ;

स्वप्नात कुणाला असंही बघु नये

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे

शब्द मी ओठावर अडखळलेला...

कधी कळलाच नाही तुझा तो ओझरता स्पर्श..
तुझं मन भरून मला पाहण...
खांद्यावर डोकं ठेऊन...
मला निहरात राहण..




शब्द मी ओठावर अडखळलेला...
शब्द मी मनात घोळणारा..
शब्द मी तुझ्या भावना समजणारा..
शब्द मी तुझ्या ओठांना बोलके करणारा..

जो हमारे बहुत करीब है

तु मला पाहुन...
रोज हसत पुढे जायचीस...
मी अजुन हि तुला पाहतोय का..?
सारखे मागे वळून पाहायचीस..




शेवटची भेट तुझी आठवता.....
आठवणी दाटतात मनात....
आठणींना पूर आला कि
जीव अडकतो कंठात...





दुर तू असलीस तरी..
तुझ्या आठवणी आहेत सोबत...
त्यांच्याच सहवासात तर..
मी रोज असतो रात्र रात्र जागत..



जो हमारे बहुत करीब है
उसे हम छू नही सकते
शायद इसे 'मजबूरी' कहते है, जो हमे
चाहता है
उसे हम पा नही सकते
शायद उसे 'नसीब' कहते है!"
इसी 'मजबूरी' और 'नसीब' के बीच एक
रिश्ता पनपता है
शायद इसे "मोहब्बत" कहते है!!...

चेहरया वरचा पदर जेव्हा..

तू बोलत असलीस कि..
नुसतेच तुला पाहत असतो.....
तुझ्या प्रत्येक शब्दाला....
माझ्या कवितेसाठी चाळत असतो...




चेहरया वरचा पदर जेव्हा..
हातुन तुझ्या सरकतो....
आकाशातील चंद्र देखील..
त्याचे प्रतिबिंब पाहून फ़सतो..



तुझ्या साठी जगायचे आहे....
तुला स्वप्नात जागवायचे आहे...
डोळे मिटता समोर तूच दिसावीस....
असेच काहीसे स्वप्न रोज पहायचे आहे...




रंग मी चढवला....
तुझ्या प्रेमाचा अंगावरी...
दूर असूनही तू, नाव तुझे....
सतत येते ओठावरी...



तुझ्या सौंदर्याने माझ्या ...
दाही दिशा सजलेल्या..
तुझ्याच स्वप्नात मी माझ्या...
साऱ्या रात्री जगलेल्या...




पोहचू दिलेच नाही कधी तुझ्या पर्यंत...
जे लपलय माझ्या शब्दात...
कसे सांगू गं तुलां मी....
अजुन ही जपतोय तुला स्वप्नात..

Wednesday, November 30, 2011

तु काल अनपेक्षित समोर आलीस...

तु काल अनपेक्षित समोर आलीस...
हृदयाच्या बंद दाराला ठोटावून गेलीस...
मी तुला विसरलो नाही अजुन..
याची जाण मला तू देऊन गेलीस..




कित्येक वर्षांनी लावलेला..
हाताच्या बोटावरून नेम...
असा आज रंगला होता..
छोट्य़ांसोबत गोट्यांचा गेम..

गुलाबी ओठांना तुझ्या... आकार त्या गुलाबाचा...

गुलाबी ओठांना तुझ्या...
आकार त्या गुलाबाचा...
स्पर्श करता फ़ुलुन येती...
संच हा दोन गुलाब पाकळ्य़ांचा.



मी थेंब तो एक....
पानावरच आयुष्य जगलेला...
एवढसं माझं आयुष्य...
की त्या पानावरच विरलेला.




तु काल अनपेक्षित समोर आलीस...
हृदयाच्या बंद दाराला ठोटावून गेलीस...
मी तुला विसरलो नाही अजुन..
याची जाण मला तू देऊन गेलीस..

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

आठवते आपली ती पहीली

आठवते आपली ती पहीली
भेटएकमेकांकडे बघण्यासही लाजलो होतो
हळूहळू नजर एकमेकांकडे वळताच
आपण जागेपणीच निजलो होतो
आठवते आपली ती पहीली
भेटतुझं ते पावलोपावली अडखळणं
तेवढचं एक निमित्त पाहून
तुजपाशीमाझं आधार देण्यासाठी वळणं
आठवते आपली ती पहीली
भेटपुन्हा भेटण्यासाठी किती आतूर झालेलो
तेव्हा म्हणालीस तुझ्या जिवनातमी
एक खास भेट म्हणून आलेलो
आठवते आपली ती पहीली
भेटमन कसं चंदना सारखं दरवळलं होतं
स्वप्नांचे कोवळे दव झेलतमनात
प्रेम कसं हिरवळलं होतं
आजही ती पहीली भेट
माझं मन गच्च धरुन आहे
जरी नसलो तुझ्या कपाळावर
तरीतुझ्या अंतरी ऊरून आहे...

स्वप्नांना साथ तुझ्या .. माझ्या स्वप्नांची...

तुझं काही चुकताच...
लगेच पकडतेस कान...
याच तुझ्या अदेवर...
विसरतो मी माझे देहभान.



खट्याळ तुझ्या नजरेला...
भिडते जेव्हा माझी नजर..
खुदकन हसतेस गालात...
लाजत सावरतेस शालूचा पदर.



स्वप्नांना साथ तुझ्या ..
माझ्या स्वप्नांची...
डोळे मिटताच...
दिसे वाट नव्या दिवसाची.

खुदकन हसणे तुझे...

सांभाळशील का हृदयाला माझ्या....
तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात........
मी पाहतो तुझा चेहरा..
प्रत्येक पौर्णिमेच्या चंद्रात ...




तू बोलत असलीस कि..
नुसतेच तुला पाहत असतो.....
तुझ्या प्रत्येक शब्दाला....
माझ्या कवितेसाठी चाळत असतो..



खुदकन हसणे तुझे...
अन मी तुला पाहत बसणं ....
तला नजर लागू नये माझी...
म्हणून माझ्या नजरेत माझंच फसणं ...


मंजूळ तुमच्या शब्दांनी...
जुळले आपले नाते..
शाळेत नाही शिकलो जे...
तुमच्या ते शिकुन उघडले नवे खाते...

उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारी कडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही!

सोनेरी हे उन आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही!

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
भीर भीर उडती
चोहीकाडी!

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायचे मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या!

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूरभूर!

"तुझ्या गळा, माझ्या गळा

"तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा "
"ताई, आणखि कोणाला ?"
"चल रे दादा चहाटळा !"

"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखि गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !"
"मला कुणाचे ? ताईला !"

"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखि शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"

"खुसू खुसू, गालि हसू"
"वरवर अपुले रुसू रुसू "
"चल निघ, येथे नको बसू"
"घर तर माझे तसू तसू."

"कशी कशी, आज अशी"
"गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी"
"तर मग गट्टी कोणाशी ?"

बालगीते....अ आ आई

बालगीते....अ आ आई
बालगीते....अ आ आई
अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई

गवसणी घालायची होती..... मला या प्रेमाला....

सोबत तू असताना ...
तुझ्या डोळ्यात हरवून जायचो ...
विरहाच्या क्षणाला मी...
मी माझेच डोळे मिटून घ्यायचो....



गवसणी घालायची होती.....
मला या प्रेमाला....
कधी निसटले हातून....
कधी कळले नाही कुणाला..



शब्दांचे अर्थ मज...
आता लागलेत कळायला....
जेव्हा माझे शब्द....
लागले सुरात वळायला...



स्वप्नांच्या राज्यात ...
तुझे माझे राज्य होते....
सत्यात आल्यावर..
आपले जीवन विभाज्य होते...




अटक मटक चवळी चटक
चवळी झाली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
फोड काही फुटेना
घरचा पाहूणा उठेना

डोळ्यातील अश्रुंना... वाहनेच फ़क्त माहीत...

लाजरा चेहरा तुझा..
मला पाहुन फ़ुलायचा...
सारी लाज दुर करुन ...
माझ्या मिठीत विरायचा..


तु आता माझी नाहीस...
हे सत्यच किती घातक...
अजुनही तुझी वाट पाहतोय..
जशी पावसाची वाट पाहतो वेडा चातक..



डोळ्यातील अश्रुंना...
वाहनेच फ़क्त माहीत...
सुखात उदरी येऊन...
तर दु:खात त्याची शिदोरी घेऊन..



सारेच दोष मला देऊन...
तू मला जाशील का विसरुन ....?
तुझ्या मनाला विचारुन बघ...
माझ्या आठवनींना जाशील का सारुन..

