जुळले मनाचे
मनाशीच धागे
ओढ घेई मागे
मन सदा
गुंतल्या मनाला
कसे समजावे
का न उमजावे
मना काही
मायेचा पसारा
अवती भवती
मिळतात नाती
सहजची
मिळालेली नाती
टिकून राहावी
मी अनुभवावी
ऊब त्यांची
प्रेम म्हणजे आभाळाला पडलेले स्वप्न..!
प्रेम म्हणजे नऊरत्नांच्या दरातील रत्न ..
No comments:
Post a Comment