Thursday, January 17, 2013

तिच्यात काय वेगळं होतं.

तिच्यात काय वेगळं होतं. साधी trouser तर घातली होती, आणि shirt इन होता. केसांना आवरायला मानेमागे, एक नाजूकसा पिन होता. रुमाल वैगरे नव्हता इतर मुलींसारखा हातात, एक tissu होता पांढरा शुभ्र, आणि तिच्या मागे तिच्या perfurm चा सुहास, थोडा मंद थोडा दर्प. काखेत purse होती कि नाही माहित नाही, पण मी तिला पाहतांना इतरांनी मला पहिल, हे सतावाल्याशिवाय राहत नाही. असो पण ती होतीच सुंदर, गोरीगोमटी, सरीव बांध्याची सिंहकटी. नैसर्गिक सौंदर्य,corporate लूक, थोडा पुरुषीपणाच म्हणून नजर करारी , समोरच्याला अगदी खाली बघायला लावणारी. अगदी नवी वागणूक , corporate culture. इतर मुलींसारखा बाऊ नाही कि काही नाही, ती आणि तिचा iphone, तिला काही नव्हतं कि, तिच्या सोबत आहे कोण आणि नाही कोण. आगदी त्या क्षणी वाटलं कि, हा platform, platform नसावाच, एक बाग होऊन जावी, सोबतीचे सारे लोकं नसावीत तिच्या माझी शिवाय, गाडी येउच नये, तिने त्यात बसूच नये, इथनं मुळीच जाऊ नये. बोलावं माझ्याशी थोडं, इंग्रजीत का होईना, हि कल्पनाच होती अगदी सुंदरतेच्या पलीकडची, आणि तीही फार सुंदर होती अगदी कल्पनेच्या पलीकडची.

No comments:

Post a Comment