Thursday, January 17, 2013

एक विनंती आहे ..... अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर

एक विनंती आहे ..... दुरच जायच असेल तर जवळच येऊ नका, busy आहे सांगुन टाळायच असेल तर वेळच देऊ नका...... एक विनंती आहे ..... साथ सोडून जायचच असेल तर हाथ पुढे करुच नका , मनातून नंतर उतरायचच असेल तर मनात आधी भरूच नका......... एक विनंती आहे ..... चौकशी भरे call काळजीवाहू sms यांचा कंटाळाच येणार असेल तर misscall च देऊ नका, memory full झालिये सांगुन delet च करायचा असेल तर नंबर save च करू नका....... एक विनंती आहे ..... मौनव्रत स्वीकारायच असेल तर आधी गोड गोड बोलूच नका , सीक्रेट्स share करायचीचनसतील तर मनाच दार उघडूच नका..... एक विनंती आहे ..... माझ्या काळजी करण्याचा त्रासच होणार असेल तर मला आपल म्हणुच नका , अनोळखी होउनच वागायच असेल तर माझ्या बद्दल सगळ जाणुच नका .... एक विनंती आहे ..... अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर आधी डाव मांडूच नका, रागावून निघून जायचच असेल तर आधी माझ्याशी भांडूच नका ..... एक विनंती आहे ..... सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर कृपया नातं जोडूच नका , फाडून फेकून द्यायच असेल तर माझ्या मनाच पान उलगडूच नका ..

No comments:

Post a Comment