मी असाचं आहे,
एकटा एकटा जगणारा....
सर्वांत असाताना देखील,
स्वतःच्या शोधात फिरणारा..!!
मी असाचं आहे,
खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारा..!!
मी असाचं आहे,
जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म मानाणारा..!!
मी असाचं आहे,
दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसता हसता
नियतीला लाजवणारा..!!
मी असाचं आहे,
इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतः मात्र,
काळोखात आटणारा..!!
मी असाचं आहे,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन राहणारा..!!
No comments:
Post a Comment