
Thursday, January 17, 2013
पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं .
आयुष्य प्रत्येक पावलावर नव काही शिकवणार,
आयुष्य हळू हळू चालत राहणार,
आयुष्य नेहमी एका वेगळ्या वळणावर असणार,
कधी अमावसेच्या रात्री सारख अंधारमय असणार,
तर कधी पोर्णीमेच्य चंद्रा सारख कले कले नि वाढणार,
आयुष्य कधी श्रावण सरीन सारख रिमझिम सुखद बरसणार,
आयुष्य कधी चैत्रातल्या कडक उन्हा सारख पोळवनार,
आयुष्य कुणासाठीच न थांबणार,
आयुष्य सतत पुढे जात राहणार,
आयुष्य प्रत्येक पावलावर नव काही शिकवणार,
आयुष्य अनुभवाचे धडे देणार,
आणि आयुष्य आठवणीची शिदोरी देणार,
हेच आयुष्य पावला पावलावर जगणं शिकवणार.......
ओम नमो भागवतेय साईनाथ नंदाय///// आला हो आला साईबाबा आला
1111
तुजविण साई नाही मजला कुणी, मी तुझे लेकरू तू माझा धनी
तुझ्या नामात रंगू दे वाणी ,गाऊ दे रे तुझी गोड गाणी
मी अनाथ देई साथ मज संग येउनी , तुजवीण साई ...१..
आल कीर्ती तुझी रे ऐकुनी , माया जात नाही इथे कोणी
कृपा करी मजवरी दे झोळी भरुनी ,तुजवीण साई ..२..
तुझ्या दर्शनाची आस मोठी ,म्हणुनी आलो मी भेटीसाठी
ये समोरी लवकरी भेट दे या क्षणी ,तुजवीण साई ..३...
2222
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज बालयोगीराज परब्रम्ह
श्री सच्चिदानंद सदगुरू
श्री साईनाथ महाराज कि जय.
साई माझा साधा भोळा
जनतेला हो त्याचा लळा
साई माझा दुबळयांचा आधार
करितो गोर गरीबांचा उद्धार
माझे साई
मी साईचा .
333333
शिणले रे डोळे ही थकली काया
माझ्यावरची साई का रे आटली माया ।।
दर दिवशी तुझी रे मी केली सेवा
नाही पुजिले मी कधी दुसर्या देवा
तरी का दुरी साई माझ्या वरी
कितीदा पडू साई तुझ्या पाया ।।१।। शिणले रे ......
वाईट ना वागलो कुणाशी कधी
गरिबांच्या सेवेची ना सोडली संधी
जनसेवा असे खरी ईश्वर सेवा
का वेळ लावता मजला ताराया ।।२।।शिणले रे ........
नाम गाता तुझे रंगल्या रे राती
ना पर्वा जगाची , ना कशाची भीती
साईलीला भजनमाला विनवी तुला
प्रिय भक्तांना ये रे वरदान द्याया ।।3।।शिणले रे ........
साईराम साईराम
44444
22222222222222
आला हो आला साईबाबा आला
त्याने सर्वांना आधार दिला
असा जगी कोणी संत नाही झाला ।। धृ ।।
बाबांना पाहून लोकांना वाटले ढोंगी असेल हा फकीर
चमत्कार त्यांचे पाहून सारे पाय धरण्या झाले अधीर
तेव्हा झाले असे लोक वेडेपिसे त्यांनी बाबांवर विश्वास केला
असा जगी कोणी संत नाही झाला ।। १ ।।
रोगराई आणि दुख दारिद्र्याने शिर्डी गाव व्यापलेले होते
परमेश्वराने साई रूपाने बाबांना पाठविले तेथे
अशी केली करनी साई आला धरणी त्याने शिरडीचा उद्धार केला
असा जगी कोणी संत नाही झाला ।। २ ।।
गुरु दत्त कृपेने बाबांना लाभले सिध्द हस्त संतांचे पद
म्हणून कोटी भक्तांना लागला बाबांच्या भक्तीचा छंद
झाली जगाला जाण दिला सदगुरु चा मान चला वाहुया भाव पुष्प माला
असा जगी कोणी संत नाही झाला ।।३।।
3333333333
मानवा तू विसरू नको शिर्डीच्या या साईला
अरे मानवा तू या जन्मी येवून काय केले
अरे शिर्डीच्या साईबाबाचे नाव मुखी कधी न घेतले
मानवा तू विसरू नको शिर्डीच्या या साईला
गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला
तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला ..2
सदगुरुला सदगुरुला विसरू नको सदगुरुला ……
बालपण गेले तुझे शिकण्यात खेळण्यात
तरुणपण घालवू नको भरकटून वासनेत
लग्न केल्यावर तू होवू नको बेईमान
प्रेम फास पडल्यावर होवू नको बेभान
आई - बाबांना बाळग तू सोडू नको वाऱ्यावर
इतरांचे ऐकू नको बुद्धी ठेव ताळ्यावर
आई - बाबांची कमाई होती जगण्याला आजवर
वाईट व्यसनी लागू नको घालवू नको पैसा बाटल्यांवर
दारू सिगारेट पिवूनी मोडू नको संसार
अहंकारी डोक्याने त्यावर फिरवू नको नांगर
कष्टाविना फळ नाही फलाविना ना संतुष्टी
परोपकार करुनी मिले पुण्य होशील तू आनंदी
पैसा अडका इथेच राही कीर्ती फक्त उरणार
मानवाचा जन्म तुला पुन्हा नाही मिळणार
निर्जीव होता काय तुझी जाईल ती सरणाला
थोडे दिवस रडतील परी कुणी नसणार तुझ्या साथीला ..¶1¶
जन्म दिलाय ज्यांनी ते आई - बाबाच आपले दैवत
आशीर्वाद घ्या त्यांचे सुखी ठेवा त्यांना सदैव
जन्म आला तो मरणार हे सत्य आहे अटल
कीर्ती रूपे उरण्याचे तुम्ही बांधा मनी अटकळ
संकटी पडल्यावारीच तुम्ही नाव घेता देवाचे
नशिबी तुमच्या दुख आहे ते फळ मच्या कर्माचे
देवाधी देव हि सुटले नाही नशिबाच्या फेर्यांतून
भोगली ती दुखे त्यांनी गोड मानुनी कर्मातून
मनी शांती मिळविण्या मुखी नाव घे तू साईच
मायेने गोन्जारुनी साई तुला प्रेम देईल आईच
साईलीला अजब न्यारी जा तू त्याच्या भक्तीला
जाईल जेव्हा साई दरबारी लागेल त्याच्या भक्तीला
सोड सोड बंधने सारी वारी कर तू शिर्डीची
जप तप करुनी साईची प्राप्तीकर तू सुखाची
शिर्डीला त्या जावून ये तू शरण जा तू साईला
भक्तीने उद्धरून घे तू आपल्या या जन्माला
आमोल घायाळ
तुझा तो सुंदर चेहरा जणू जास्वंदी सोबत मोगरा
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा
फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे
तुझा तो सुंदर चेहरा
जणू जास्वंदी सोबत मोगरा
तुझे ते सोणेरी रूप
जसे साखरेत मुरलेले तुप
त्यातल प्रत्येक स्वाद
मलाच चाखायचा आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
तुझे ते लांब रेशमी केस
हलकेच हवेत उडत
तुला झुल्यात बसवण्यासाठी
मन माझे तडपडत
त्या स्वप्नाच्या झुल्यात
मला पण झुलायचे आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
तु जवळून माझ्या जाताना
येत असे सुगंधी वारा
मनात माझ्या बरसे
जणू पावसाच्या धारा
त्या सुगंधी पावसात
तुझ्याच बरोबर भिजायच आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा
फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे
हिरवेगार हे गवत नि हिरवा हा मळा
♥ ♥ ♥ ♥ ♥हिरवेगार हे गवत नि हिरवा हा मळा ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ अवतीभवती झाले नातवंड आपले गोळा ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ अडकलो बंधनात आपण घालून गळ्यात गळा ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ सुटता न सुटे असा लागला मज तुझ्या प्रीतीचा लळा. ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ आमोल घायाळ♥ ♥ ♥ ♥ ♥
आठवण आली की अलगद उमलायचे,
नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास,
सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे,
तु फक्त हो म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडया मनाला कोन समजावयाचे,?