मुली कशा पटवाव्या…

. .. मुली कशा पटवाव्या…
मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात
प्रेमात पडण्याच्याबाबतीत.
तशीही प्रत्येकाच ीच इच्छा असते
एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास
९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु
जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’
कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न
ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं
आणि मग हात चोळत बसावं लागतं.
प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात
मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं
म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ
असते. पण होतं काय,
की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला)
लहान पणी शेंबुड
पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं
असतं, मोठा झाल्यावर त्याची /
किंवा तिची ती नाक
पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही,
त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट
दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के
लोकांच्या बाबतीत खरी असते, अगदी एक
टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं
रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं
खरे शहाणे असतात.
आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार
जुन्या काळच्या आहेत.. तरी पण
आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.
१) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं
तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं,
आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर
खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात
तुम्ही जवळचे सुटे पैसे काढून देता आणि……पुढे
तुमच्यावर अवलंबून कुठपर्यंत केस नेता ते.
२)ट्रेनमधेभरपूर मराठी वाचनीय साहित्य
घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली,
तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक
जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल,
आणि मग ओळख …. वगैरे….
३) खूप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे
काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे
याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु
व्हायची वेळ झाली की बाहेर
कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा,
आणि सारखं घड्य़ाळाकडेबघत रहा. हाउस फुल्ल
चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी ,
ज्यांच्याकडे तिकिटं नाहीत अशांना हेरून
त्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत ऑफर करा..
आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण
आला नाही म्हणून….
आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर
याचं कारण म्हणजे मुली एकट्या कधीच
सिनेमाला जात नाही्त, एक तर बॉय फ्रेंड
तरी असतो, किंवा एखादी मैत्रीण
तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर
आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात
ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच
तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणून
चढ्या किमतीत कुणाही माणसाला विकून टाका.
४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच
वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन
तिला लिफ्ट ऑफर करा..
५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत
असतांना एकदम जोरात पाउस येतो,
आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार
होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच
आडोसा नाही, तेंव्हा प्रवास
करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला काय
सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..
६) एखादी आपल्या घराच्या आसपास
रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा.
तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन
ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने
प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात
की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता.
तिच्या येण्याच्यावेळाचे पण पालन करा.
म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल.
७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस
लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक,
साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात
जाणं सुरु करा. चेहेऱ्यावरशक्य तेवढे बावळट
भाव ठेऊन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत
अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस
तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास
बसला की तुम्ही इतरांसारखेनाही,
तेंव्हा हळूच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे
वा…. तुम्ही पण
येता का सिध्दी विनायकाला?? जागृत
देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या
कळसालाच बघून हात जोडा आणि पुढे तुमच्याच
हातात आहे सगळं….
८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स
कधीच चुकवू नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर
फिरायला खूप आवडतं.
९) टिपीकल मराठमोळ्या
मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशीच
दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु
शकते.
१०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल
तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडून
देतो, असं म्हणून लिफ्ट द्यावी.
हल्ली चेहेरा ओढणीने झाकून प्रवास
करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोणी ओळखेल
याची भिती नसते.

उभं आयुष्य माझ दुखाच्या वणव्यात पेटलं

उभं आयुष्य माझ दुखाच्या वणव्यात पेटलं
त्यावर कुणी सुखाची फुंकर घातलीच नाही
कवित्व माझ आज पण देताय ग्वाही
नशिबाने नेहमीच थट्टा केली
भाकरीच्या शोधात वाट हरवली
हजार पाचशेच्या नोटा
करीत राहिल्या मला टाटा
खिशात केवळ नाणी उरली
उभं आयुष्य वाया गेल
उर्वरित जीवनरूपी दर्पणी
स्वताच भविष्य पाहतोय
एखादा कुबेर
माझ्यासाठी दार उघडेल का
एखादा कुबेर
माझ्यासाठी दार उघडेल का

आमोल घायाळ

Friday, November 25, 2011

उसाची कांडी कापसाला जाऊन भेटली.

उसाची कांडी कापसाला जाऊन भेटली.
आणि महागाईची ठिणगी शरद पवारांच्या कानाखाली पेटली..


तू मनात माझ्या..
तु हृदयात माझ्या...
दुर जरी असलीस तरी..
तू स्वप्नात माझ्या.



हृदयाला खुप आवरले...
प्रेमाच्या काटेदार कुंपणापासून...
तरी हरवले ते...
चोरलेस तू माझ्या पासुन.

प्रत्येक दिवसी तुझा चेहरा....

मी मलाच शोधतोय आता...
या भरकटलेल्या वाटेवर....
दूर कुठेतरी हरवलेला मी....
आज तुला शोधतोय इथवर...


प्रत्येक दिवसी तुझा चेहरा....
शांत बसता मज दिसतो.....
तकदीर माझी अशी कशी....
तुझ्या साठीच मी हि जगतो...

प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर पहा...

प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर पहा...

तू सोबत असताना...
माझ्या हातात तुझा हात होता....
झीन झीन येता त्याला प्रेमाची....
चटकन तुझा साथ होता...

अंगणात तुळस शिखरावरती KaLas

अंगणात तुळस
शिखरावरती KaLas
हीच तर महारास्त्राची ओळख...
सांडलेल्या रक्तात सुद्धा दिसणार नाही काळोख,
मराठी आहोत हीच आमची ओळख.
*जय महाराष्ट्र*
*संग्रहित*

होशिल का गं तू माझी..

कोण म्हणतं प्रेम करायला..
एक प्रेयशीच पाहीजे...
तिच्या आठवनीत सुद्धा जगता येत..
कधी कधी पाहीजे तसे...


तु फ़ुला सारखी फ़ुललीस...
की मला भ्रमर व्हावेसे वाटते..
तु मोहरत असताना...
तुझ्या भोवती भिरभिरावेसे वाटते..




तुझ्या आयुश्यात फ़ुले पेरता पेरता..
सारे काटे आले माझ्या पदरात ...
दोन क्षणाचे नाते आपले...
मग ओढ हि अशी दिनरात..



शब्दांच्या खेळात या..
नेहमी तुच जिंकावं...
मी मात्र हरुन सुद्धा...
तुझ्या साठी हसावं..




मोहात मि नव्हतो कधीच..
पण तुझी काळजी होती...
तुझ्या सहवासाची येण्याची...
सवय मज जडली होती




कुणीतरी म्हटले मला..
नाव बदल तुझं...
कस समजाऊ मी त्यांना..
त्यातचं तर जपतोय अस्तित्व मी तुझं



होशिल का गं तू माझी..
हे माझे काही उद्गार...
ते कानावर पडताच तुझ्या..
तु केलेला तो हाहाकार..




मी भिजू नये म्हणून..
तु माझ्या डोक्यावर धरलेला हात...
त्या पावसा सोबत वाहत होती..
ओसंडुन आपल्या प्रेमाची लाट...

मेलेली मढी पुन्हा उकरून काढून

मेलेली मढी पुन्हा उकरून काढून
ताज्या मढ्यावर सरकारी कफन,
तोंडावर आपटवला राजा CBI ने
तेव्हा पुनरपी आठवला महाजन..!!

बुडत्याला उरला काडीचा आधार
स्वर्गीय मंत्र्यांच्या चौकशीचा हट्ट,
नव्या दूरसंचारच्या राजाची खेळी
मनसुबा स्पेक्ट्रमात बनायचं लट्ठ..!!

तेरी भी चूप अन मेरी भी चूप फॉर्म्युला
अधिच्यावर घालतो नंतरचा पांघरून
अळीमिळीच्या डावात पाय पसरतात
पर्वा नाही असो मग केव्हडही अंथरून..!!

परवान्यांच्या वाटणीतही अलिखित
मलई लाटण्याचा लाटला परवाना,
देशाचे सेवक हे सत्ता-खुर्चीची शोभा
मक्तेदारीचा हा सरकारी खजाना..!!

देवा आता तूच सावर रे गरिबाला
भोवळ आणी हे भ्रष्टाचाराचे आकडे,
हरलास तू ही ह्या पृथ्वीवरल्या स्वर्गी
सद्बुद्धी वाटपाचे प्रयत्न पडले तोकडे..!!

मी पाहिलेय प्रेम करून......

मी पाहिलेय प्रेम करून.......
पाहिलंय कुणावर तरी जीवापाड मरून....
अनोळखी असे कुणी आपले जाते होऊन....
हृदयाच्या खोलीत अलगद जाते राहून....




पेलले आव्हान मी...
तुझ्या माझ्या प्रेमाचा ....
लाभला तुझ्या संगतीत
गंध त्याला कस्तुरीचा..




काय पाहतेस अशी दुरून....
मी अजूनही तिथेच आहे....
तू येशील पुन्हा वळून....
याच आशेवर जगत आहे..

Monday, November 21, 2011

प्रेम करु नका कधी,

प्रेम करु नका कधी,
असे सर्वजण म्हणतात गं_
पण कोणी किती काही करा,
प्रेम ते आपोआप होत गं_

त्या त्या वेळेला त्या त्या क्षणी,
बरोबर योगायोग जुळतात गं_
ते सुंदर नाजुक क्षण मग_
अविस्मरणीय होवुन जातात गं_

म्हटलयं ना कोणीतरी या आयुष्यात,
प्रत्येक जण प्रेमात पडतो ग_
कारण प्रत्येकाच्या मनात एक,
हृद्यमर्दम दडलेला असतो ग_


milind

तुझ्या हातात हात देणं

तुझ्या हातात हात देणं
हे सोप्पं नव्हतं मला
परिणामाची चिंता न करता
विश्वासाने तरीही मी हात पुढे केला !

मनापासून प्रेम केलं तुझ्यावर म्हणून
घरापासुनही पोरकं केलं स्वतःला
माझ पूर्ण अस्तित्वच
अर्पण केलं मी तुला !!

पण आज तो हातही
तू हिरावून घेतलास
तेव्हा निर्णय घ्यायला लावून
आज अचानक पलटलास !!!

असा कसा माझ्या भावनाचा
बाजार तू मांडलास
तुझ्यासोबत मांडलेला डाव
अर्ध्यावरच उधलावलास !!!

आता मी कुठे जाऊ ???
नाती असताना अनाथ म्हणून राहू
का रे सगळ्याच नात्यांपासून
पोरकं केलास मला ???

का रे सगळ्याच नात्यांपासून
पोरकं केलास मला ???

सुंदर स्त्री दिसली की नकळत वळतात नजरा...

सुंदर स्त्री दिसली की नकळत वळतात नजरा...
रेखीव पुष्ट देहयष्टी पाहुनी तुप्त होते आपुले मन...
एक क्षण वाटत वाईट असं सौंदर्य नाही आपलं...
क्षणात होता नजरा नजर लाजेने चूर होते मन...


