Monday, July 18, 2011

माझा प्रत्येक शब्द

आज पावसाने पुन्हा...
मुसळधार बरसायचे ठरवले आहे ...
मी तुझ्या आठवणींना पुन्हा..
नव्याने जगायचे ठरवले आहे...



नात्यानुसार प्रेम करायला,
प्रत्येकजण शिकवतात,
मनाने जडलेल्या नात्याला,
का मग ते दुखवतात..





माझा प्रत्येक शब्द,
तुझ्या शिवाय कुठे रूळलाच नाही..
मी प्रत्येक शब्द तुझ्यासाठी लिहिला..
पण तो शब्दातील तो भाव तुला कळलाच नाही..





तुझ्या वरील प्रेम व्यक्त करताना,
कुठे तरी कमी पडलो,
नाहीतर मी पुन्हा असा...
एकाकी नसतो पडलो...






आता माझ्या शब्दांनीच,
ठरवले माझा घ्यायचा निरोप...
मी तुला दुखावल्याचा..
आहे त्यांचा आरोप...

No comments:

Post a Comment