Thursday, July 28, 2011

एकांत जणू बोलका झाला

आत पाय ठेवतो न ठेवतो
तोच एकदम गलका झाला
जणू मी नजीक गेल्याक्षणी
एकांत जणू बोलका झाला

फेरच धरला भोवती अन
सगळीकडेच शब्दच शब्द
अर्थाविणा राहिले ते ज्यांचे
अस्तित्व अपूर्ण अब्द अब्द

ओलांडता तो सावळागोंधळ
स्थिरावले थोडेसे सर्वकाही
तिथे पुढे जे दिसले, कळले
तेच अश्यात पाहिलेच नाही

किती काही निसटून जाते
मनात डोकावले नाही तर
हट्टाने आपण उन्हात ईथे
अन तिथे पडून जाते सर

पक्के ठरवूनही ऐन वेळीच
किती अतर्क्य वागतो ना
आपण कधीतरी स्वतःलाच
किती अनोळखी वाटतो ना!!

No comments:

Post a Comment