सौंदर्याची किंमत ना नाही मोजावी लागत सुंदर स्त्रियांना...
जपावी तिने नित्य साधी रहाणी अन उच्च विचारसरणी...
लाघवी व्यक्तिमत्व मिठास वाणी शुद्ध आचरण ठेवी निर्मल...
सुंदर स्त्रीकडे पाहता दिसावी आपुलीच माय तिच्या ठिकाणी...

वागण माझं खुपतंय तुला हे कळतंय मला...
तुझ्या धारदार शब्दांनी घायाळ केलंस मन...
आला राग विचार नाही केलास तुझ्या चुकीचा...
धरला मी अबोला झालो स्तब्ध शांत झालं मन...


मनातील काही भावना नाही सांगता येत शब्दात...
नाही शब्द फुलत ओठी नाही येत प्रितीच्या भावना...
नयन बोलती चेहराही खुलतो ओठ हसती आनंदानी...
कळत नकळत झालेला तुझा स्पर्श सांगे प्रीती भावना...

स्वत:साठी सगळेच असतात जगत...
एक दिनी जगून पहा फक्त दुस-यासाठी...
येईल समजून दु:ख त्यातून शोधा सुख...
जाणा सुख दु:खांचा खेळ आपल्यासाठी...

कठोर शब्द तुझे मनाला घायाळ करुनी गेले...
झालेली चूक आली लक्षात वाटलं खूप वाईट...
चूक येईलही सुधारता मनाला जखमेचे काय...
जखमेचा व्रण मनाला चिकटून रहाणार घट्ट...


तुझ्यावर केलं मी मनापासून प्रेम...
जिभेवरील शब्द ओठीच का थबकले...
नाही व्यक्त करू शकलो मी प्रेमभावना...
तू संधी देऊनही माझे प्रेम अबोल जाहले...


राहणे शक्य नाही ईश्वरास आपुल्या भक्तांचे घरी...
शोधिला उपाय ईश्वराने रुपात आईच्या राहिला...
आई आपणासी परम पूज्य लीन व्हावे चरणी...
भाग्य थोर म्हणुनी सहवास आईचा लाभला...


क्षण ते प्रितीचे लागतात विसरावे...
एकतर्फी प्रीतिला नसतो अर्थ काही...
येईल आठवण जेव्हा ठेवावे शांत मन...
प्रितीशब्द गुंफण्याचे तिच्या नशिबी नाही...




अर्थपूर्ण शब्द तुझे ओठी फुलतात सहजतेने...
कागदावर उमलतात सुंदर कवितांच्या रुपात...
दुखितांना देतात आनंद हसवितात पोट भरून...
आनंदी जीवनाचे रहस्य बहरते तुझ्या शब्दात...


हातावरील रेषा आपल्या सांगतील का भविष्य...
पाहिल्या असंख्य रेषा गोंधळ होईल मनाचा...
शहाण्यांनी लागू नये मागे हातावरील रेषांच्या...
उभ्या आडव्या रेषा दावती मार्ग आपुल्या दु:खाचा...


पैसे खाणारे अनेक आहेत आपल्यात...
पैसा देई मौज मज्जा धुंद करी मनाला...
अन्न ही खाणारे आहेत की आपल्यात...
अन्न देते आरोग्य शक्ती समाधान मनाला...


आपल्या हातावरील असंख्य रेषा...
घडवीत नाहीत आपलं नशीब कधीही...
आपलं नशीब घडतं बुद्धी अन कष्टानी...
प्रामाणिक कष्ट देती समाधान कधीही...


मागे वळून कधीही पाहू नका...
आत्मविश्वासाने पुढे जात रहा...
येणारी संधी कधी सोडू नका ...
मराठीचा अभिमान ठेऊन रहा...


आपली उचली जीभ लावली टाळ्याला...
अपशब्द बोलून दुखवू नये कोणालाही...
गोड बोलून आपणास जग जिंकता येत...
किमया हि शब्दांची फुलवावी बहरावीही...

हर नज़र को एक नज़र की तलाश है,

हर नज़र को एक नज़र की तलाश है,
हर चहरे मे कुछ तो एह्साह है!

आपसे दोस्ती हम यूं ही नही कर बैठे,
क्या करे हमारी पसंद ही कुछ "ख़ास" है!

चिरागों से अगर अँधेरा दूर होता,
तो चाँद की चाहत किसे होती!

कट सकती अगर अकेले जिन्दगी,
तो दोस्ती नाम की चीज़ ही न होती!

कभी किसी से जीकर ऐ जुदाई मत करना,
इस दोस्त से कभी रुसवाई मत करना!

कभी अगर दिल भर जाये तो संग अपने रुला लेना,
तनहा जी कर अपने इस दोस्त को इतने बड़ी सजा ना देना!

दोस्ती सची हो तो वक्त रुक जता है,
अस्मा लाख ऊँचा हो मगर झुक जता है!

दोस्ती मे दुनिया लाख बने रुकावट,
अगर दोस्त सचा हो तो खुदा भी झुक जता है!

दोस्ती वो एहसास है जो मिटती नही,
दोस्ती पर्वत है वोह, जोह झुकता नही!

इसकी कीमत क्या है पूछो हमसे,
यह वो "अनमोल" मोती है जो बिकता नही!

सची है दोस्ती आजमा के देखो,
करके यकीं मुझपर मेरे पास आके देखो!

बदलता नही कभी सोना अपना रंग,
चाहे जितनी बार आग मे जला के देखो !!

उस पेटला आखिर गोड धुरात

उस पेटला आखिर गोड धुरात
कापूसही आता शर्थीने धुपतोय,
वस्त्र कापसाचंही नशिबी नाही
न्यायासाठी बळीराजा खपतोय..!!

घाम गाळतोय एकीच्या लढाईत
पोटाला बसतोय जीवघेणा चिमटा,
अस्मानी-सुलतानी नशिब भोगात
Package चं लोणी लाट्तोय भामटा..!!

कृषीप्रधान म्हणवते भावी महासत्ता
शेतकी धोरणांना वाटण्याच्या अक्षता,
आभाळाऐवजी पाऊस डोळ्यात दाटतो
स्वार्थावला वाली गाभणली दक्षता..!!

योगवाले, उपोषणवाले टेकतील हात
दिखाऊपणाचं सोंग पडेलं महागात,
कालचे पाढे पंचावन्न खूब म्हणत पुन्हा
२०१४चा अभागी मतदाता येईल रंगात..!!

कायदा - अंमलबजावणीचा आभासी खेळ
संसदेपेक्षा श्रेष्ठ असेलं का गांधीवादी माणूस?
काळ्या बॅंका आता चक्क डोईजड होताहेत
आतातरी फिटेलं का गुंतवणुकीची हौस..!!

बलिदानाचं रक्त खचितंच स्वर्गी टाहो फोडेलं
कुंपणानेचं बांधलंय भ्रष्टाचाराशी 'सु'-संधान,
धुळीस मिळतंय ऐतिहासिक स्वप्न उष:कालाचं
कुठल्या तोंडाने म्हणणार "मेरा भारत महान"..??

ओठावरच्या लालीचा तुझ्या.... रंग लाल लाल....

हवाहवासा स्पर्श तुझा....
सुखद हर्ष देऊन गेला.....
ओठावरच्या लालीला....
गाली माझ्या उमटवून गेला....



ओठावरच्या लालीला तुझ्या...
अर्धे वाटून घ्यावे..
मिठीत येता तू...
माझ्यातच सामावून जावे....



ओठाला भिडता ओठ....
हृदय लागते धडधडायला...
ओठातील मधुर काव्य.....
शब्दात लागते उतरायला...




गालावरची खळी तुझ्या...
ओठांनी मला चाखायचेय..
तुझ्या संगतीने सखे
आयुष्याचे गणित अखायचेय...



आठवते तुला....
मी दिलेले तुला पहिले चुंबन....
लाजून तू मग...
केलेले ते प्रेमळ आलिंगन...




ओठावरच्या लालीचा तुझ्या....
रंग लाल लाल....
तिला उमटवून घेण्यासाठी...
आतुरलेला माझा गाल...

तू डोळ्यापासून दूर जाताना...

मी कधीच म्हटले नाही..
तिने माझे प्रेम जपावे....
कडू गोड आठवणीत कधी....
तिने मला टिपावे....



तू डोळ्यापासून दूर जाताना...
अश्रूंनी पापण्या भरून जातात ..
वळणावरच्या रस्त्यावर जेव्हा....
तुझ्या आठवणी नजरे आडून जातात...



मी म्हटले होते तुला....
होशील का ग तू माझी....
लाजून हसली होतीस गालात....
मुक्यानेच दिला होतास प्रतिसाद...

Saturday, November 19, 2011

तू सोबत असलीस कि.

माझ्या सखीच्या मागे ,
अक्खे मृगजळ जुंपलेले ,
पण तिचे मन मात्र ,
होते माझ्यातच गुंतलेले ,



काल अवचित मला..
"मृगजळ" भेटले.....
कधी फसवे.. कधी रुसवे....
त्याने मला गाठले...



तू सोबत नसताना....
सोबत असते तुझी सावली....
अडखळता मी कुठे....
साथ देते तीच पावलो पावली...




तू सोबत असलीस कि.
लोकांचे डोळे टवकारायचे....
त्यांनी पहावे म्हणून..
आपण दोघे अजून जवळ यायचे...

Thursday, November 17, 2011

मी माझे प्रेम फक्त..

मी माझे प्रेम फक्त..
माझ्या शब्दातून मांडून गेली...
जे तुला कधी....
कळलेच नाहीत मुळी.....



माझ्या अव्यक्त भावनांना...
जोड माझ्या शब्दांची....
मिसळले प्रेम तुझे...
प्रीत फुलली माझी तुझी...




माझ्या सखीच्या मागे ,
अक्खे मृगजळ जुंपलेले ,
पण तिचे मन मात्र ,
होते माझ्यातच गुंतलेले ,

तू फुलासारखी फुललीस...