सागं आठवण आली की काय करायचे,?
तुझ्या जवळ बसले असता
मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सागं आठवण आली की काय करायचे,नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?फोन मात्र मीच करायचं, H…..R… U मत्र तू बोलायचे,
तु दिसला की डोळे भरुण पहायचे,
ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,????.♥(
मला फक्त तुझ्यासोबत
......मला फक्त तुझ्यासोबत
hasayache ahe
.
तुझ्या खांद्यावर डोकेठेवून
रडायचे ahe
.
मन मोकळे karun ,
तुझ्या गप्पांमध्ये हरवायचे ahe
.
हरवून स्वतःला शोधायचे ahe
.
मला काहीच nako
फक्त तुझी सावली बनून
जगायचे ahe
.
नशिबाच्या या खेळात तुला
नेहमीच जिंकायचे ahe....
मात्र माझी जीवनसखी बनून गेली
"मला पाहताच तिने माझी गळाभेट घेतली..
स्पर्शामध्ये मात्र स्वार्थाची अनुभूती होती..
चीड जरी आली तरी मनुष्य मी..
आधी हलकेच दूर सारायचो .. मग मात्र मिठीत घ्यायचो...
क्षणिक सुख मिळवून काय साधतो आपण..
पण हल्ली तर क्षणभर सुखही महाग झालयं..
तिच्या हातामध्ये पर्याय नव्हता...
माझ्या मनाला मात्र संयम साधता येत नव्हता..."
"हे काय लिहिणं चाललयं, विनू..."
"असचं.. पूर्वीचे दिवस... नवखे कलाकार.. कधी त्यांचा माज तर कधी त्यांची अगतिकता... कधी जवळीक कधी दुरावा..."
"कुठल्या नटीची आठवण आली?"
"तू समोर असताना अजून कोणास कशाला आठवू..."
"उगाच साधेपणाचा आव आणू नकोस.. कितीतरी संधी मिळाल्या असतील तुला..."
-- तिच्या बोलण्याचा उद्देश जाणवला मला... आमची इंडस्ट्री तशीच होती साधारणतः
सामान्य माणसे नाव ठेवण्यास लगेच तयार... एकदा पैसा, फेम आला कि हीच माणसं आपली स्तुती सुरु करतात... त्यात हि मला भेटली.. मित्र म्हणाले- "नटीसोबत रिलेशन्स नकोच ठेवुस.. निघून गेली कि तुझा देवदास व्हायचा..."
बरोबर होते त्यांचे.. चार दिन का तमाशा... आणि मी असे बरेच लोक जवळ येताना आणि दूर जाताना अनुभवले होतेच...
..काय कोणास ठावूक.. हि मात्र माझी जीवनसखी बनून गेली... तिच्या आणि माझ्यामध्ये पर्सनल आणि प्रोफेशनल दोन नाती होती.. किंबहुना त्या रेषा आम्हीच आखून घेतल्या त्यामुळे कधी कलह निर्माण नाही झाला...
"आज मलाही माझे पूर्वीचे दिवस आठवले...शेखर माहितेय तुझ्यामुळे ओळख झालेला.. माझ्या मागेच लागला होता... मी मात्र साफ नकार दिला... तुला म्हणलेले मी त्यावेळी..."
"लेखा, मला माहित्येय ते.. आणि तू त्याला जवळ येऊ दिले नाहीस यामागचे कारण नाही विचारले मी कधीच... तो एक स्ट्रगलर होता त्यावेळी... "
ती काही काळ गप्प होती.. थोडेसे रागावली होती माझ्यावर.. आत निघून गेली..
मी बाहेर कठड्याला टेकून उभा राहिलो.. सिगारेट शेलकावली.. बाहेर धुकं जमलं होतं. थंडीचे दिवस होते..
काहीवेळा काही गोष्टी आपल्या जीवनात त्या धुक्यामागे गायब झालेल्याच बरे असते.. त्यांची जाणीव नसते आपल्याला.. कारण जर धुकं दूर झाले आणि त्या गोष्टी समोर आल्या कि त्या पचवायला जड जातात.. आकाशात जमलेले ढग काहीवेळा हवेहवेसे वाटतात, कारण उन्हाची झळ बसलेली कोणाला आवडते!
आज सामान्य जनतेला आमच्या जीवनाचं अप्रूप असतं.. तसंच आम्हाला त्यांच्या.. फक्त ते आम्ही दडवून ठेवतो आमच्या मनात... जशा काही गोष्टी धुक्यामागे दडवलेल्या....
"आईशप्पथ सांगतो, या बसच्या ना..
माझा दिल... (भाग १)
"आईशप्पथ सांगतो, या बसच्या ना....इतका वेळ झक मारायची, वाट पहायची आणि सीट मिळायची लांबच. साधी घुसायला जागा नाही आत.
माणसाला दोन पाय असतात रे...एका पायावर पण उभे राहता येते हे मान्य आहे मला.पण, त्याला हि लिमिट असते रे.आणि या कंडक्टरच्या मायला. सकाळी सकाळी सुट्टे पैसे काय झाडावरून तोडून आणू का?
मिनू आईशप्पथ, आता तू तरी दगा नको देउस हा...इतक्या गर्दीतून आपण भेंडी तुझ्यासाठी आलोय.तू हि असशील या बसमध्ये. आपल्याला खात्री आहे.दिसली एकदाची.अरे ये जाड्या बाजूला हो कि,बघू देणा मला माझ्या मिनुला.
अरे ओ मेरी जानेमन मिनू....
बता कैसे में तुझे इस दुनिया से छिनु?
आजकल तेरे हि नाम के तारे में गिनु.
वाह वाह...माशह अल्लाह....प्रेमात माणसं कविता बिविता करतात.पटलं बाबा आपल्याला.ये मिनू बघ कि मागे.बघ तुझा श्री उभा आहे मागे.
