Thursday, January 17, 2013

"तु : एक सौंदर्य कविता"

काळजात हो वीज चमकली, तुझ्या नुसत्या हसण्यानं.. विजेचे हो काय कौतुक, जिथे आभाळ बरसलं, तुझ्या त्या गोड दिसण्यानं.. धरणी येथे पावन जाहली, केवळ तुझ्या इथे असण्यानं.. अवनी सोडुनी अवघे त्रिभुवन, कोमेजले तु तिथे नसण्यानं.. एक नजर तुझी देऊनि जाते, लाख्खो जन्माचा हो आभास.. आता केवळ ध्यास मनातुनी, तुझ्यासवे घ्यावा अंतिम श्वास.. फुलापानांनाही येई रंग गंध तुझा गं, जवळुनी तू नुसते जाता तयांच्या, होतो सारा निसर्ग सुगंधी हो.. काळी माती देखील मोहरून जाते, जेंव्हा तू ठेवी पाय तयावरी.. तुझ्या पावलागणिक ती गंधित होते, अन नाव येते सारे पावसावरी.. आले अन गेले कवी अनेक, करून तुजवर कविता हो.. पण माझी ही कविता मी वाहिली, तुझिया चरणी फुलासमान हो.. ग्रहांनाही पडला असेल कदाचित, तुजला बघण्याचा मोह हो... म्हणुनि त्यातील काही येउन गेले, या पृथ्वीच्या जरा जवळून हो... धन्य तू अन तुझे माय बाप, जयांनी तुजला जन्मास घातले हो... अन धन्य असू दे तो देवही आमुचा, जयाने फुरसतीने घडविले तुजला हो...

No comments:

Post a Comment