कसं कळते ग तुला...
माझ्या मनात काय आहे.....?
न सांगताच कळते सारे.....
हेच का ग ते प्रेम आहे...?



तू फुलासारखी फुललीस...
कि मला भ्रमर व्हावेसे वाटते.....
ओठावर वरच मध चाखून....
तुझ्या भोवती भिरभिरावेसे वाटते...



मला पण वाटलं होतं...
मी तुझ्या मनातले ओळखावे....
त्याच निमित्ताने.....
तुझ्या अजून जवळ यावे...

"माझ तुझ्यावर प्रेम आहे..."

तुझा रुसणे ....
खोटे खोटे रागावणे....
घायाळ करते हृदयाला....
तुझे ते खळखळून हसणे...



लटक्या रागाला तुझ्या.....
स्पर्श माझा पुरेसा असतो....
गळून पडतो तो हि....
जेव्हा मी सोबत असतो...



मी तुला पहिले...
अन मलाच विसरून गेलो.....
तुझ्या सोबतचे ते क्षण....
नेहमी जगत गेलो...




आवडते मला खूप..
तुझी वाट पाहत थांबायला....
तू जवळ नसतानाही...
तुझ्या आठवणीत रमायला...



"माझ तुझ्यावर प्रेम आहे..."
तू हळूच माझ्या कानात म्हटले होतेस....
माझे असलेले माझं हृदय तू
अलगद चोरून नेले होतेस..

"प्रेयसी :- तू दुसर्या मुलीकडे बघतोस

"प्रेयसी :- तू दुसर्या मुलीकडे बघतोस तेव्हा तिच्यात प्रथम काय बघतोस ?

प्रियकर :- कोणाच सुंदर हास्य, कोणाचा सुंदर चेहरा, कोणाचे सुंदर डोळे .... अस बघतो का ग ?

प्रेयसी :- ( रुसून, फुगून, नाक मुरडून) सगळी मुले सारखीच असतात !!

प्रियकर :- ( तिला जवळ घेऊन) पण सुंदर हास्य, सुंदर चेहरा, सुंदर डोळे, सुंदर मन आणि सुंदर हृदय हे सगळ एकाच ठिकाणी फक्त आणि फक्त

तुझ्याकडेच मला दिसतं आणि दर वेळी मला हे त्या मुलींकडे बघून जाणवतं !!!!"

क्षणभर तुझ्या आठवणींना....

जाळल्या नंतर राख हि माझी...
तुझ्या प्रेमात रंगलेली...
तुझ्या स्पर्शाने ती....
विझून गेलेली...



क्षणभर तुझ्या आठवणींना....
आज दूर ठेऊन पहिले ....
तुझ्या नावाने धडधडणाऱ्या हृदयाला....
क्षणभर रोखून पहिले....




माझ्या लेखणीला.....
माझ्या भावनांची साथ .....
लिहिते ती तेच.....
जे असते माझ्या मनात....

क्षणभर तुझ्या आठवणींना....

मोगऱ्याच्या सुगंधाने....
सकाळ आज मोहरून गेली....
सूर्य आला डोक्यावर ......
अन पहाट टळून गेली.....



जाळल्या नंतर राख हि माझी...
तुझ्या प्रेमात रंगलेली...
तुझ्या स्पर्शाने ती....
विझून गेलेली...




क्षणभर तुझ्या आठवणींना....
आज दूर ठेऊन पहिले ....
तुझ्या नावाने धडधडणाऱ्या हृदयाला....
क्षणभर रोखून पहिले....

मला ते दिवस हवे आहेत ..................

मला ते दिवस हवे आहेत ..................

मला ते दिवस हवे आहेत ... ..................
सकाळी सकाळी उठून शाळेत जायचे ...
बाईंचा धडा अन गृहपाठ ..
सरांची छडी अन शाळेचा डब्बा ..
यातच सारा दिवस जायचा ..
मला ते दिवस हवे आहेत ..................
दिवसभर चीनचा ,कैर्या पाडत उनाडक्या करायच्या ...
कधी दिवसभर क्रिकेट खेळून हात पाय दुखायचे ..
आई कडे icecrm साठी हत्त करायचा ...
अन बाबांनी तो क्षणात पुरवायचा ...
मला ते दिवस हवे आहेत ..................
पावसात नाचायचे अन चिखलात खेळायचे ..
निखळ हसायचे अन मनोसक्त रडायचे ...
मित्रांची निर्मल मैत्री असायची
कदीच ती स्वार्थी नसायची ...
मला ते दिवस हवे आहेत ... ...............
एकत्र खेळण्यात मजा असायची..
मी तू मी भांडण्यात गम्मत असायची
वाढदिवसाला cake आणून पार्टी व्हायची ...
अन मित्रांची ती वाक्य आपली दोस्ती कधी न तुटायची ..
मला ते दिवस हवे आहेत ...
आयुष्य जगण्यात खरा आनंद वाटायचा ,
प्रतेक दिवस नवीन सुख आणायचा ...
माज्या लाडिक बोलण्याचा सर्वाना कौतुक असायचे ..
माज्या हुशारीचे बक्षीस भेटायचे ..
मला ते दिवस हवे आहेत ...
आई बाबा ताई फक्त यांचामध्ये जीवन गुरफटलेले असायचे
प्रेम म्हणजे काय ते फक्त त्यांचा कडून च कळायचे ...--Specially dedicated to
one of my best friend.--

अश्या एका संध्याकाळी.... तुझी माझी भेट व्हावी...

अश्या एका संध्याकाळी....
तुझी माझी भेट व्हावी...
अलगद नभातुन उतरावे ढग ...
अन प्रत्येक थेंबात तू भिजुन जावी...




डोळ्यांना आज कसले हे...
स्वप्न सतावत आहे...
तुझ्या आठवणींना हे..
रात्र रात्र जागवत आहे..




तुला भिजताना पाहून...
पाऊस तुफ़ान बरसतो...
तुला स्पर्श करण्यासाठी...
वेडा थेंब सरसर खाली येतो..

दुःखाच्या उन्हात अन सुखाच्या सावलीत,

दुःखाच्या उन्हात अन सुखाच्या सावलीत,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खूप जगलोय मी..!!

प्रेमाच्या वर्षावात अन इर्षेच्या दुष्काळात,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खूप हसलोय मी..!!

वासनेच्या धगीत अन पवित्रतेच्या शीतलतेत,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खूप चाललोय मी..!!

बालीशपणाच्या भातुकलीत अन पोक्तपणाच्या जुगारात,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खूप हरलोय मी..!!

श्रीमंतीच्या सुर्योदयात अन गरिबीच्या सुर्यास्तात,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खूप होरपळलोय मी..!!

शरीराच्या बाजारात अन मन-भावनांच्या सौद्यात,
कधी मन मारून कधी मनसोक्त....खरंच खूप थकलोय मी..!!

माउलीतला हक्काचा ईश्वर

माउलीतला हक्काचा ईश्वर
सरते शेवटी खुणावतोय,
आई बनून जन्मला तो
लेकराकडून दुणावतोय..!!

ममतेची कदर पामराला
जन्मी ह्या उमगेल काय,
सरून जाईल करंटा लेक
माय पुन्हा जन्मेल काय..??

दुधाचं कर्ज नाही रे बाळा
कर्तव्याची जाण राहू देत,
माणुसकी म्हणून निदान
ममतेचा मान असू देत..!!

पंखात बळ भरलेलं पाखरू
आज घेतंय गगन भरारी,
घरट्यातल्या वार्धक्याला
आशा तुझीचं रे संसारी..!!

आतातरी वासरा कृतज्ञ हो
गोठ्यात हंबरतेय बघ गाय,
जिच्या आधाराने वाढलास
निराधार झालीये आज माय..!!

मी एक थेंब....आकाशातून कोसळणारा...

मी एक थेंब....आकाशातून कोसळणारा...
मी एक थेंब....तुझ्या गालावरून ओघळणारा....
मी एक थेंब....तुझ्या डोळ्यात तरळनारा ....
मी एक थेंब....तुझ्या स्पर्श साठी तरसणारा....



प्रेमात म्हणे असेच होते...
अनोळखी असे कुणी आपले होऊन जाते...
डोळ्यातही दिसतात तिची स्वप्ने.....
आपले हृदय नकळत कुणी चोरून नेते....





तुझ्या मनातील शब्द कधी...
आलेच नाहीत ओठावर....
ओळखले होते तुझ्या डोळ्यात....
पण शब्द माझेही रुसले होते तुझ्यावर...

त्या नदीच्या काठावर...

कसा विसरशील तू मला....
मी तुझ्या हृदयातच वसलेला...
तुझ्या प्रतीक्षेत अजूनही..
त्याच वाटेवर बसलेला....



त्या नदीच्या काठावर...
हात तुझा माझ्या खांद्यावर....
सुर्यास्ताचा सूर्य देखील....
थांबलाय अर्ध्या वाटेवर...



लग्नानंतर तुझे नाव
बदलायचा बेत नाही ....

कारण आता या नावाशिवाय
मला जगताच येत नाही !!!



पावसात भिजलेले शरीर तुझा पाहून...
पावसाचा थेंबही शरमून गेला...
शहारलेल्या शरीरावर तुझ्या येऊन.....
तो तिथेच विरून गेला...

Wednesday, November 16, 2011

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा.
*******आयुष्यात पुढे सरकत राहा *****
आयुष्यात पुढे सरकत राहा.......