वाह, काय तिचे डोळे, ते वाऱ्यावर अलगद उडणारे केस.गेले कित्येक दिवस मिनुचा पाठलाग करतोय.पाठलाग नाही.मी काही टपोरी नाही पाठलाग करायला.मी फक्त तिची सावली बनून फिरतो.पहिल्या क्षणी बघितल्या बघितल्या कुणी प्रेमात पडते कि नाही ते आपल्याला माहित नाही.
पण बघितल्या बघितल्या कुणाचं तरी रूप आपल्याला वेड लावू शकतं हे मी स्वत:च्या अनुभवावरून सांगू शकतो.
गरीब असो वा श्रीमंत, माणूस आयुष्यात एकदा ना एकदा प्रेमात पडतोच.काहीजण मान्य करतात.काही लपवून ठेवतात.लपवून काय मिळवतात माहित नाही.पण माणूस आयुष्यात एकदातरी प्रेमात पडतोच, हेच आपलं मत आहे.साला जल्लाद पण कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात पडत असणार.मी पडलो होतो...प्रेमात...माझ्या मिनुच्या.पण हि साली, मागे बघेल तर वळून? जा गेलीस उडत. नाही बघत तर नाही बघत.मोठी ऐश्वर्या समजते का स्वत:ला? पण.... हि ऐश्वर्या असती तर आपण हिच्या मागे असे फिरलो असतो का?.
अरे बोलायच्या नादात मिनुचा STOP आला सुद्धा? आयला या ड्रायवरच्या.कसली घाई लागलीय याला?
"अति घाई संकटात नेई".... नाही नाही..."अति घाई श्रीला मिनूपासून दूर नेई"
उतरली.तिचा Stop , तोच आपला.आपल्याला कसला आलाय Stop ?
आपण वाऱ्यासारखे...स्वत:च्या मनाचे राजे.पण आम्हाला राज्य नाही.
दिशा आमच्या मालकीच्या,पण दिशा दाखवणारे कुणी नाही.
मग सगळ्याच दिशा आपल्या.
पर्याय खूप म्हणजे नियतीचा निराळा खेळ.पर्याय खूप झाले कि वाट अडते.निर्णय जागेवरच हट्ट करून बसतात.पुढे काही सरकत नाहीत.
देऊन परत कसा घ्यायचं हे नियतीला बरोबर कळते.
शिक्षकांच्या अथक प्रयत्न आणि त्याच्या प्रचंड तडजोडीमुळे इंजीनिअर झालेला मी एक साधासुधा मुलगा.
नावात 'श्री' असले तरी पवित्र असे माझ्यात काहीच नव्हते...
फक्त एक सोडले तर....
ते हो.....
I am v..g..n
सरळ सोप्या शुद्ध मराठीत सांगायचे तर..
मला अजून ते करायचा चान्स मिळाला नव्हता आणि यात मा कें संस्कार वगैरे काही नव्हते हा...
it is just a lack of opportunity....आणि आमचा थोडासा फट्टूness.
असो...
मिनुची आणि माझी तशी काही ओळख नाही.पण नजरानजर खुपदा झालीय हे मात्र नक्की.ती मला चेहऱ्याने ओळखत असेल.असेल काय? ओळखतेच.मी सेटिंगच तशी केली होती.आपल्याला एकच माहित होते,"जो दिखता हे,वो हि बिकता हे".
तिचं माझ्याकडे लक्ष जाईल असे मी नेहमी काहीना काही करायचो.पण त्यात हि एक रुबाब असायचा हा.
पोरींकडे जास्त लक्ष दिलं कि,त्या भाव देत नाहीत असे मला माझा परमपूज्य मित्र अंड्या बोलला होता.अंड्या म्हणजे आजवर २२ प्रेमप्रकरणे यशस्वीपणे पूर्ण केलेला एकमेव मर्द.तो गुरु होता आमचा.
त्यादिवशी असाच मित्रांसोबत फिरत होतो.रविवार होता.काय माझं नशीब आणि मिनू दिसली.
आयला पण मी हाफ चड्डीवर.तिने मला असे पाहिले तर?? इज्जत का फालुदा.इज्जत काय फक्त तुम्हा मुलींनाच असते? आम्हा मुलांनापण असते.
मी प्रसादच्यामागे लपून लपून चालू लागलो.मिनूने केस धुतलेले होते.वाह...काय ती सकाळ.आमच्या ग्रुपमधल्या प्रसादची बहिण विद्या म्हणजे मिनुची खास मैत्रीण.मिनू काहीतरी घ्यायला किराणाच्या दुकानावर आली होती.आम्ही टपरीवरूनच तिला पहात होतो.आम्ही म्हणजे फक्त मी.माझे लक्ष फक्त तिच्याकडे होते.किराणा वाल्याने साबण देताना तिला स्पर्श केला.मी म्हणालो, "काय रे साल्या टकल्या, चान्स मारतो का? येऊ का तिकडे?
माझी आहे मिनू."पण माझे बोलणे त्याला ऐकू नाही गेले.मी मनातच बोलत होतो न त्यामुळे.
साबण घेऊन ती निघाली.पण निघून ती आमच्याकडेच येत होती.स्वप्न आहे कि काय हे?
मिनुचे विद्याकडे काहीतरी काम होते.म्हणून ती प्रसादकडे आली.
मिनुची नि माझी नजरानजर झाली.मी माझी हाफचड्डी लपवली.
पण लपवलेली गोष्ट कधी लपते का?
ती येतेच...जगासमोर...कधी ना कधी.
ती खुदकन गालात हसली.पण मलाच लाजल्यासारखे झाले.
हे भगवान, क्यू?क्यू?क्यू?...क्यू में आज हाफचड्डी पेहनके आया?
ती प्रसादला म्हणाली,"विद्याला सांग कि,मी आज संध्याकाळी बस stopवर वाट पाहीन.५ वाजता.क्लासला एकत्र जाणार आहोत आम्ही."
ती निघून गेली.जाता जाता माझ्याकडे कान्या नजरेने बघून हसून गेली.
कधी कुणाकडे आणि कसं बघावं हे ह्या पोरींना बरोबर कळतं.
ती निघून गेली.एकदम सगळं भकास झाल्यासारखं वाटू लागलं.
बाकीचे पुन्हा गप्पांत मग्न झाले.पण मी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच पहात होतो.
संज्याने चहा आणि चकली माझ्या हातात दिली.मी मनात म्हणत होतो,
"ये टपरी....ये चकली...
मेरे काम कि नही...मेरे काम कि नही"
आईशप्पथ तिने एकदम पटकन मागे वळून पाहिले.नजरानजर झाली.काय सुंदर लाजली ती!!
खल्लास झालो मी.
लगेच माझे logic जागे झाले.म्हटले आज तर रविवार.आज कसला आलाय क्लास?याचा अर्थ???तो इशारा मला होता....
वाह!!.... हे भगवान तेरे घर में देर हे...अंधेर नही.
मला हात पसरून आकाशात उडावेसे वाटत होते.पंख फुटल्यासारखं वाटत होते.माझे पंख म्हणजे मिनू.माझी मिनू.
तसाच घरी पळालो..कपडे इस्त्रीवाल्याकडे देऊन आलो.दुपारी झोप लागणारच नव्हती.
