Thursday, July 28, 2011

सखे

तूझ्याच सारखे नटते, थटते
अन नभी चांदणे ते लखखते
परि वेड्यास कसे कळत नाही
त्यास तुझी सर कधी येत नाही

ह्या प्राजक्तानेही तसेच करावे
वेळी अवेळी असे गंधाळून जावे
त्यालाही न कसे एवढे उमजावे
तूज श्वासगंधाने तो भारून जाये

कधी अबोलीही असेच वागते
नाजूकतेला ती ही दाद मागते
पण ती तर नेहमी हेच सांगते
तूज स्पर्शाचे तिज अप्रूप वाटते

सृष्टीसुद्धा वेडावते सहवासात तूझ्या
मग मी तरी स्वतःस सावरणार कसे
सखे गंधाळून स्पर्शतेस मनास माझ्या
मी स्वतःस कुठवर व आवरणार कसे

No comments:

Post a Comment