जंग जंग पछाडलं आजवर मी पण
कळलं नाही कधी आनंदाचं गमक,
तुझीचं प्रतीक्षा होती जणू जुळलं
आताशी माझ्या सुख-दुःखाचं यमक..!!
आयुष्याचं गणित सोडवायला सजणे
तुचं तर माझं तंतोतंत जुळणार सूत्र,
मुद्देसूद आणि सुटसुटीत जीवन केलंस
धरून तुझ्या बेहिशोबी प्रेमाचं छत्र..!!
No comments:
Post a Comment