हि वेळ म्हणजे जगातली सर्वात दृष्ट गोष्ट असते.ती नेहमी स्वतःचा वेग आपल्या मनाविरुद्ध ठेवते.आपल्याला वाटेल कि, वेळ लवकर जावी तेव्हाच ती हळूहळू चालते.नाही तेव्हा भरभर धावते.
१ वाजला, २ वाजले ,३ वाजले, साडे तीन वाजले...पण ५ काही वाजत नव्हते....
शेवटी साडे ३ वाजताच मी घर सोडले आणि बस stop वर जाऊन उभा राहिलो.
(क्रमश:)
माझा दिल... (भाग २)
चालता चालता कधीकधी चुकून मिनुचा हात हाताला लागायचा.अहाहा...काय तो शहारा!
शब्द अबोल झाले कि, स्पर्श खूप बोलू लागतात.इथे स्पर्शामागोमाग ती हि बोलायची,"सॉरी हं".
मी मनातच म्हणायचो,"सॉरी त्रास दिला कि बोलतात.मला तुझ्या स्पर्शाने काहीच त्रास नाही होतंय."
म्हणता म्हणता पण काहीच न म्हणता चौपाटी जवळ आली.रविवारमुळे गर्दी असायला हवी होती.पण दुपार असल्याने वाचलो.
किनाऱ्यावर जाऊन मी तसाच वाळूत बसलो.ती उभीच राहिली.मला वाटले कि ती म्हणेल,"इइइइइ.....इथे बसायचं?".पण ती थोडं अंतर ठेऊन बसली.
त्याच वाळूत...माझ्यासोबत.मनातच म्हटलं कि, हि पोरगी आपल्या हद्दीत बसते.चालेल हि आपल्याला.
सुरुवात कुणी करायची बोलायला? एकतर मिनू माझ्यासोबत अशी माझ्याबाजूला एकटी बसलीय ह्या गोष्टीवरच माझा विश्वास बसत नव्हता.
मी तिलाच न्याहाळत होतो.कुणी इतकं भारी कसं दिसू शकतं यार???
वारा मस्त तिचे केस उडवत होता.तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसणं यायचं.
"एक वारा गुणगुणत आला, स्पर्शुनी तुझला बेभान झाला."
मी हि ऐकलं होतं कि, दारूत खूप नशा असते.पण खरं सांगतो,सौंदर्यात त्याहून जास्त नशा असते...विशेषत: जेव्हा ते सौंदर्य मुलीचं असतं.हि नशा डोक्यात अशी काही चढते कि उतरता उतरत नाही.उगाच नाही मुलं एखादीच्या मागे अशी वेडी होत.
"बोल ना" ती बोलली.
"मी काय सांगू?तूच बोलावलंस ना मला इथे? मग तूच बोल ना"
"मी तर विद्याला बोलावलं होतं"....मी तिच्याकडेच पाहत होतो आणि
"मला तू आवडतेस.तुला?" मला नाही राहवलं आणि मी क्षणात बोलून गेलो.छाती धडधडू लागली.आता काय होतंय नि काय नाही?
एक क्षण...तिच्या चेहऱ्यावर जे भाव होते मी शब्दात कसे सांगू? त्यावर होकार होता, लाज होती, माझी स्वप्नं होती.
काहीच नाही बोलली ती. पण मला हलकं वाटत होतं.विचित्र हि वाटत होतं.कसं वागू आता कळत नव्हतं. तिच्या त्या अस्पष्ट होकाराने मनात कारंजं उडत होती.क्षणात तिला मिठीत घ्यावं असं वाटत होतं.पण हिंमत नाही झाली.बराच वेळ शांततेत गेला.
संध्याकाळ होत आली होती.इतक्यात माझ्या हातावर कुणी तरी हात ठेवला.नाजूक होता तो स्पर्श.मिनुचा होता का तो स्पर्श? हो. मिनुचाच होता.
अंगातून एक शिरशिरी गेली. काय होतं त्या स्पर्शात? नाही सांगता येत.पण खुपसा विश्वास होता त्या स्पर्शात.
जिव्हाळा, प्रेम, काळजी यांना मांडण्यासाठी स्पर्शाहून मोठं साधनच नाही.
त्याच क्षणी कुठून हिंमत आली माहित नाही, पण मी तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या ओठांचं एक चुंबन घेतलं मी.तिने डोळे मिटून घेतले होते.एक समाधान होतं त्या डोळ्यांत.मला वाटले कि, या क्षणापुरता का होईना पण, मीच या पृथ्वीवरचा सर्वात सुखी माणूस आहे.
ओठ वेगळे झाले. मी सुन्न झालो होतो.केले ते चूक कि बरोबर? तिला काय वाटले असेल माझ्याबद्दल? इतका नीच आहे का मी? मी केलं ते प्रेमापोटी केलं कि त्यात भूक होती?
सुख आणि प्रश्न एकाच वेळी एकाच जागेवर हजर असले कि, सुख त्या प्रश्नांखाली दडपलं जातं.
खुपसा वेळ असाच गेला.सुन्न...
मग मी म्हणालो,"मिनू.....सॉरी"
"श्री, एक सांगायचं होतं"
"काय?"
"मी यापुढे तुला कधीच भेटणार नाही.हि आपली शेवटची भेट"
"पण मिनू...चुकलो मी.माफ कर. असं नव्हतं करायला पाहिजे मी."
"नाही रे श्री.तू नाही चुकलायस. काहीकाही माणसं आपल्याला बघूनच आवडायला लागतात. पण का? याचे उत्तर नसतंच आपल्याकडे.मला तू खूप आवडतोस.पण....."
'पण'...हजारो श्वास अडकवून ठेवणारा हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा ना एकदा डोकावतोच.
या 'पण' च्या मागे निर्णय लपलेला असतो..ज्यात बहुतेकदा तडजोडच जिंकलेली असते.
आज हा 'पण' माझ्या आयुष्यात डोकावून पहात होता. पुढे ती बोलू लागली.
"मला तू खूप आवडतोस.पण मला माझे बाबा हि खूप आवडतात.त्यांना फसवायला नाही जमणार मला. माझं तुझ्यावर आहे, ते प्रेम आहे का?हे मला माहित नाही पण काहीतरी आहे तुझ्यात.मला खेचतं तुझ्याकडे ते. पण या जगाशी लढायची हिंमत नाहीयेय माझ्यात.कारण या जगात माझे बाबा हि आहेत.माझ्या बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे.त्यांना हे सगळे कळले तर त्रास होईल त्यांना आणि मला ते अजिबात नकोय."
"मिनू...."
"श्री नको समजावूस मला काही.खूप विचार आधीच केलाय मी.प्लीज"...काय तरी झालं...पण डोळ्यांत थोडंसं पाणी आलं....तिच्याही आणि माझ्याही.
मी समुद्राकडे पहात बसलो....मन जास्त खोल असतं कि समुद्र जास्त खोल असतो.
मनच समुद्राहून जास्त खोल असतं.समुद्राचा तळ कधी ना कधी लागतोच.पण मन???? मनाचा तळ कधीकधी सापडतच नाही.
"निघूया का?"ती बोलली.
आवडत्या माणसासोबतची वेळ अशी पटकन कशी निघून जाते यार?
