मि देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तू देशील ना
खूप अडखळीची आहे वाट ही
कधी कट्यांवरी पडेल टाच ही
पडताना काळ्या अंधारात ह्या
सांग हात मला देशील ना...
तुझ्या प्रीतिची आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
एकटेपणाचा होइल भास् मला
सांग साथ मला तू देशील ना...
कधी रागवेन मि तुझ्यावरती
कधी असा भाड़ेंन तुझ्या संगती
कधी येइल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तू घेशील ना...
मि देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तू देशील ना..
No comments:
Post a Comment