Thursday, January 17, 2013

मित्रानो,प्रेमात जेव्हा विरह येतो

मित्रानो,प्रेमात जेव्हा विरह येतो तेव्हा तुटलेल्या मनाला आधार लागतो आणि तेव्हा आपणास खरा आधार मिळतो तो आपल्या जन्मदाती जननिचा, पण आईलाही आपल्या लेकराचे दुःख बघवत नसते.... अश्याच एका विरहात दुखी मुलाच्या आणि आईच्या मनःस्थिती मी येथे मांडन्याचा प्रयत्न करत आहे... खरे तर आई आपले मन बरोबर ओळखते, पण आईचे मन ओळखने तसे अवघडच आहे... आई… आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का? आई आज तुझ्या डोळ्यात असलेले , माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का? ठाउक आहे मला, आई तू बोलायचिस, बाळा तू फसत आहेस, आतल्या आत का धसत आहेस? ठाउक आहे मला, मी तुझ्या बोलन्या कड़े काना डोळा करायचो, तिच्या प्रेमात अजुनच बूडत जायचो, परतीचे सर्व मार्ग स्वतःच बंद करत जायचो... आई,तरी आज तू मला समजुन घे, माझ्या केसात हात तुझा फिरवत, माझा चेहरा वाचून घे, डोळ्या कड़े मात्र बघू नकोस, आसवान आड़ तिला डोळ्यातच राहून दे... आई,तू प्रश्नांची घाई करू नकोस, मी हळू-हळू माझे मन मोकळे करेन तुझ्या कड़े, आहे जे काही साठलेले मनात सर्व वाहीन तुझ्यापुढे, मी सर्व सांगत असताना मात्र तू धीर सोडू नकोस... मी तिच्या बद्दल जे काही सांगेन ते तू खुल्या मनाने ऐक, तुला वाटेल मी तिची बाजू मांडत आहे, पण तू माझी बाजू बघून अश्रु ढाळू नकोस, आई मी कदाचित माझा धीर सोडेन, रडून-रडून तुझे पदर ओले करेन, तरी तू तिच्यावर रागावू नकोस, आता पुरे म्हणून मला रडायचे थाम्बवु नकोस, तुझे ऐकत नाही म्हणून कदाचित तू मला तुझ्या पासून दूर लोटशील, तू किव्हा मी ठरव असे देखिल म्हणशील, पण आई असे विचारून तू तुझ्या लेकराची परीक्षा घेऊ नकोस, विसरत नाही तिला म्हणून मला कायमचे दूर करू नकोस... माहीत आहे तिने तुझ्या लेकराचे मन तोडले, तुझ्या लेकराचे स्वप्न पूर्ण होण्या आधीच मोडले, आई...तरी ज़रा सबुरिने घे, मला तेव्हा हवे असलेला तुझा आधार दे... तेव्हा सावरल्यावर मी कदाचित परत मी तिच्या कड़े जाइन , थोड्या दिवसाने परत माझे तुटलेले मन घेउन तुझ्या कड़े येइन, तेव्हाही मी तुला हाच प्रश्न करेन, आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का? आई आज तुझ्या डोळ्यात असलेले , माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?

No comments:

Post a Comment