थांबायचं होतं मला. नव्हतं तिथून जायचं आणि तिला हि जावू द्यायचं नव्हतं.पण....."हो" म्हणालो.
परतीच्या वाटेत हि काहीच नाही बोललो आम्ही.
रात्री बिछान्यावर पडून विचार करत बसलो. विचित्र संध्याकाळ होती आजची.म्हटले तर काहीच नाही घडले आज आणि म्हटले तर खूप काही घडले आज.
मिनू..एका कोड्यासारखी.मला आठवत होते कि शेवटच्या क्षणी मी म्हणालेलो,"जातो मी.तू इथून त्या वेगळ्या रस्त्याने जा.म्हणजे कुणालाही संशय येणार नाही."
"श्री, जातो नाही म्हणायचं कधी.येतो म्हणायचं."
मी निघालो.
मिनू... एकाच वाक्यात माणूस कधीकधी मनात उतरतो तर कधीकधी एकाच वाक्यात मनातून उतरतो. इतकी काळजी नको घेऊस.
जगणं कठीण होऊन जाईल माझं तुझ्याशिवाय. आता या क्षणी मला ती माझ्याजवळ हवी होती.कायमची माझी म्हणून.माझी हक्काची म्हणून.
मी मिनुसोबत असे का केले? तिला का जाऊ दिले?
बऱ्याचदा माणूस स्वत:च स्वत:ला अनाकलनीय असतो.
एखादी गोष्ट आपण का केली किंवा का घडली याची उत्तरं कधीकधी मरेपर्यंत मिळत नाहीत.
काही प्रश्न अनुत्तर जन्माला येउन अनुत्तरच मरतात...आणि मारतात.
त्यानंतर बरेच दिवस गेले.मिनू कधी भेटलीच नाही.विद्यालाही काही माहित नाही.
मी थोडे दिवस बिथरलो.मग सावरलो. पुन्हा घेऊन फिरून लागलो....तेच...माझं दिल...
हसण्यात लपवलेलं...माझं दिल...
हसऱ्या चेह्र्याखाली हसरी वादळं घेऊन..
पण.....
तो दिवस काय म्हणून लक्षात ठेवू मी?
त्या दिवशी आम्ही भेटलो कि दूर झालो?
एक मात्र पटतं...
पहिला स्पर्श आणि पहिलं चुंबन हे विसरण्यासाठी नसतंच...
ते नेहमी असंच राहतं... ताजं...
मिनू....आजही आठवतात मला....
ना विसरलेले...पण थोडे सरलेले...थोडे मुद्दाम घट्ट धरलेले...
ना फक्त तुझे...ना फक्त माझे...हे क्षण आपुले.
मला काही तरी आठवायच आहे
मला काही तरी आठवायच आहे
कोऱ्या कागदावर साठवायच आहे,
विसरलेत जे शब्द सगळे
त्यांना पुन्हा इथे मांडायच आहे.
काव्य असे न्यारे बनवायच आहे
जणु ज्ञान मला मुलखाच आहे,
मनातली भावना सांगण्यासाठी
एका कवितेला रचायच आहे.
बर असते ना कवितेत बोललेले
न बोलता सारे काही सांगायच आहे,
ते पण समजतात भावनाना
प्रतिसादात फक्त टाळ्या ऐकायच आहे.
सर्वात मोठा कवी मला बनायच आहे
प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधायच आहे,
स्वप्न तर खूप मोठे आहेत माझे
पण पाय पाहुन मला आंथरुन वाढवाच आहे.
आपल्यावर प्रेम करणे हे आयुष्य...♥♥
कुणावरतरी प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम
करणे हे कर्तव्य,
तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याने
मैत्री म्हणजे नक्की असतं तरी काय? एक मन
मैत्री म्हणजे नक्की असतं तरी काय?
एक मन.. आपल्याला समजून घेणारं,
एक मन.. भावना उमजून घेणारं,
एक मन.. आपल्या यशासाठी झुरणारं,
एक मन.. अपयशासाठी सांतवन करणारं,
एक मन.. आनंदात साथ देणारं,
एक मन.. संकटात हात देणारं...
तिच्यात काय वेगळं होतं.
तिच्यात काय वेगळं होतं.
साधी trouser तर घातली होती,
आणि shirt इन होता.
केसांना आवरायला मानेमागे,
एक नाजूकसा पिन होता.
रुमाल वैगरे नव्हता इतर मुलींसारखा हातात,
एक tissu होता पांढरा शुभ्र,
आणि तिच्या मागे तिच्या perfurm चा सुहास,
थोडा मंद थोडा दर्प.
काखेत purse होती कि नाही माहित नाही,
पण मी तिला पाहतांना इतरांनी मला पहिल,
हे सतावाल्याशिवाय राहत नाही.
असो पण ती होतीच सुंदर, गोरीगोमटी,
सरीव बांध्याची सिंहकटी.
नैसर्गिक सौंदर्य,corporate लूक,
थोडा पुरुषीपणाच म्हणून नजर करारी ,
समोरच्याला अगदी खाली बघायला लावणारी.
अगदी नवी वागणूक , corporate culture.
इतर मुलींसारखा बाऊ नाही कि काही नाही,
ती आणि तिचा iphone,
तिला काही नव्हतं कि,
तिच्या सोबत आहे कोण आणि नाही कोण.
आगदी त्या क्षणी वाटलं कि,
हा platform, platform नसावाच,
एक बाग होऊन जावी,
सोबतीचे सारे लोकं नसावीत तिच्या माझी शिवाय,
गाडी येउच नये, तिने त्यात बसूच नये,
इथनं मुळीच जाऊ नये.
बोलावं माझ्याशी थोडं, इंग्रजीत का होईना,
हि कल्पनाच होती अगदी सुंदरतेच्या पलीकडची,
आणि तीही फार सुंदर होती अगदी कल्पनेच्या पलीकडची.
वाट पाहतोय तुझ्यात हरवून जाण्याची
वाट पाहतोय अल्लड क्षणांची
स्वप्नातल्या तुझ्या सोबतीची
न उमगलेल्या अनामिक नात्याची
भूरळ पडणाऱ्या त्या हास्याची
वाट पाहतोय तुझ्यात हरवून जाण्याची
मिठीत तुझ्या सहज विरून जाण्याची
निवांत तुझ्या कुशीत निजण्याची
नितांत बडबडनारे होठ पाहण्यची
वाट पाहतोय माझी होण्याची
हळुवार पाऊलांनी तुझ्या येण्याची
अनामिक्तेला एक नाव देण्याची
फक्त तुझाच होऊन जाण्यची
आता फक्त वाट पाहतोय..
आता फक्त वाट पाहतोय..
तुझी त्या क्षणांची आणि माझी..
आता फक्त वाट पाहतोय.
नारळात पाणी अन संग्रामची देवयानी'
नारळात पाणी अन संग्रामची देवयानी'
'चुलिवर वरण अन आभाचा करण'
'गवतावर माशी अन अर्णव ची खुशी'
'सिंहाची गर्जना अन मानवची अर्चना'
'देवची किर्ती अन यशची आरती'
'सरदेशमुख घराण्याची राणी ती सोहमची कल्याणी'
लग्नाची नाती काही केल्या कळेना.......
