बोकडाच्या हातात हात घालून,
कोंबडा लागला नाचू...
श्रावण सुरु झाला आता..
एक महिना तरी वाचू...
पावसाने आज सख्या सगळ्यांना भिजवलं
आणि मला मात्र त्याने कोरडच ठेवल !
का म्हणून विचारता, त्याने तुझ कारण सांगितल
तुझ्याशिवाय बघ मला त्याने सुद्धा नाकारलं !!!!!!!!!!
श्रावण म्हणजे मला वाटते,
प्राजक्ताचे दिवस .
सृष्टीने कधीतरी करून
फेडलेला नवस...
संध्याकाळ झाल्यावर...
पक्षी घरट्यात परततात...
सूर्य अस्ताला गेला कि..
तुझ्या आठवणी मनात दाटतात..
म्हटले होते तुला एकदा...
मालायचाय केसात तुझ्या गजरा..
फक्त त्या शब्द स्पर्शाने...
खुलला होता तुझा चेहरा..
तुझेही पाय मातिचेच असतिल
याची जाणिव आधिच होती
म्हणुनच तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ
सुंदर फुलांची पण कागदिच होती !
आता तुझ्या आठवणींनी ,
फार कहर केला आहे...
तुला विसरायचे म्हटले तर तुझ्यासोबतच प्रत्येक क्षण,
पुन्हा डोळ्यासमोर हजर केला आहे..
पावसाच्या प्रत्येक थेंबात ,
धरतीने नवीन गाणे गायलेलं.
झाडांमध्ये पुन्हा नव्याने...
जगायची उम्मेद जगलीय..
आज तुझ्या स्पर्शाने ...
अंग अंग मोहरून गेले...
ढग दाटले नसतानाही...
अंग चिंब भिजून गेले.
पाठीवरचा तीळ तुझ्या ..
नजर रोखून घेत होता...
तुझ्या जवळ येण्या करिता...
माझ्या शरीराला ओढत होता..
आज स्वप्नांनी...
मनात काहूर केला होता..
तू दूर असलीस तरी...
तुझा आभास जवळ होता..
कधी एकांतात बसलो कि...
तुझ्या आठवणी स्पर्धा करतात..
तुला आठवायचे म्हटले कि..
दूर दूर पळतात..
आठवतेय तुला मी तुला,
एकदा दुरून पहिले होते..
तुला आवाज द्यायचं फक्त..
माझ्या मनातच राहिलं होते.. :
असतात काही नाती..
विश्वासावर टिकलेली..
विश्वासाच्या गळा घोटतात..
माणस माणसातून उठलेली...
No comments:
Post a Comment