Thursday, January 17, 2013

मानवा तू विसरू नको शिर्डीच्या या साईला

अरे मानवा तू या जन्मी येवून काय केले अरे शिर्डीच्या साईबाबाचे नाव मुखी कधी न घेतले
मानवा तू विसरू नको शिर्डीच्या या साईला गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला ..2 सदगुरुला सदगुरुला विसरू नको सदगुरुला …… बालपण गेले तुझे शिकण्यात खेळण्यात तरुणपण घालवू नको भरकटून वासनेत लग्न केल्यावर तू होवू नको बेईमान प्रेम फास पडल्यावर होवू नको बेभान आई - बाबांना बाळग तू सोडू नको वाऱ्यावर इतरांचे ऐकू नको बुद्धी ठेव ताळ्यावर आई - बाबांची कमाई होती जगण्याला आजवर वाईट व्यसनी लागू नको घालवू नको पैसा बाटल्यांवर दारू सिगारेट पिवूनी मोडू नको संसार अहंकारी डोक्याने त्यावर फिरवू नको नांगर कष्टाविना फळ नाही फलाविना ना संतुष्टी परोपकार करुनी मिले पुण्य होशील तू आनंदी पैसा अडका इथेच राही कीर्ती फक्त उरणार मानवाचा जन्म तुला पुन्हा नाही मिळणार निर्जीव होता काय तुझी जाईल ती सरणाला थोडे दिवस रडतील परी कुणी नसणार तुझ्या साथीला ..¶1¶ जन्म दिलाय ज्यांनी ते आई - बाबाच आपले दैवत आशीर्वाद घ्या त्यांचे सुखी ठेवा त्यांना सदैव जन्म आला तो मरणार हे सत्य आहे अटल कीर्ती रूपे उरण्याचे तुम्ही बांधा मनी अटकळ संकटी पडल्यावारीच तुम्ही नाव घेता देवाचे नशिबी तुमच्या दुख आहे ते फळ मच्या कर्माचे देवाधी देव हि सुटले नाही नशिबाच्या फेर्यांतून भोगली ती दुखे त्यांनी गोड मानुनी कर्मातून मनी शांती मिळविण्या मुखी नाव घे तू साईच मायेने गोन्जारुनी साई तुला प्रेम देईल आईच साईलीला अजब न्यारी जा तू त्याच्या भक्तीला जाईल जेव्हा साई दरबारी लागेल त्याच्या भक्तीला सोड सोड बंधने सारी वारी कर तू शिर्डीची जप तप करुनी साईची प्राप्तीकर तू सुखाची शिर्डीला त्या जावून ये तू शरण जा तू साईला भक्तीने उद्धरून घे तू आपल्या या जन्माला आमोल घायाळ

No comments:

Post a Comment