नाव कुणाच घ्याव..??
नाव घेणारी मिळेना..
खूप इच्छा मनातच राहतात
आज बोलून टाकावसं वाटतंय
काही तुझ्याही मनातलं गुपित
सहजंच आज ऐकावसं वाटतंय
साईनाथाने कृपा केली
1
थोर तुझे उपकार, साई थोर तुझे उपकार ॥धृ॥
भक्तजनांच्या संकटसमयी तूच एक आधार ।
भक्ति करतां मुक्ति मिळते, ऐसी ख्याती अपार ।
श्री साईच्या शिर्डी नगरी भक्तगण येती हजार ।
शतजन्माचा फेरा चुकवूनी मागती तुझाच आधार ।
स्मरण तुझ्या शिर्डीचे मज होते अनिवार ।
नित्य वाटते दर्शन घेण्या, यावे वारंवार ॥
2
साईनाथाने कृपा केली
साईबाबा गरीबाचे वाली आशा माझी परिपुर्ण झाली . ॥धृ॥
कैक दु:खात शिरडीस जाती,
खाली हाताने ना कोणी येती,
आशा होईल पुरी साईबाबा करी,
दिनानाथाची ती गुरु माऊली ॥१॥
घरोघरी साई पुजा चाले साई,
भक्तांच्या हृदयात डोले ज्यांची भक्ती खरी,
साईबाबा वरी येईल स्वप्नातली गुरु माऊली ॥२॥
जन्मा येऊनी शिरडीस जावे,
साई दरबार पाहुनी यावे किसन म्हणॆ,
खरे तुमचे होईल बरे
गुरु कृपेची मिळता हो साऊली ॥ साईबाबा ॥३॥
ज्याच्या घरी आला साई
त्याची हीच खरी पुण्याई
"तु : एक सौंदर्य कविता"
काळजात हो वीज चमकली,
तुझ्या नुसत्या हसण्यानं..
विजेचे हो काय कौतुक,
जिथे आभाळ बरसलं,
तुझ्या त्या गोड दिसण्यानं..
धरणी येथे पावन जाहली,
केवळ तुझ्या इथे असण्यानं..
अवनी सोडुनी अवघे त्रिभुवन,
कोमेजले तु तिथे नसण्यानं..
एक नजर तुझी देऊनि जाते,
लाख्खो जन्माचा हो आभास..
आता केवळ ध्यास मनातुनी,
तुझ्यासवे घ्यावा अंतिम श्वास..
फुलापानांनाही येई रंग गंध तुझा गं,
जवळुनी तू नुसते जाता तयांच्या,
होतो सारा निसर्ग सुगंधी हो..
काळी माती देखील मोहरून जाते,
जेंव्हा तू ठेवी पाय तयावरी..
तुझ्या पावलागणिक ती गंधित होते,
अन नाव येते सारे पावसावरी..
आले अन गेले कवी अनेक,
करून तुजवर कविता हो..
पण माझी ही कविता मी वाहिली,
तुझिया चरणी फुलासमान हो..
ग्रहांनाही पडला असेल कदाचित,
तुजला बघण्याचा मोह हो...
म्हणुनि त्यातील काही येउन गेले,
या पृथ्वीच्या जरा जवळून हो...
धन्य तू अन तुझे माय बाप,
जयांनी तुजला जन्मास घातले हो...
अन धन्य असू दे तो देवही आमुचा,
जयाने फुरसतीने घडविले तुजला हो...
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा-
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला
मराठी अस्मिता.. मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण
घेऊन आला नवचैतन्याची खाण..!
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला...
खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला..
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!
तिळात मिसळला गुळ, त्याचा केलालाडु...
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
तीळ आणि गुळासारखी रहावी,
आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
नात्यातील कटुता इथेच संपवा....
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला...!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
झाले - गेले विसरुन जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला..
हलवा - तिळगुळ घ्या अन्
गोड गोड बोला...!
मांजा, चक्री...
पतंगाची काटाकाटी...
हलवा, तिळगुळ, गुळपोळी...
संक्रांतीची लज्ज्त न्यारी...
पतंग उडवायला चला रे....!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!
हलव्याचे दागिने, काळी साडी...
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी...!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!
नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे...
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे....
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!
साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!
काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळुआ पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा...!
आमोल घायाळ
तुझी आठवण, नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखी,
तुझी आठवण, पहाटेच्या साखरझोपेसारखी, हवीहवीशी वाटणारी...
तुझी आठवण, नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखी,
माझ्या मनात प्रीत फुलवणारी.....
तुझी आठवण, चाफ्याच्या सुगंधासारखी, मला मोहरून टाकणारी....
तुझी आठवण, मोरपीसासारखी, जपून ठेवावी अशी वाटणारी...
तुझी आठवण, अगदी तुझ्यासारखी,
माझ्याही नकळत मला तुझ्यत गुंतवणारी....
आमोल घायाळ
संक्रांतीच्या हार्दिक शुभेछ्या
नाती प्रेमाची संक्राती सारखी गोड ,
आयुष्यात तिला नसते कधी तोड
कारण तिला असते तिळगुळाची जोड
२
वर्ष संपले डिसेंबर गेला
हर्ष घेओनि जानेवारी आला
निसर्ग सारा दवाने ओला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
३
गुळातील गोडवा ओठावर येउदे
मनातील कडवटपणा बाहेर पडू दे
या संक्रातीला तिळगुळ खाताना माझी आठवण राहू दे
आमोल घायाळ
प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली...
ती मला आवडली
न झोप उडून गेली...
आयुष्याला नवी
दिशा मिळून गेली...
प्रेमाचं रोपट
हृदयात लावून गेली...
नव्या विश्वाची
ओळख होऊन गेली..
कळली नाही प्रीत
मनी कशी फुलली...
कधी माझ्या हृदयाची
राणी ती झाली...
माझ्या मनाचं रान
ती बहरून गेली...
माझा सारा वसंत
ती लुटून गेली...
माझ्या भोळ्या मनाला
ती गुंतवून गेली...
मला कायमचा
तिचा करून गेली.
आमोल घायाळ
तिचा तो पहिला स्पर्श माझ्या अंगाला लाजवणारा ,
एक रमणीय संध्याकाळ रात्रीमध्ये बदलताना......
तिचा तो पहिला स्पर्श माझ्या अंगाला लाजवणारा ,
आणि मी पाहताच ति लपवित तो चेहरा गोड गालात हसणारा
, तिचं ते बोलणं तिच्या दिसण्याहूनही सुंदर होतं ,
तिचं ते तसं वागणं जणु तिच्या स्वभावातच होतं बघता बघता मग तिची जाण्याची वेळ झाली ,
आणि मी तिला थांबवण्याचा हट्ट सुरु केला याच जाण्याच्या - हट्टात १ तास मात्र निघून गेला
, आता सांज - रात्रीशी गप्पा गोष्टी करत होती .....
. मग मात्र मी माझा हट्ट मागे घेतला अन तिचा मार्ग मोकळा केला,
परंतु , काही क्षणांतच मनात आलं ..... काहीतरी बोलायचं राहून गेलं ,
मनाने तर हिम्मत बांधली होती पण ओठांनी मोहोर खोलालीच नव्हती ...
