Thursday, July 28, 2011

प्रेमात पडू शकतो कोणीही.

प्रेम... प्रेम ही नुसती संकल्पना नव्हे तर तेच जीवन आहे अर्थात ज्याने त्याच्या विशुद्ध स्वरूपाचा अनुभव घेतला ती कोणतीही व्यक्ती होकारवजा मान हलवून हे मान्य करून टाकेल. अता प्रेम म्हणजे काय हे असले प्रश्न मनात येणं सहाजिक आहे पण एक लक्षात ठेवून चाललं पाहिजे की जिथे बुद्धी हात टेकते तिथून तर प्रेम अनुभवण्याला सुरूवात होते. ते असं शब्दात वगैरे सांगणं म्हणजे तहान लागणे म्हणजे काय होतं हे अशास्त्रीय भाषेत समजावण्याइतकच अवघड आहे. हा तर फक्त अनुभूतीचा भाग! एखाद्या स्वप्नाच्या, ध्येयाच्या किंवा अगदी कश्याच्याही प्रेमात पडू शकतो कोणीही. आपापल्या भावविश्वावर अवलंबून आहे की कोणाला काय भिडतं. एक अनुभव मात्र नक्की नक्की येतो प्रेमात अन तो म्हणजे 'जगावेगळं काहीतरी गमवल्याशिवाय जगावेगळं काहीतरी मिळत नाही!'

No comments:

Post a Comment