Thursday, January 17, 2013

मला काही तरी आठवायच आहे

मला काही तरी आठवायच आहे कोऱ्‍या कागदावर साठवायच आहे, विसरलेत जे शब्द सगळे त्यांना पुन्हा इथे मांडायच आहे. काव्य असे न्यारे बनवायच आहे जणु ज्ञान मला मुलखाच आहे, मनातली भावना सांगण्यासाठी एका कवितेला रचायच आहे. बर असते ना कवितेत बोललेले न बोलता सारे काही सांगायच आहे, ते पण समजतात भावनाना प्रतिसादात फक्त टाळ्या ऐकायच आहे. सर्वात मोठा कवी मला बनायच आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधायच आहे, स्वप्न तर खूप मोठे आहेत माझे पण पाय पाहुन मला आंथरुन वाढवाच आहे.

No comments:

Post a Comment