परंतु मित्रांनो, एक वेळ नक्कीच अशी येईल
माझ्या मनातील भावना तिला बोलून जाईल आणि त्या वेळी मात्र सांज - रात्रीशी नव्हे तर रात्र -
पहाटेशी गप्पा गोष्टी करत असेल..
आमोल घायाळ
दूर लोटलेस मज.. घायाळ जीव झाला
स्मरून तुजला आज एक काव्य केले
ओलावल्या डोळ्यांनी शब्दास कवटाळले
नसेन मी जरी स्वप्नातला तुझ्या
हृदयात माझ्या तूच आहेस..अन... राहशील सदा
दूर लोटलेस मज.. घायाळ जीव झाला
प्रेमपाखरास काट्याचा स्पर्श झाला
रक्ताळले हृदय हे... का तुझं न कळावे
वेड्या माझ्या मनाने कीती कीती झुरावे....
दुरून तुझं पाहता.... वाटते जवळ घ्यावे
मिठीत तुझं कवटाळूनी... हृदयात उतरावे
सल मनाची माझ्या जाणशील का कधी
वाट पाहतो नेहमीच.. जीवनात येशील का कधी?
कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...
एरवी अगदी खळखळून हसते
पण मी हात पकडला की गोड लाजते
जीन्स टी शर्ट regularly घालते
पण पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते
साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते
पण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर 'नाही' म्हणते
पिज्जा बर्गर सर्रास खाते
चहा मात्र बशीत ओतुनच पिते
लोकांसमोर खुप बोलते
मला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च म्हणते
ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते
पण माझा विषय निघाला की पटकन बावरते
बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते
एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते
मित्रानो,प्रेमात जेव्हा विरह येतो
मित्रानो,प्रेमात जेव्हा विरह येतो तेव्हा तुटलेल्या मनाला आधार लागतो आणि तेव्हा आपणास खरा आधार मिळतो तो आपल्या जन्मदाती जननिचा,
पण आईलाही आपल्या लेकराचे दुःख बघवत नसते....
अश्याच एका विरहात दुखी मुलाच्या आणि आईच्या मनःस्थिती मी येथे मांडन्याचा प्रयत्न करत आहे...
खरे तर आई आपले मन बरोबर ओळखते, पण आईचे मन ओळखने तसे अवघडच आहे...
आई…
आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?
ठाउक आहे मला,
आई तू बोलायचिस,
बाळा तू फसत आहेस,
आतल्या आत का धसत आहेस?
ठाउक आहे मला,
मी तुझ्या बोलन्या कड़े काना डोळा करायचो,
तिच्या प्रेमात अजुनच बूडत जायचो,
परतीचे सर्व मार्ग स्वतःच बंद करत जायचो...
आई,तरी आज तू मला समजुन घे,
माझ्या केसात हात तुझा फिरवत,
माझा चेहरा वाचून घे,
डोळ्या कड़े मात्र बघू नकोस,
आसवान आड़ तिला डोळ्यातच राहून दे...
आई,तू प्रश्नांची घाई करू नकोस,
मी हळू-हळू माझे मन मोकळे करेन तुझ्या कड़े,
आहे जे काही साठलेले मनात सर्व वाहीन तुझ्यापुढे,
मी सर्व सांगत असताना मात्र तू धीर सोडू नकोस...
मी तिच्या बद्दल जे काही सांगेन
ते तू खुल्या मनाने ऐक,
तुला वाटेल मी तिची बाजू मांडत आहे,
पण तू माझी बाजू बघून अश्रु ढाळू नकोस,
आई मी कदाचित माझा धीर सोडेन,
रडून-रडून तुझे पदर ओले करेन,
तरी तू तिच्यावर रागावू नकोस,
आता पुरे म्हणून मला रडायचे थाम्बवु नकोस,
तुझे ऐकत नाही म्हणून कदाचित तू मला तुझ्या पासून दूर लोटशील,
तू किव्हा मी ठरव असे देखिल म्हणशील,
पण आई असे विचारून तू तुझ्या लेकराची परीक्षा घेऊ नकोस,
विसरत नाही तिला म्हणून मला कायमचे दूर करू नकोस...
माहीत आहे तिने तुझ्या लेकराचे मन तोडले,
तुझ्या लेकराचे स्वप्न पूर्ण होण्या आधीच मोडले,
आई...तरी ज़रा सबुरिने घे,
मला तेव्हा हवे असलेला तुझा आधार दे...
तेव्हा सावरल्यावर मी कदाचित परत मी तिच्या कड़े जाइन ,
थोड्या दिवसाने परत माझे तुटलेले मन घेउन तुझ्या कड़े येइन,
तेव्हाही मी तुला हाच प्रश्न करेन,
आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?
♥♥♥ फक्त तुझी आठवण ♥♥♥
कुणी तरी कुणाची वाट पाहत थांबते,
येणारयाचे येणे मात्र सावली सारखे लांबते,
कुणी तरी हळूच विचारत कोण येणार होतं???
तेव्हा खर सांगू " डोळ्यात " फक्त " पाणी " च येतं...!!!
♥♥♥ फक्त तुझी आठवण ♥♥♥
एक विनंती आहे ..... अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर
एक विनंती आहे .....
दुरच जायच असेल तर
जवळच येऊ नका,
busy आहे सांगुन टाळायच असेल
तर वेळच देऊ नका......
एक विनंती आहे .....
साथ सोडून जायचच असेल तर
हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर
मनात आधी भरूच नका.........
एक विनंती आहे .....
चौकशी भरे call काळजीवाहू sms यांचा
कंटाळाच येणार असेल तर misscall च देऊ
नका,
memory full झालिये सांगुन delet च
करायचा असेल तर नंबर save च करू
नका.......
एक विनंती आहे .....
मौनव्रत स्वीकारायच असेल तर
आधी गोड गोड बोलूच नका ,
सीक्रेट्स share करायचीचनसतील तर
मनाच दार उघडूच नका.....
एक विनंती आहे .....
माझ्या काळजी करण्याचा त्रासच होणार
असेल
तर मला आपल म्हणुच नका ,
अनोळखी होउनच वागायच असेल तर
माझ्या बद्दल सगळ जाणुच नका ....
एक विनंती आहे .....
अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर
आधी डाव मांडूच नका,
रागावून निघून जायचच असेल तर
आधी माझ्याशी भांडूच नका .....
एक विनंती आहे .....
सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर
कृपया नातं जोडूच नका ,
फाडून फेकून द्यायच असेल तर
माझ्या मनाच पान उलगडूच नका ..
MARATHI.........POEMS... Vachanyasarkhya..............
wachya aawdalya post kelyaaaa
म्हणून का आपण नातं तोडून टाकावं ?
प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही,
म्हणून का स्वप्नं पाहणं सोडून द्यावं ?
आपलीच माणसं जेव्हा कटू वागतात,
म्हणून का आपण नातं तोडून टाकावं ?
सांग साथ मला तू देशील ना...
मि देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तू देशील ना
खूप अडखळीची आहे वाट ही
कधी कट्यांवरी पडेल टाच ही
पडताना काळ्या अंधारात ह्या
सांग हात मला देशील ना...
