Thursday, January 17, 2013

तू शांत,सागराचा हसरा अबोली चेहरा

तू नाजूक कळी रममान,पाकळ्यांच्या महाली ..................... तू साजूक खळी,अलगद उमलती गुलाबी गाली ... .................... तू शांत,सागराचा हसरा अबोली चेहरा सायंकाळी ................... तू दवांनी चिंब भिजलेली,शहारती कोवळ डहाळी ..................+ तू हितगुज पाखरांचे,फिक्कट तांबड्या आकाशी ................. तू कुजबुज हिरव्या पानांची,वाऱ्याच्या कानाशी ................. तू वाळू ओलावलेली किनारी,जपल्या पाऊल ठश्यांची ................ तू निरव शांतता पसरती, सैल सुटल्या दिशांची .................+ तू चांदन ठिपके दाटीचे,हळूच उजळते नील अंबरी .................. तू गोंदण काळोखाचे,ह्या शोभिवंत निशेत भरजरी ............... तू काजव किरण पणतीतले,पहारा देती दारोदारी ................ तू नाद प्रवासी,टाळ मृदुंगी,चाललेला त्या मंदिरी ................+ तू एक गुछ ढगांचा पांढरा,चंद्र झाकता तो सावळा ................ तू स्वछ आरसा तळ्याचा,प्रतिबिम्बास लळा लावता ............... तू विन उसवती निजेची,तो अश्व स्वप्नांचा धावता ............... तू लवत्या लता पापण्यांच्या,थकत्या रांगता रांगता waachniy.. fakt tichyasathi...

No comments:

Post a Comment