मित्र मित्र म्हणता म्हणता मैत्री होते
मैत्री मैत्री म्हणता म्हणता नाते जुळते
अशी अनेक म्हणता म्हणताना ती जुळतात
अनेकना त्यांतून असे ऋणानुबंध निर्माण होतात

हात हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा
साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण जेव्हा तो हात नकोसा होतो
तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची

नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते
तुटतात जेव्हाही नाती, ती जुळवणे होते कठिण
तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे, त्याला जोडणे होते कठिण

आत्मविश्वास असतो एकमेकांना एकमेकांवर
अनेकांना आपल्या आणि आपल्यांवर
जेव्हा उठतोतो विश्वास स्वत:च्याच आत्म्यावरूनच
नाही उरत कोणी आपले नाही उरत कोणी कोणाचे

आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात अनेकप्रसंग
अनुभवत असतो तो अनेक अनुभव येता जाता
अनेक वाईट असतात थोडेसे चांगले असतात
असाच काहीतरी म्हणे माणूस घडत असतो

खचू नका असे प्रसंग येता जाता
भय नामकराक्षसाला तारणारे
आत्मविश्वासाचे ब्रम्हास्त्र निर्माण करत राहा
आपल्या आयुष्याचा हिमालय असाच आत्मविश्वासाने चढत राहा..
आयुष्यात पुढे सरकत राहा.......
वाढदिवसाच्या शुभेच्छा.


--------------------------------------------------------
तुझी नी माझी मैत्री एक गाठ असावी,
कुठल्याही मतभेदाला तिथे वाट नसावी,
मी आनंदात असताना हास्य तुझे असावेत,
तू दुखात असताना अश्रु माझे असावेत.
--------------------------------------------------------

आठवनी बालपनीच्या... :)

कसे सांगू तुला..?
तुझ्या आठवनींना शब्दात मांडतोय..
नाही विसरू शकलो....ते क्षण..
जे मी आता रोज नव्याने जगतोय...


तु नसतेस आता सोबत..
तुझ्या सोबतच जगतोय...
तुझ्या या अस्तित्वाला...
मी माझ्या हृदयात जपतोय..



आठवनी बालपनीच्या... :)

तुझ्या सोबत खेळताना..
मी अगदी दंगून जायचो...
तु सतत सोबत असावीस..
म्हणून घर पालथे करायचो...

तुझ्या वरच्या कवीता..

तुझ्या विषयी बोलताना...
मी अजुनही भारावुन जातो...
तु आठवायला लागलीस की..
मी मलाच विसरुन जातो..



प्रेम श्रेष्ठ की पैसा...
हा साला हिसाब कैसा...
प्रेमा साठी पैसा मोठा....
अन पैशा पुढे प्रेम खोटा...





तुझ्या वरच्या कवीता....
मी मनात साठवून ठेवतो...
फ़क्त तुला कळाव्यात...
म्हणून कागदावर मांडतो...







कसे सांगू तुला..?
तुझ्या आठवनींना शब्दात मांडतोय..
नाही विसरू शकलो....ते क्षण..
जे मी आता रोज नव्याने जगतोय.

आकाशातला एक तारा...

कधी भेटलोच नाही आपण....
असे दाखवून तू निघून गेलास....
मला पाठ दाखवून तू...
तू मला दुरावून गेलास...




देव माझा नाही रुसलाय ...
मीच रुसलोय त्याच्यावर...
तो दुरावला असला तरी..
तुमच्या रुपात भेटतो इथे आल्यावर...




कसा विसरेन ग मी..
तुझी माझी पहिली भेट..
तु मला पाहताच धावत येऊन...
बिलगली होतिस थेट.. :)



अजुनही तुझं हृदय..
जपतेय मी माझ्यापाशी...
पुन्हा हरवेल ते माझ्या पासुन..
म्हणून ठेवते मी हृदयापाशी...





मी पुढे जाता जाता..
हृदय माझे अंथरून गेले...
तु येशील मागून म्हणून...
हृदय तुकडे तिथेच पेरुन गेले..





आकाशातला एक तारा...
मला चमचमताना दिसला...
तुझ्या साठी निरोप आहे..
असे म्हणून गालात हसला..

देवळात जाने मी कधीच सोडले...

निरोप घेऊन जाताना ....
मी तिथेच स्तब्द असते....
तू वळून पहिशील याची...
प्रतीक्षा मी करत असते.



बऱ्याच दिवसांनी.......
आज उचकी येऊन गेली......
विसरले नाहि मी तुला....
हा संदेश देऊन गेली......



देवळात जाने मी कधीच सोडले...
देव देवळात नाही कळले तेव्हा...
तो हि आता भटकत असतो....
त्याचे भक्त भेटत नाहीत तेव्हा....

असे कसे हे नाते...

असे कसे हे नाते...
जे जुळण्या आधीच तुटून जाते...
दोन मने एक होणार..
त्या आधीच नशीब ते मोडून जाते.


खूप त्रास सहन केल्यावर शेवटी
सहनशक्ती चाही अंत होतो ,
सहन शक्ती संपली कि ,
माणूस कायमचाच शांत होतो .



एक एक चारोळी करत
प्रेमाची मी कथा मांडतो
शब्द पण अपुरे पडतात
चारोळीत जेव्हा भाव सांगतो




एकांतातली कविता
छान जमली
लिहिता लिहिता
मस्तच रचली ...




एक एक दिस काढतोय तुझ्याशिवाय ,

एक एक रात्र सरतेय तुझ्याशिवाय ,

मी तर तुझ्या आठवणीत पुरता वेडा झालोय गं ,

सखे तुला करमत का ग माझ्याशिवाय ?

त्याला तुझ्या आठवणींचा आधार...

शब्द माझे उमटले...
तो कागद कोरा होता...
लिहितानाही त्याच्यात...
दिसत तुझाच चेहरा होता...



आज चूरघळलेया कागदाच्या....
घड्या मी उलघडतोय...
लिहिलेले शब्द तुझ्या साठी.....
पुन्हा नव्याने लिहितोय...


माझ्या या जगण्याला....
तुझ्या सावलीचा आधार....
श्वास माझा जाताना...
त्याला तुझ्या आठवणींचा आधार...


जीवनातील प्रत्येक क्षणात.....
सुख शोधायला शिक ...
समोर आलेल्या दुख:ला....
धैर्याने सामोरे जायला शिक....

Thursday, November 10, 2011

लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा

अहो भरल्या बाजारी धनी तुम्ही मला हेरलं
हेरलं ते हेरलं अन्‌ लगीन अपुलं ठरलं

लगीन झालं, गोंधळ झाला
आता एक काम हो ठरलं

लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर, गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?

रातभर एकली जागू कशी ?
सासूला अडचण सांगू कशी ?
घरात पाव्हणं न्‌ दारात मेव्हणं
एकांत मिळेना भेटायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?

न‍उवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
गरम अंथरूण गरम पांघरूण
गरमागरम ह्यो मामला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?

गुलाबी थंडीत गमतीनं
मजेत राहू या संगतीनं
जातानं दोघं न्‌ येताना तिघं
नातूच आणूया दावायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?

गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - बाळ पळसुले
स्वर - आशा भोसले
चित्रपट - फटाकडी (१९८०)

मिठीत तुझ्या.. एक वेगळीच मिठास होती...

हृदयाचे रिकामी कोपरे...
तुझ्या स्मृतींनी भरलेले....
डोळ्याच्या पापण्यांना मात्र...
अश्रुंनी मोहरलेले..



मिठीत तुझ्या..
एक वेगळीच मिठास होती...
चुंबनाची गोडी तुझ्या...
माझ्या साठी खास होती...




कवेत तु यावे...
मी मलाच विसरावे..
स्वप्नच की भास हे..
माझे मलाच न कळावे..



तु जवळ नसताना ही..
सतत तुझा आभास आहे...
गहिवरल्या मिठीत माझ्या..
सखे तुझाच भास आहे..

प्रत्येक ओळीचे पहीले अक्षर पहा..

प्रत्येक ओळीचे पहीले अक्षर पहा..

मि तुला रडवले...
ठीक मी तुझा दोषी आहे...
तरी तुझ्या साठी...
घेऊन हृदय तुझ्या साठी आहे..

एक एक चारोळी करत प्रेमाची मी कथा मांडतो

तिने माघारी फिरून परतावं
मी मात्र षंढ सारख बघत रहाव
भूतकाळातले सारे किताब आठवून
पापण्यात अश्रुना गच्च आवळून धराव





नेहमी असाच करत आलो
मुखवटे चढवत गेलो
भावनेस लपावे म्हणून
शब्द गिळत राहिलो



इच्छा हि अनाहूत ठरते
सारच हे नकळत घडते
घडणारा प्रत्येक ते क्षण
आपल्याच क्षणांना मारते



पुरुषार्थ दुखवू नये म्हणून
सार बंद कप्प्यात ठेवले
त्यास माझा हताशपणा समजून
हे जगच माझ्यावर हसले



त्या दिसाला करून...
आत्मसमर्पण हे जीवन वाहिले
निर्दयी समाजान त्यास आत्महत्या
समजून सारे कायदे कलम शिकवले


एक एक चारोळी करत
प्रेमाची मी कथा मांडतो
शब्द पण अपुरे पडतात
चारोळीत जेव्हा भाव सांगतो

तो थेंब मातीत विरला

माझ्या लेखनीतले शब्द...
सतत तुझ्याच भोवताली फिरतात..
तू त्यांना पाहून हसावे..
म्हणून तुला स्वतःत विणतात...




विरह हा प्रीतीचा
मजही करी घायाळ
डोळ्यांतून वाही आसवे
अन मनात हे बेहक ....




धुंद झाल्या कळ्या...
तु स्पर्श केलेस त्यांना म्हणून....
फुलायचे आहे त्याना....
तू त्यांना माळावे म्हणून....




लाजाळूचे झाड तू...
असे "मृगजळात" कसे उगवले...
तू हि फसलीस त्यात..
कि तुला हि त्याने आमिष दाखविले...




