काय तरी मिळत प्रेमात पडून दुख वेदना आणि पश्चातापाचा आहेर,
तरुण मन म्हणे हेच दिवस आहेत कधीतरी पडा रे यातून बाहेर..!!
उबग येत नाही का रे तुम्हाला तेच तेच नखरे नि हट्ट झेलण,
जीव ओवाळून टाकण आणि खोट वाटावं इतक गोड बोलण..!!
सरळ सरळ प्रक्टिकल वागावं का भाव द्यावा फुकटचा मनाला,
त्याला अक्कल नसते तेच तर भाग पाडत प्रेमात पडायला..!!
खूपचं उत्तम जर जमलं ठेवायला रंगात रंगुंनी रंग आपला वेगळा,
मला तर वाटत सुखी होण्यासाठी बिनधास्त वापरावा हाच फॉर्म्युला..!!
आधार मिळतो म्हणे जीवाला भावनिक संकटांच्या वेळी सावरायला,
लहान का असता तुम्ही येत नाही का स्वतःच्या गोष्टी स्वतः आवरायला..!!
खरंच असत का प्रेम मैलाचा दगड आणि टिकणार शाश्वत चिरकाल,
गेलेत ते दिवस कायमसाठी राहिल्यात त्या फक्त आठवणी आजकाल..!!
एकचं तर जीव असतो आपल्याकडे का तो कुणाला लावून फसायचं,
घरचंच का कमी असतं त्यात दुसऱ्याचं घोड फुकटच पोसायचं..!!
धन्यवाद देतो बाप्पाला त्याने ठेवलंय मला "पुन्हा" प्रेमात पडण्यापासून दूर,
पण बघून दोन चिमण्या जीवांना आजही मनात का बर उठतो काहूर..!!
No comments:
Post a Comment