तुझ्या प्रीतिची आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
एकटेपणाचा होइल भास् मला
सांग साथ मला तू देशील ना...
कधी रागवेन मि तुझ्यावरती
कधी असा भाड़ेंन तुझ्या संगती
कधी येइल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तू घेशील ना...
मि देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तू देशील ना..
तू शांत,सागराचा हसरा अबोली चेहरा
तू नाजूक कळी रममान,पाकळ्यांच्या महाली
.....................
तू साजूक खळी,अलगद उमलती गुलाबी गाली
... ....................
तू शांत,सागराचा हसरा अबोली चेहरा सायंकाळी
...................
तू दवांनी चिंब भिजलेली,शहारती कोवळ डहाळी
..................+
तू हितगुज पाखरांचे,फिक्कट तांबड्या आकाशी
.................
तू कुजबुज हिरव्या पानांची,वाऱ्याच्या कानाशी
.................
तू वाळू ओलावलेली किनारी,जपल्या पाऊल ठश्यांची
................
तू निरव शांतता पसरती, सैल सुटल्या दिशांची
.................+
तू चांदन ठिपके दाटीचे,हळूच उजळते नील अंबरी
..................
तू गोंदण काळोखाचे,ह्या शोभिवंत निशेत भरजरी
...............
तू काजव किरण पणतीतले,पहारा देती दारोदारी
................
तू नाद प्रवासी,टाळ मृदुंगी,चाललेला त्या मंदिरी
................+
तू एक गुछ ढगांचा पांढरा,चंद्र झाकता तो सावळा
................
तू स्वछ आरसा तळ्याचा,प्रतिबिम्बास लळा लावता
...............
तू विन उसवती निजेची,तो अश्व स्वप्नांचा धावता
...............
तू लवत्या लता पापण्यांच्या,थकत्या रांगता रांगता
waachniy.. fakt tichyasathi...
प्रेम म्हणजे आभाळाला पडलेले स्वप्न..!
जुळले मनाचे
मनाशीच धागे
ओढ घेई मागे
मन सदा
गुंतल्या मनाला
कसे समजावे
का न उमजावे
मना काही
मायेचा पसारा
अवती भवती
मिळतात नाती
सहजची
मिळालेली नाती
टिकून राहावी
मी अनुभवावी
ऊब त्यांची
प्रेम म्हणजे आभाळाला पडलेले स्वप्न..!
प्रेम म्हणजे नऊरत्नांच्या दरातील रत्न ..
आधार काय नि काठी काय
थांबतील थांबतील काय म्हणतेस
मी तर सर्व जग थांबवले होते
अश्रुंचे सारे समूद्र मी तेव्हा
चार डोळ्यातून बरसवले होते
त्याच वाटेवर आज मात्र
पाऊलखुणाही दिसत नाही
आधार काय नि काठी काय
जिथे आज वादळाला रडायला........
माझ्या नजरेत बघवत नाही ...
आमोल घायाळ
शिर्डीचा राजा साईबाबा माझा साई माझा मी साईचा
बैलगाडी सजवली माझ्या मित्रहो
शिर्डीला जायला,
साई दर्शनाला जायला हो ,
साई बाबांना भेटायला हो
बैलगाडी सजवली माझ्या मित्रहो
शिर्डीला जायला,
माझ्या लाडक्या सखीला
साध्या भोळ्या या शुभाला
घेऊन चाललोय मी शिर्डीला
साई बाबांच्या दर्शनाला
तुम्ही पण चला सोबतीला //
साई माझा साधा हा भोळा
गोर गरीबानला त्यांचा हो लळा
भक्त हो जाई त्याच्या पायी
आशीर्वाद घेयून येती हो घरी //
शिर्डीस जायील तो हो पायी
दिसे पुण्याई बाबांची घरी
साई माझा जनतेचा आधार
करितो भक्तांचा हा उद्धार //
म्हणूण सांगतो भक्तहो
@
.@
##ज्याच्या घरी आला हो साई
त्याची हीच खरी पुण्याई ###
@@ओम नमो भगवते
साई नाथ नंदाय @@
साईभक्त
आमोल घायाळ
प्रिय ....भन्नाट ..."हृदयाचा ठोका चुकला तरी भन्नाट तू मात्र चुकू नकोस
प्रिय ................
भन्नाट
तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हा पासून मश्य्क़ जीवनाला एक वेगळ वळण लागल. कळलच नाही की मी केव्हा तुझ्या प्रेमात पडलो . मी प्रथम तुला होकार दिला. तेव्हाही मला वाटल नव्हत, की मी प्रेमात पडलो आहे. या १ डिसेंबर ला आपल्याला १ वर्ष पूर्ण झाली. पण अजूनही आपण नवीन असल्यासारखं वाटत. या बऱ्याच वर्षात बराच काही घडून गेल. थोड रुसण, थोड हसण..तरी आपल्यातील नाविण्य काही कमी झाल नाही. आपणा एकमेकांमध्ये एवढ सामावून घेतलं आहे की फक्त चेहऱ्याच्या हालचालींवरून आपल्याला काय बोलायचे आहे हे कळते. तू माझ्या साठी काहीच केलास नाहीस. खूप चं मित्र भेटले तुझ्याच मुळे माझी खूप मुलींशी मुलांशी मैत्री झाली . तू माझ्यासाठी भरपूर काही केल आहेस. आज मी जे काही आहे. त्याच पूर्ण श्रेय भन्नाट तुलाच आहे. आज आपण अशा वळणावर उभे आहोत,कि पुढे काय होईल ? याची कल्पना नाही. आपला विश्वास, आपल प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे.आपल्यातील निस्वार्थी,निरपेक्ष मित्र मैत्रिणीच्या प्रेमामुळेच आपण एकत्र आहोत. की आपल प्रेम फार वेगळ आहे....ते खरच वेगळ आहे. आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्ण पणे दिले आहेत. पण कोणत्याही अति आणि वाचनांमध्ये आपण एकमेकांना बांधल नाही. प्रेमाला कधीही मोजमाप नसत. फक्त भरपूर कविता पोस्ट करत राहायचं असत. कधी कधी वाटत, की तू एवढ करतोस तर मीच कमी नाही न पडणार? कुठे कमी पडले किंवा काही चुकले, तर नक्की मला सांग. खरच मला या ग्रुप मध्ये
माझ प्रेम व्यक्त करता येत. तुझ्यासारखं छान छान लिहिता- बोलता येत नाही. काहीतरी लिहित जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही. त्या लिहून व्यक्त करता येतात. म्हणून हे फक्त तुझ्यासाठी. आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलास, मला समजून घेतलास,म्हणून मी तुम्हा सर्व भन्नाट करांचा आभारी आहे .माझ्यावर खूप खूप प्रेम केलस.आता फक्त एकाच मागण आहे,
"हृदयाचा ठोका चुकला तरी भन्नाट तू मात्र चुकू नकोस,
प्रेमाच नात परी साथ कधी सोडू नकोस....................
फक्त आणि फक्त तुझाच
आमोल घायाळ
Tuesday, January 1, 2013
Subscribe to:
Posts (Atom)