Thursday, January 17, 2013

दूर लोटलेस मज.. घायाळ जीव झाला

स्मरून तुजला आज एक काव्य केले ओलावल्या डोळ्यांनी शब्दास कवटाळले नसेन मी जरी स्वप्नातला तुझ्या हृदयात माझ्या तूच आहेस..अन... राहशील सदा दूर लोटलेस मज.. घायाळ जीव झाला प्रेमपाखरास काट्याचा स्पर्श झाला रक्ताळले हृदय हे... का तुझं न कळावे वेड्या माझ्या मनाने कीती कीती झुरावे.... दुरून तुझं पाहता.... वाटते जवळ घ्यावे मिठीत तुझं कवटाळूनी... हृदयात उतरावे सल मनाची माझ्या जाणशील का कधी वाट पाहतो नेहमीच.. जीवनात येशील का कधी?

No comments:

Post a Comment