वाचन नको देओउस
काचेसम असते ते
नाही पेलवत आले तर
क्षणात चूर होते ते .............




आठवते तुला....
मी एकदा तुझे हात धरले होते ...
तेव्हा तुझे डोळे...
अश्रूंनी भरले होते...

तुला पहिले कि..
हृदयात वसंत फुलतो....
तू लाजून हसलीस कि.....
जीव माझा हळहळतो ...



तो थेंब मातीत विरला
विरून त्याने निसर्ग फुलवला
निसर्ग फुलवताना मात्र सख्ये
स्वतःचेच अस्तित्व विसरला

परतीची तुझ्या वेडीच आशा सये

परतीची तुझ्या वेडीच आशा सये
या वेड्या माझ्या मनाला
तो हि काय करेल बिचारा
आठवण तुझीच क्षण क्षणाला





हर श्वासात सख्या
तूच गुंतलायस
आठवणीत या केवळ
तूच समावलायस .....



तुझ्या ओल्या आठवणीत सये
मी नित चिंब भिजत असतो
पापण्यावर ओझे दुराव्याचे जरी
आठवणीच्या कुशीत निजत असतो

एके दिवशी माझा श्वास बंद होईल.. .

एके दिवशी माझा श्वास बंद होईल..
.
नको विचार करुस
.
की माझे प्रेम कमी होईल..
.
अंतर फक्त एवढं असेल..?
.
आज मी तुझी आठवण काढत आहे..
.
उद्या..?
.
माझी आठवण तुला येईल

प्रेम म्हणजे मी अन तू....

तुला पहिले कि..
हृदयात वसंत फुलतो....
तू लाजून हसलीस कि....
जीव माझा हळहळतो ...




आठवते तुला....
मी एकदा तुझे हात धरले होते ...
तेव्हा तुझे डोळे...
अश्रूंनी भरले होते...



प्रेम म्हणजे मी अन तू....
प्रेम म्हणजे माझ्यात तू....
प्रेम म्हणजे स्वप्नात तू....
प्रेम म्हणजे साक्षात तू....




तू हातात हात देशील...
मी साथ देण्याचे वचन देतो....
जाता जाता तुला ...
माझ्या प्रेमाची साठवण देतो....

कसे सरतील सये माझ्याविना दिसं तुझे ?

कसे सरतील सये माझ्याविना दिसं तुझे ?
सरताना आणि सांग सलतील ना !
गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना ! .....

पावसाच्या धारा धारा ..... मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे .....
ओठभर हसे हसे..... उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे ?
आता जरा अळिमिळी
तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना ! .....

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचूप ..... सुनसान दिवा !
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा !!
चांदण्याचे कोटी कण
आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना ! .....

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर ..... काचभर तडा !
तूच तूच ..... तुझ्या तुझ्या ..... तुझी तुझी ..... तुझे तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा !! -
पडे माझ्या वाटेतून
आणि मग काट्यातून
- जातानाही पायभर मखमल ना ! .....

आता नाही बोलायाचे ..... जरा जरा जगायाचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत ..... विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले !!
जरा घन झुरू दे ना
वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! .....

बहरलेल्या ऋतूमध्ये प्रेमाचा गार वारा

कोरड्या तुझ्या शब्दातून
सखे अर्थ नवा काढला
नको नको म्हणताना
सहवास का वाढला ?


कोरड्या लाटा सये ओले किनारे आहे
ओले सहवास जरी कोरडे श्वास आहे
कोरडे शब्द जरी ओले अर्थ आहे
कोरड्या स्वप्नांचे खरंच अस्तित्व व्यर्थ आहे



घाबरण्याचा बहाणा सखे
जाणत का मी नाही,
तुझ्या हृदयाचा हरेक कप्पा
माझीचं वाट पाही..!!



बहरलेल्या ऋतूमध्ये
प्रेमाचा गार वारा
तुझ्या जवळ यायला
घाबरतोय जीव थोडा..



अदृश्य ओलावाचं तर भावनांचा
फुलवीत असतो सखे हरेक नातं,
नकळतपणे सुकेलं जप घालून
काळजाचं पाणी अन जीवाचं खत..!!



प्रेमातलं वाळवंट
वाटे तुझा दुरावा
शब्दांतून भेटे मग
सखे प्रेमाचा ओलावा


पावसाच्या सरी आणि तुझं हसणं सये
दोन्ही मिळून भिजवत असतात मला
कुणालाही दिसत नाही पण त्यामधील
हळव्या प्रेमाचा गहिरा तो ओलावा..........

एक क्षण प्रेमाचा त्या लाटांना लाभला

ठावूक आहे का सये आयुष्याच्या
वाळवंटात स्वप्नांचे झरे आहेत
सावली म्हणून जरी सोबतीस माझ्या
पण प्रतिबिंब विश्वासाचे खरे आहे


लाटेला त्या मिठीत घेताना सये
सागराला दुराव्याची नसते भीती
प्रत्येक क्षण स्पर्श अनुभूतीचा जरी
अल्प त्या क्षणात त्याने जगावे तरी किती ?



एक क्षण प्रेमाचा त्या लाटांना लाभला
पूर्ण अस्तित्व त्यांचा इथेच संपला
प्रेम करावे असे सख्या जिथे नाही कशाची भीती
प्रेमच असतो प्रेम साठी शेवटी ..............



शेवटी तुला माझे डोळे समजलेच नाही
मी पापण्यांची झालर केली तुला उमगलेच नाही
डोकावलस ना तू त्या दिवशी ...
स्वप्न तू सत्य तू
तुझ्यात मन हे हरवले आहे
मी आहे तुझ्या सावलीत सख्या
तू मला अंधारात मिरवले आहे..........


हरवले होते भान माझे सये
तुझ्यामुळे भानावर मी आलो
फिरता तू माघारी आज बघ
परत पुरता बेभान मी झालो



माझे सारे स्वप्न तू
असे काही हिरवले आहे
अनवाणी शोधतोय ते
माझे क्षण हरवले आहे
स्वप्न तू सत्य तू
तुझ्यात मन हे हरवले आहे
मी आहे तुझ्या सावलीत सख्या
तू मला अंधारात मिरवले आहे..........


हरवले होते भान माझे सये
तुझ्यामुळे भानावर मी आलो
फिरता तू माघारी आज बघ
परत पुरता बेभान मी झालो



माझे सारे स्वप्न तू
असे काही हिरवले आहे
अनवाणी शोधतोय ते
माझे क्षण हरवले आहे

प्रेम शब्द दोन अक्षरांचा,

नजरेला नजर काय,
बोलून गेली...........
तुझ आणि माझ "प्रेम"
आहे एकच सांगुन गेली........!
...................................................................................
तुझी आणि माझी भेट होने,
हां तर नशिबचाच आहे भाग..........!
"दूर" मी निघून गोलो तर ,
मनात ठेऊ नकोस माझ्या विषयी राग..........!!
..................................................................................
प्रेम शब्द दोन अक्षरांचा,
नुसता एकला तरी हर्ष होतो.........
आणि उच्चारला तर,
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो..........
..................................................................................
तुझ्या प्रेमाची चव आहे गोड
ठाउक आहे मला...........!
म्हनुनच पडलो मी तुझ्या प्रेमात,
माहित आहे ना तुला ..........!!

एक पेपरवाला

एक पेपरवाला

आमोल म्हणजे कार्यकर्त्यांसाठी २४ तास अखंड राबणारा हात
आमोल म्हणजे विनोदी हास्याचा खळखळाट.....
आमोल म्हणजे कलाकारांचा ,कलाप्रेमींचा हक्काचा आधारवड ....
आमोल म्हणजे सांस्कृतिक चाळवळीसाठी अखंड वाहणारा चैतन्याचा झरा ......
आमोल म्हणजे ९० टक्के समाजकारण करून १० टक्के राजकारण करणारा नेता
आमोल म्हणजे मैत्रीत सर्वांला बरोबर घेऊन विकासाच्या रथाचे सारथ्य करणारा एक मुंबईकर.
.. ..आणि हो पुणेकरही .

पुणे हि माझी जन्मभूमी आहे..
तर मुंबई हि कर्मभूमी आहे, .
मुंबईने मला माझ्या आयुष्यात बरेच काही दिले ,
ज्याचे त्रुउन मला फेडता येणे शक्य नाही ,
मात्र पुण्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ,
आणि भीमाशंकरच्या कुशीत असलेल्या पवित्र भूमीत माझा जन्म झाला .
त्यामुळे पुणेकडेही लक्ष द्यावे लागते .
मात्र मी डावे उजवे काही करत नाही .
दोन्ही माझ्यासाठी समान आहेत.
एक पेपरवाला

"आई"बद्दल लिहायचं म्हणतो

"आई"बद्दल लिहायचं म्हणतो
तर हि लेखणी नेहमी अडखळते
हसून म्हणते.......
अरे वेड्या तू काय लिहिशील
"आई" फक्त ती "आई"लाच कळते

Wednesday, November 9, 2011

मिठी तुझी अजूनही... हृदयाशी खिळून आहे...

मिठी तुझी अजूनही...
हृदयाशी खिळून आहे...
जशी तू दूर नसून...
माझ्यातच मिळून आहेस...



मिठी तुझी अजूनही...
हृदयाशी खिळून आहे...
जशी तू दूर नसून...
माझ्यातच मिळून आहेस...



बस पुरे आत्ता
चार ओळी खर्च करणे
रोज रोज तिच्या साठी
ह्या शब्दांना मारणे



गेल्याचा दुखवटा
किती दिवस करायचा
त्याच क्षणासाठी हा जीव
का म्हणून झुरत ठेवायचा

आठवणींच्या हिंदोळ्यावर....

