Thursday, January 17, 2013

ओम नमो भागवतेय साईनाथ नंदाय///// आला हो आला साईबाबा आला

1111 तुजविण साई नाही मजला कुणी, मी तुझे लेकरू तू माझा धनी तुझ्या नामात रंगू दे वाणी ,गाऊ दे रे तुझी गोड गाणी मी अनाथ देई साथ मज संग येउनी , तुजवीण साई ...१.. आल कीर्ती तुझी रे ऐकुनी , माया जात नाही इथे कोणी कृपा करी मजवरी दे झोळी भरुनी ,तुजवीण साई ..२.. तुझ्या दर्शनाची आस मोठी ,म्हणुनी आलो मी भेटीसाठी ये समोरी लवकरी भेट दे या क्षणी ,तुजवीण साई ..३... 2222 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज बालयोगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज कि जय.
साई माझा साधा भोळा जनतेला हो त्याचा लळा साई माझा दुबळयांचा आधार करितो गोर गरीबांचा उद्धार माझे साई मी साईचा . 333333 शिणले रे डोळे ही थकली काया माझ्यावरची साई का रे आटली माया ।। दर दिवशी तुझी रे मी केली सेवा नाही पुजिले मी कधी दुसर्या देवा तरी का दुरी साई माझ्या वरी कितीदा पडू साई तुझ्या पाया ।।१।। शिणले रे ...... वाईट ना वागलो कुणाशी कधी गरिबांच्या सेवेची ना सोडली संधी जनसेवा असे खरी ईश्वर सेवा का वेळ लावता मजला ताराया ।।२।।शिणले रे ........ नाम गाता तुझे रंगल्या रे राती ना पर्वा जगाची , ना कशाची भीती साईलीला भजनमाला विनवी तुला प्रिय भक्तांना ये रे वरदान द्याया ।।3।।शिणले रे ........ साईराम साईराम 44444 22222222222222 आला हो आला साईबाबा आला त्याने सर्वांना आधार दिला असा जगी कोणी संत नाही झाला ।। धृ ।। बाबांना पाहून लोकांना वाटले ढोंगी असेल हा फकीर चमत्कार त्यांचे पाहून सारे पाय धरण्या झाले अधीर तेव्हा झाले असे लोक वेडेपिसे त्यांनी बाबांवर विश्वास केला असा जगी कोणी संत नाही झाला ।। १ ।। रोगराई आणि दुख दारिद्र्याने शिर्डी गाव व्यापलेले होते परमेश्वराने साई रूपाने बाबांना पाठविले तेथे अशी केली करनी साई आला धरणी त्याने शिरडीचा उद्धार केला असा जगी कोणी संत नाही झाला ।। २ ।। गुरु दत्त कृपेने बाबांना लाभले सिध्द हस्त संतांचे पद म्हणून कोटी भक्तांना लागला बाबांच्या भक्तीचा छंद झाली जगाला जाण दिला सदगुरु चा मान चला वाहुया भाव पुष्प माला असा जगी कोणी संत नाही झाला ।।३।। 3333333333

No comments:

Post a Comment