Thursday, July 28, 2011

मेघ दाट दाटूनी आले

हे मेघ दाट दाटूनी आले
अन तसेच दाटूनी थकले,
बरसण्यास नव्हते कारण
तसे वारेही नव्हते सुटले.

कोरडी सौदामीनी कडाडली,
ती आली तशीच निघून गेली.
प्रश्नच पडला हा नभाला कि,
वेळ बरसण्याची का निघून गेली?

काही केल्या प्रश्न सुटेना,
कुठेच काही पर्याय दिसेना.
भरून येता जड झालेल्या..
तव घनांना दिशाच गवसेना.

आपुल्या हातून काही घडले,
वा नेमके कुठे काय चुकले?
आपल्या पावसालाच कि काय,
दुज्या कुठल्या पावसाने लुटले..!!

No comments:

Post a Comment