Sunday, July 31, 2011

"भास तुझा"

त्या गंधीत फुलांप्रमाणे तव कांती मज भासली
स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस

त्या रिमझिमणार्‍या पाऊस धारा
अंगी जागला शहारी प्रदेश सारा
जणू सुरेख मोर पिसारा
त्यात भासे तुझा गोड चेहरा
प्रित कळी उरी ऊमलली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस

मंद झुळूक ते वार्‍याचे
गीत गाई तुझे-माझे
भास होता तु येण्याचे
श्वास वाढ्ती स्पंदनांचे
वसुंधरा ही श्रूंगार ल्याली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस

गालीचे मग हरिताचे सुने-सुने बनती
परतीची वाट जेव्हा पद वळती
ओहळाची आसवे मग खळखळती
मधुर संगीत त्यांचे गगनी भिडती
आनंदास आज भरती आली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस

No comments:

Post a Comment