Monday, July 25, 2011

प्रेम म्हणजे दोन जीवांचे.. एक छोटेसे अस्तित्व...

काही ओझी हि...
पापण्यांवरच सावरतात...
त्याच अदृश्य ओझ्यांना..
स्वप्न म्हणतात..


माझा तुझ्या सोबतचा,
प्रत्येक क्षण वेगळा आहे..
आता तू दूर असलीस तरी..
हृदयात पसारा सगळा आहे..



किती वेळा सांगू,
आता तुला विसरायचे आहे..
मनात खूप ठरवतो पण..
हृदय म्हणते थांब अजून थोड आठवायचे आहे.



प्रेम म्हणजे दोन जीवांचे..
एक छोटेसे अस्तित्व...
पण लोक म्हणतात ते तर आहे..
मृगजळ-एक नसलेले अस्तित्व..



प्रेमाचा पाउस घेहून
येतो नवीनच जोश,
मग त्या बरसाती मध्ये
राहीनच कसा होश...!!

No comments:

Post a Comment