आयुष्य हळू हळू चालत राहणार,
आयुष्य नेहमी एका वेगळ्या वळणावर असणार,
कधी अमावसेच्या रात्री सारख अंधारमय असणार,
तर कधी पोर्णीमेच्य चंद्रा सारख कले कले नि वाढणार,
आयुष्य कधी श्रावण सरीन सारख रिमझिम सुखद बरसणार,
आयुष्य कधी चैत्रातल्या कडक उन्हा सारख पोळवनार,
आयुष्य कुणासाठीच न थांबणार,
आयुष्य सतत पुढे जात राहणार,
आयुष्य प्रत्येक पावलावर नव काही शिकवणार,
आयुष्य अनुभवाचे धडे देणार,
आणि आयुष्य आठवणीची शिदोरी देणार,
हेच आयुष्य पावला पावलावर जगणं शिकवणार.......
No comments:
Post a Comment