मिळालेलं सगळ काही.. काहीही,
सांभाळून ठेवायची तुझी जुनी सवय
अगदी आपली जुनी बिलं सुद्धा..,
म्हणूनच तर सग़ळं तुझ्याकडेच दिल होतं.
तश्या सवयी सहजासहजी बदलत नाहीत आणि
तुही बदलणार्यातली नव्हतीस तशी.
आणि अचानक मी कशाला तरी तुला 'नाही' म्हटल्यावर,
तु जुन्या सगळ्याच संदर्भांचा हिशेब काढलास..
जे मीच तुझ्याकडे दिले होते.. फक्त जपून ठेवशील म्हणून.
नंतर कळल कि ती बिलं सुद्धा फक्त तु दिलेली होती..
अन हिशेब लागावा म्हणून जपली होतीस.
शेवटी म्हणालीस, "मला उपयोग असल्याशिवाय
मी काहीच सांभाळून ठेवत नाही."
No comments:
Post a Comment