तुझ्या मिठीत विसावण्याचा
एक तरी अवसर दे
ह्या पृथ्वीतलावरच सख्ये
स्वर्गाचा उपभोग भोगू दे




पुरे कर आत्ता शृंगार
हा जीव आत्ता किती हरणार
पाहून तुज हे नयन हसणार
पण हे मन मात्र झुरतच राहणार


ह्या वेड्या मनाने आज
डोळ्यांना हि फितवले
का कुणास ठाऊक सख्ये
त्यांनी हि तुझ्यासाठी चार थेंब वाहिले



आठवणींच्या हिंदोळ्यावर....
पुन्हा मला झुलायच आहे ....
तुझ्या संगे पुन्हा एकदा...
आकाशाला गवसणी घालायची आहे...




हा पाश आठवणीचा
सुटता सुटत न्हवता
शेवटी थकून हा जीव
अंतरात विलीन झाला होता

प्रिये तू मला हवी आहेस माझ्या सोबत

प्रत्येक तळीराम पिताना सांगतो
मी चषक सोडणार आहे
चषक म्हणतो तुझा संकल्प
मीच आज मोडणार आहे ..................


दारुडे बेहोष होऊन कोसळतात
तेव्हा किंकाळी फोडत नाहीत
याचा अर्थ असा नाही
त्यांची हाडे मोडत नाहीत .......



रानातल्या फुलांना माणसे
क्वचितच करतात स्पर्श
परंतु त्या स्पर्शातच मिळतो त्यांना
सात जन्माचा हर्ष ..




प्रिये तू मला हवी आहेस माझ्या सोबत
एखाद्या छानश्या हॉटेलमध्ये
ऐकायचे आहे ते तीन प्रेमाचे शब्द
फक्त तुझ्या तोंडून.................
.............................................................
.................................................
मी बिल भरते ..............................

रोज रोज सूर्य उगवतो ...रोज मावळतीला जातो ...

रोज रोज सूर्य उगवतो ...रोज मावळतीला जातो ...
अगदी न चुकता हे चालूच राहतं ..
तुझी आठवणही काहीशी अशीच.....
रोजच येते ..येतंच राहते ..मावळत मात्र नाही ...
...तुझी आठवण येते नी मनाचा तळ ढवळून काढते
तुझ्या सहवासातल्या स्मृतींना पुन:पुन्हा काळजावर कोरते ...
..आठवणी येत राहतात ...
आणि मी त्यात गुंतत जातो ...गुंततच जातो ...
..
तसं हे गुंतणं मनाला भावतं ...
तुझ्या स्मृतीमागे मन का धावतं,,
...
मनाला तेवढाच आधार वाटतो ...
तुझ्या विरहाचा का भार वाटतो?
..
मनाला उत्तर सापडत नाही ..
आठवणीना काही केल्या सोडत नाही...

एकच तुझा स्पर्श तो...

मैफिलीत तुझे नाव कोणी घेत तेव्हा
साऱ्यांची नजर माझ्यावर असते
जणू तुझ्या गाण्याची सुरुवात म्हणजे
माझी "प्रेतयात्रा" असते ...................


मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं
तुला शंभर वर्ष आयुष्य आहे
मरणही चाट पडून म्हणालं
काय हा मनुष्य आहे ?



प्रत्येकाला एक आभाळ असावं
कधी वाटल तर भरारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरट असावं
संद्याकाळी परतण्यासाठी ................



मी एक तो क्षण....
तुझ्या सवे असलेला...
तुझ्या एक हास्य मागे...
तुला हृदय देऊन बसलेला...



एकच तुझा स्पर्श तो...
अजूनही तळहातावर जपलेला...
नाही कळले तुला कधी...
पण मी त्यालाही आपला मानलेला...



देशील का ग पुन्हा....
विश्वासाने हात माझ्या हातात...
राहशील का ग पुन्हा..
त्यात प्रेमाने माझ्या हृदयात....


amol ghayal

जाणता अजाणता चुका चिक्कार झाल्या

जाणता अजाणता चुका चिक्कार झाल्या
घातल्या तुला हाका,आज चीत्त्कार झाल्या

शोधतो इथे तिथे त्या पाऊलखुणा न सापडे
तुझी वाट दावनार्या,वाटाही पसार झाल्या

वारा तो अश्व जाहला..न थांबतो,न सांगतो
भुंगा हि न जाने,म्हणे इथे कळ्या फार झाल्या

शोधण्या तुला मी चंद्रास नजर ठेवण्या सांगतो
भग्न पावलेल्या दिशा,त्याही तयार झाल्या

ये निघून सखे आता जीव हि विझण्यात आहे
आठवणी पहा त्या आसवांच्याही पार झाल्या

मी तुझे नाव वाळूत लिहिले

झेपेल तेवढेच दुखं
तो आपल्याला देतो
दिलेलं दुखं संपल कि
तो आपल्याला नेतो ..........



मी तुझे नाव वाळूत लिहिले
ते वाहून गेले
मी तुझे नाव हवेत लिहिले
ते उडून गेले
मग मी तुझे नाव हृदयात कोरले ...आणि ...
मला हार्ट-अटेक आला .......

दोन पाखरे बोलत असता

दोन पाखरे बोलत असता
शब्दांचे कंप हवेत कशाला ?
चोचीतून चोच टिपत असता
भुकेची ती आठव कशाला?

नजर नयनांशी भिडत असता
दर्पनाची ती गरज कशाला?
सोबत इतकी सुंदर असता
सौंदर्याची व्याख्या कशाला?

श्वास गंधाला ओळखत असता
स्पर्शाची ती गरज कशाला ?
मनात फुललेली प्रीत असता
बागेतली ती फुले कशाला?

दोन जीवांची एकी होता
दुसरी वाट हवी कशाला?
चालत असता त्या वाटेवर
तमा कुणाची हवी कशाला ?

दोन श्वास एकात मिसळता
उसना जीव हवा कशाला?
ठरलंच आहे सोबत मरणं
जगण्याची तर भाषा कशाला ?

आजकाल खरे प्रेम करते का कोणीतरी

आजकाल खरे प्रेम करते का कोणीतरी
आयुष्यात खरी सोबत देते का कोणीतरी . . .
आकर्षणाने भरलेला बाजार हा सगळा
इथे जीवाला जीव लावते का कोणीतरी . . .

पेटून उठेल जेव्हा मराठी काळीज

पंचनामा नको कोणी किती
या मातीसाठी रक्त सांडले
विचार करा एवढाच कि
आपण त्या रक्ताचे पवित्र किती राखले .........................



तू माझ्या पासून दूर असलीस...
तरी माझ्या शब्दांच्या आहेस खूप पास....
स्वप्नांचं राज्यात मला....
तुझ्या स्वप्नांचीच साथ....




पेटून उठेल जेव्हा मराठी काळीज
तेव्हाच संपेल नतद्रष्टांच मनोराज्य,
जेव्हा चालेलं मराठ्यांची कट्यार
गोरगरीब अनुभविल पुन्हा शिवराज्य..!!




शब्द माझे असले तरी.....
तुझ्या भोवताली फ़िरतात...
त्यांना पाहून तू हसलीस...
की कवितेत येऊन गुंफ़तात..



वेचतेय मी आता...
विखुरलेल्या तुझ्या आठवनींना...
माझ्या हृदयात धडधडणारया
तुझ्या प्रेमळ कंपणांना...

मिठी या शब्दात

पहाटेची वाट बघताना
रात्रीचाच लागतो डोळा
तुझ्या माझ्या स्वप्नांचे पक्षी
पापण्यांवर होतात गोळा .....




पांढरी कबुतरे सर्वजण मिळून
आकाशात सोडताना दिसतात
आणि टीचभर जमिनीच्या वादावरून
त्यांना धाराशाही करताना दिसतात ...............




मिठी या शब्दात
किती मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
कृतीचा भास आहे ............

अजूनही रोज त्या समुद्रकिनारी

जिवलगाच्या भेटीत वाट पाहण्यातच काय मजा आहे
तुला त्याची कल्पना नाही कारण .............
उशिरा पोहचण्याची चांगली सवयच मला नाही .............
तुला हा अनुभव येणारही नाही कारण ...................
लवकर येण्याची वाईट सवयच तुला नाही .




तुझ्या तळहातावरच्या रेषा
मी डोळे भरून पाहतो
माझ्या स्वप्नांचा झरा
त्या रेषांमधून वाहतो .



एकदा गच्चीत तुला मी
केस वळवताना पाहिलं
एकुलत एक मन माझं
त्या केसांतच अडकून राहिलं...........



घेतलेल्या त्या आणाबाका विसरून
कळत नाही आपण असं का भांडाव
कण कण करून वेचलेल प्रेम
क्षणभरात असं का सांडाव .....................




अजूनही रोज त्या समुद्रकिनारी
तुझी वाट पाहत मी बसत असतो
अजूनही बुडताना तो सूर्य
रोज मला हसत असतो .................

शृंगाराने मढलेला चंद्र

चंद्रास हि वेड
तुझ्या सवे चालण्याचे
तूच सांग न सख्ये
काय चुकले ह्या मनाचे


शृंगाराने मढलेला चंद्र
खेळ पाहत सारा आपला
चाहूल तुज लागू नये म्हणून
त्यास लिंबोणीच्या झाडामागे सजवलेला



ढगाळलेल्या वातावरणात
एक चांदणी लुकलुकली
अशा अवेळी आकाशात
ती कुणासाठी चमकली ?

तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ुल व्हायचंय मला

तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ुल व्हायचंय मला

खोवशीलनामलामाझ्याहीनकळत
तुझ्यावेणीतलंमोगर्‍याचंफ़ुलव्हायचंयमला
भिजशीलनामाझ्याअंगणातमनसोक्त
तुलाआवडणारीसुखदश्रावणसरव्हायचंयमला
झेलशीलनामलाहळूवारअलगद
तुझ्याअळवावरचाटपोराथेंबव्हायचंयमला
देशीलनामलाप्रेमानंआलिंगन
तुझ्याकुशीतलीकापसाचीऊशीव्हायचंयमला
सावरशीलनामलानेहमीभरकटताना
तुझ्यासाडीचाढळणारापदरव्हायचंयमला
शोधशीलनामलानितळसागरकिनारी
तुलासापडणार्‍याशिंपल्यातलामोतीव्हायचंयमला
पुसशीलनामलातुझ्यारुमालाने
तुझ्यागालावरुनओघळणाराअश्रूव्हायचंयमला
घालशीलनाहळुवारप्रेमाचीफ़ुंकर
तुझ्यानाजूकतळहातावरलाफ़ोडव्हायचंयमला
परडीतवेचशीलनामलानतुडवता
तुझ्यापरसदारातल्याप्राजक्ताचासडाव्हायचंयमला
बाळगशीलनामलानेहमीबरोबर
तुझ्यागळ्यातलालाडकाताईतव्हायचंयमला
पहाशीलनामाझ्याकडेसाश्रूनयनांनी
तुझ्यापाणिदारडोळ्यातलंकाजळव्हायचंयमला
झुलशीलनामाझ्यास्वप्नांच्याहिंदोळ्यावर
तुझ्याकानातलंझुबकेदारडूलव्हायचंयमला
न्याहाळशीलनामलारात्रभरएकटक
तुझ्याशयनगृहातीलआरसाव्हायचंयमला
नाचशीलनामाझ्यासप्तसुरीतालावर
तुझ्यापायातलंरुणझुणतंपैजणव्हायचंयमला
धरशीलनामलाह्रदयाशीकौतूकानं
तुझ्यापायातघोटाळणारंइवलसंपिलूव्हायचंयमला
पहाशीलनामलासारखंमागेवळून
तुझ्यापाठीवरलानदिसणारातिळव्हायचंयमला


.

प्रेमकरणंम्हणजे, एकमेकांकडेपाहणेनाही, तरदोघांनीमिळुनएकाचगोष्टीकडे
पाहणे.

या मातीतुन जन्मलो

या मातीतुन जन्मलो

यामातीतुनजन्मलोयामातीतचमीसंपणारयेतानाहीजवळनव्हतेकाहीजातानाहीकाहीचबरोबरनाहीमीनेणारपरमेश्वरांनदिलेलआयुष्यप्रत्येकक्षणक्षणमीजगणारदु:खालासुखाचासोबतीकरुनसंकटाशीहितगुजमीकरणारजितकेजमेलतितकेहासुवाटतसर्वांचेअश्रुविकतमीघेणारतुदिलेलेजीवनतुझ्याचकार्यासबहालमीकरणारयामातीतुनजन्मलोयामातीतचमीसंपणारदु:खीकष्टीनराहोकोणीयासाठीसद्येवमीझिजणारअन
्यायाशीलढादेतप्रामाणिकपणामीजपणारसततकष्टतराहुनमाझ्याघामाचेचितकरणारयामातीतुनजन्मलोयामातीतचमीसंपणारशेवटीमरणयेईलतेव्हामुखीतुझेचनामघेणारजाताजाताहेजीवनईतरांच्यासाठीसार्थकीमीलावणारयामातीतुनजन्मलोयामातीतचमीसंपणार
amol.ghayal123@yahoo.co.in

भिजल्या क्षणांनी ...... तुझ्या आठवणींची

भिजल्या क्षणांनी ...... तुझ्या आठवणींची

आभाळ जेव्हा भरून येत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी .......
तुझ्या आठवणींची

पान पान शहारून येत
तेव्हा दवबिंदूने लाजायचं नसत
मरण कुशीत येईल आता
म्हणून पानाने ओसरायच नसत
तेव्हा पहायची फक्त वाट
आसवाने डोळ्यांची आणि
अर्ध्या जागलेल्या स्वप्नाने
तुझ्या आभासांची

होईल वाऱ्याची ओळख
तेव्हा फुलाने दरवळायच असत
अस असत दुख म्हणून
गंधाने वेदनेला टिपायच नसत
तेव्हा मात्र कराययचाच फक्त घात
विव्हळणार्या चांदण्यांनी
क्षय झालेल्या पौर्णिमेचा आणि
अस्तीवाहीन वाऱ्याच्या ओळखीने
तुझ्या जाणीवेचा

पसरतील हात अंगणाचे जेव्हा
तेव्हा करायची अंधाराची मुठ
काळोखाला नसतेच जाग
उजेडातल्या सावल्यांची म्हणून
क्षीतीजाने काजळायाच नसत
त्याने जाळायची वात
सूर्याच्या विभोर स्पर्शाची आणि
काळ्याभोर शाईने तुझ्या कवितांची
बस्स इतकंच मग झाल
आणखीन काय ???
तुझ्याशिवाय इतक बास आहे मला....

डोळे बोलके झाले..

तू रुसावे...
असा मी कधीच वागत नाही..
तू खुश राहा...
याशिवाय काहीच मागत नाही...



डोळे बोलके झाले..
की मन हलके होते....
हृदयातल्या भावनांना..
मन बोलून जाते..

Tuesday, November 8, 2011

एक डोळ्याची आई

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे

ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.



एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही .... रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.'' वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.



त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.

त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.



एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, ""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''

""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.

काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.

संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.

तो वाचू लागतो,



""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''



पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??



मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.

पण..

कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;

कारण जीवनात

एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;

... पण



आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल !!

मन पाखरू पाखरू

मन पाखरू पाखरू ................
====================================

पिंजर्यात कैद पक्ष्या प्रमाणे आज हा का तडफडत आहे? कुणी तरी श्वास रोखल्या सारखा का भासत आहे? परत परत त्याच्या विचारांच्या ओघात वाहत आहे. का ???
.
.
......................

________ कल्पना होती आधीच... सगळे पोखळ आहे ते, काहीच नाही फक्त मनाची घुसमळ आहे हि . ...............................
"त्रास".... नाही त्रास होते नाही फक्त सत्य पचवायला जरा जास्त गोड आहे.
"वेदना"........ अजिबात नाही काटे आधी पण रुतले आहेत पण हे जरा बोथड आहेत.
"आठवण"...... जशे नक्षत्र बदलतात, ऋतू चक्र चालतो , समय सगळ वाहून नेतो.....................
..... फक्त हा पूर वाटत उशिरा ओझरणारा आहे
"नशीब"........ विश्वास बसला जेव्हा ती सावली दूर दूर जाऊ लागली,
.............माझी वाट, माझी वाट पाहू लागली .........
"साथ"...... सोबती, सवंगडी.____ एक स्वप्न तुटला, निद्रेच्या गावातून एकटाच परतला, हे तर होणारच होते .तारा जरी तुटला तरी अवकाश रिक्त होते नसते .... पण तुटताना मात्र तो सर्वांची इच्छा पूर करून जाते .......

"स्वप्न "..... होते एक__ आज हि आहे___ उद्या हि असणार__ श्वास आहे तो वर स्वप्न पापण्या भिजवणार ...............
"अश्रू"..........यांचा तर जन्मो जन्मीचा साथ आहे हेच तर, एक ब्रह्मांडात व्याप्त सत्य आहे

"प्रेम "...... उपाष्याला शिदोरी , उरी ढासली तरी नाही भूक भागली ....

"नाते "...... गुंफण आहे उगाच स्वतंत्र आयुष्याचा मरण आहे .वैराग्याला बघून वाटते चूक समीकरण आहे .
"मृत्यू "...... अंत अंत अंत पण फक्त देहाचा. जाणारा कधी हि एकटाच जातो आपल्या आठवणी का सोडून जातो .. जर मृतू अंत आहे तर सर्वस्व का संपत नाही .. आपले अंश का मागेच सोडून जातो .. मग हा अंत नसावाच ..
...........................परत वाहत गेला . कुठे तरी कधी तरी विसाव जरा .. चाराचारातून भ्रमण करून दमला असशील , क्षणभर क्षण साठी स्वतः चा पण विचार कराव जरा . का कुणा साठी एवडी धावपड.??????

काही क्षण असतात..

काही क्षण असतात..
मनाला आनंद देऊन जाणारे..
पण ते तिथ पर्यंत पोहचायच्या आधीच..
आपण माघार घेतो...



मी हरले रे...
असे म्हणून आयुष्य संपत नाही...
ते संपवावे लागते...
त्याच्या विरोधात चालून




हृदयाच्या तारांपासून हाक मार...
नक्किच मनाला भेदून जाईल...
स्वप्नातून बाहेर येऊन एकदा भेट..
नक्कीच तुला विसरून जाईन..

प्रेम यालाच म्हटतात का?????????

निशब्द करून गेला तो क्षण
शब्दात हरवले मन
अबोल जरी वाचा
पण कळली नयनाची भाष्या

प्रेम यालाच म्हटतात का?????????



काही क्षण असतात..
मनाला आनंद देऊन जाणारे..
पण ते तिथ पर्यंत पोहचायच्या आधीच..
आपण माघार घेतो...

आवडेल मला हरायला...

आवडेल मला हरायला...
तू जिंकत असताना....
आयुष्य जवळून पाहायला...
तू जवळ असताना..



तु लिहित असताना...
मला शब्द व्हायला आवडेल..
तू गात असताना...
मला गीत व्हायला...आवडेल ...



मी हरण्या पेक्षा...
तू जिंकण्यात खरा विजय...
तुझ्या चेहरया वरची नाराजी..
हा तर माझा पहीला पराजय..



आयुष्याच्या सारीपाटात...
सारा हा खेळ मांडलेला...
कुणा गोड कुणा कडु...
अनूभवाने सारा भरलेला..